बॅकलेस ड्रेससाठी तुम्हाला हवी आहे का सेक्सी बॅक,असा मिळेल इन्स्टंट ग्लो (Get flawless and sexy back with this easy tips)

बॅकलेस ड्रेससाठी तुम्हाला हवी आहे का सेक्सी बॅक,असा मिळेल इन्स्टंट ग्लो (Get flawless and sexy back with this easy tips)

लग्न, पार्टी अशा समारंभासाठी अनेकांना बॅकलेस ड्रेस घालण्याची इच्छा असते. पण अनेकांना हे कपडे घालण्याचा आत्मविश्वास नसतो.कारण त्यांना त्यांची पाठ असे कपडे घालण्यास योग्य वाटत नाही. काहींना त्यांचा रंग, त्यावरील डाग, लव नकोशी वाटते आणि ते असे बॅकलेस ड्रेस घालायला पाहात नाही. पण तुम्हाला तुमच्या पाठीची तुम्ही थोडी काळजी घेतली तर तुम्ही सुद्धा अगदी बिनधास्त बॅकलेस ड्रेस घालू शकता. त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्चण्याची गरज नाही.


रंग महत्वाचा नाही (Color is not important)


flawless back fi


जर एखादी व्यक्ती गव्हाळ किंवा सावळ्या रंगाची असेल तर त्यांना आपण बॅकलेस घातले तर कसेतरी दिसू… फक्त गोरा वर्ण असेल तर अशाच व्यक्ती बॅकलेस घालू शकतात किंवा त्यानांच असे ड्रेस चांगले दिसतात असे वाटते. पण तुम्ही मनातून पहिली ही गोष्ट मनातून काढून टाका. तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षाही तुमची त्वचा किती स्वच्छ आणि ग्लो करते हे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही रंगाला महत्व देऊ नका तर तुमच्या पाठीला ग्लो कसा आणता येईल ते पाहुया… करायची का सुरुवात


तुम्हालाही आहे का हा त्रास? 


पाठीवर पिंपल्स:


अनेकांना पाठीवर पिंपल्स येण्याचा त्रास असतो. हे पिंपल्स नेहमीच पाठीचे सौंदर्य बिघडवतात.कारण पिंपल्स आल्यानंतर ते अधिक काळ तुमच्या पाठीवर राहतात. शिवाय त्यामध्ये अनेकांचा पू देखील साचतो. त्यामुळे पाठ अधिक लाल दिसू लागते.


तुम्हाला पाठीवर खूप जास्त पिंपल्स असतील तर तुम्ही डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घेणे अपेक्षित आहे. त्यांनी दिलेल्या क्रिम्समुळे तुमच्या पाठीवरील पिंपल्स कमी होऊ शकतात आणि तुमची त्वचा चांगलीही दिसू शकते.


घरच्या घरी असे करता येईल ब्लीच, वाचा सोपी पद्धत


काळे डाग


पाठीवर जास्त काळ पिंपल्स राहिले तर काळे डाग अधिक काळ त्यावर राहतात. वर म्हटल्याप्रमाणे चेहऱ्याप्रमाणे पाठीची म्हणावी तशी काळजी घेता येत नाही. त्यामुळे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे पाठीवर आलेले पिंपल्स अधिक काळ पाठीवर राहतात. ते जर लवकर गेले नाही तर त्यांचे काळे डाग पाठीवर राहतात.


 भरपूर केस


खूप जणांना पाठीवर भरपूर केस असतात. त्यामुळे पाठ थोडी काळवंडलेली दिसते. काहीच्या पाठीला खूप जास्त लव असते. अशांना आपल्या पाठीवर इतके केस का असा प्रश्न पडत असेल तर काळजी करण्याचे काहीच गरज नाही कारण तुम्हाला यावरही अनेक इलाज करता येऊ शकतात. 


आला लग्नाचा सीझन, नैसर्गिक पद्धतीने आणा ग्लो


उदा. काहींची त्वचा उजळ असते.पण  त्यांना पाठीवर खूप केस असतात. त्यामुळे त्यांचा रंग कितीही उजळ असून त्यांना त्यांची पाठ आकर्षक वाटत नाही. त्यांना त्यांची लव सतत दिसत राहते. 


असा आणा तुमच्या पाठीला ग्लो


  • स्क्रब (Scrub)


scrub %282%29


पाठ हा शरीरावरील असा भाग आहे. जिथे तुमचा हात सहजासहजी पोहचू शकत नाही. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला घरच्या घरी कोणाकडून पाठ स्क्रब करुन घेणे शक्य असेल तर फारच चांगली गोष्ट आहे.  घरच्या घरी असे काही स्क्रब करता येतात ते कोणते ते पाहुया.


कॉफी स्क्रब:  एका प्लास्टीक बाऊलमध्ये जाड दळलेली कॉफी,लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करुन तयार स्क्रब  तुम्हाला कोणाच्या तरी मदतीने पाठीवर लावायचा आहे.या स्क्रबमुळे तुमची डेड स्कीन निघून जाईल आणि तुमच्या पाठीला ग्लो येईल.


साखर, लिंबू स्क्रब: बारीक साखर घेऊन त्यात लिंबू पिळा. तयार स्क्रब चोळा. ज्याप्रमाणे तुम्ही जेवणात साखर घातल्यानंतर जसा जेवणाला छान ग्लेझ येतो. अगदी तसाच तुमच्या पाठीला या स्क्रबमुळे ग्लेझ, ग्लो येतो.


  •  ब्लिचिंग  (Bleaching)


जर तुम्हाला अगदीच इन्स्टंट ग्लो आणायचा असेल तर ब्लिचिंग हा अगदी सोपा आणि इन्स्टंट पर्याय आहे. अगदी कोणत्याही पार्लरमध्ये पाठीला ब्लीच करुन दिले जाते. अगदी उद्यावर तुमचा काही कार्यक्रम असेल तर तुम्ही तुमच्या पाठीला मस्त ब्लीच करुन घ्या. त्यामुळे तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळेल आणि तुम्हाला अगदी आरामात तुम्हाला आवडीचा ड्रेस घालता येईल.


ब्लीचच्या बाबतीतही काळजी घेण्याची गोष्ट अशी की, तुम्ही कोणत्या प्रकारातील ब्लीच करणार आहात ते तुमच्या त्वचेला सूट होईल की नाही याची माहिती करुन घ्या. इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी जास्त ब्लीच पावडर त्यात घालू नका. त्याचे प्रमाण माहीत करुन घ्या आणि मगच घरच्या घरी ब्लीच करा.


  • मसाज (Body massage)


massage %281%29


मसाज करण्याचे फायदे तुम्हाला या आधीही आम्ही सांगितले आहे. वर म्हटल्याप्रमाणे पाठ हा असा भाग आहे की, जिकडे तुम्ही फार जास्त लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी मसाज चांगला असतो. अगदी त्याचप्रमाणे पाठीलाही मसाज केल्यानंतर तेथील नसा रिलॅक्स होतात. रक्तप्रवाह सुरळीत होतो. तुम्ही रिलॅक्स तर होताच शिवाय रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे तुम्हाला होणारा पिंपल्सचा त्रास कमी होतो.


महिन्यातून फुल बॉडी शक्य नसेल तर किमान पूर्ण पाठीचा मसाज तरी महिन्यातून एकदा करुन घ्या


  • पॅक (Pack)


pack


फेसपॅकप्रमाणे तुम्हाला पाठीला ही पॅक लावता येतात. खरंतरं तुम्ही लावायलाच हवा. बाजारात पाठीसाठी खास पॅक मिळतात ते देखील तुम्ही लावू शकता आणि तुमच्या पाठीला ग्लो आणू शकता.


  • वॅक्सिंग (Waxing)


केस असलेल्यांसाठी केस हा एक उत्तम पर्याय आहे. तो म्हणजे वॅक्सिंग तुम्ही केस काढण्यासाठी फुल बॉडी वॅक्सिंगदेखील करु शकता. हल्ली अनेक ठिकाणी  रिकाचे वॅक्स वापरुन पाठिवरील अतिरिक्त लव काढली जाते. पण ज्यांची त्वचा sensitive आहे त्यांनी मात्र  वॅक्स करु नका. कारण त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही हेअर रिमुव्हल क्रिम वापरु शकता. 


आता लग्नाचा सीझन सुरु झाला आहे तुम्हालाही तुमच्या पाठीला ग्लो आणायचा असेल तर तुम्ही लगेचच काही टीप्स वापरुन पाहा आणि आम्हालाही त्या कशा वाटल्या त्या कळवा.