ग्रीन टी पिण्याचे तुमच्या आरोग्यावर चांगले फायदे होतात हे तुम्हाला माहीत असेलच. वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी अनेकजणी ग्रीन टी पितात. आरोग्य सुधारण्यासोबत ग्रीन टी तुमच्या त्वचेवरदेखील फायदेशीर ठरते. यासाठीच अनेक सौंदर्योत्पादनांमध्ये ग्रीन-टीचा वापर केला जातो.
ग्रीन टीचे त्वचेवर होणारे फायदे-
पफी आईज आणि डार्क सर्कल्स कमी होतात
ग्रीन-टीमधील अॅंटिऑक्सिडंट आणि टॅनिन तुमच्या डोळ्याखालील त्वचेतील रक्तवाहिन्या संकुचित करतात. ज्यामुळे तुमच्या डोळ्याच्या त्वचेवरील सूजलेला अथवा फुगलेला भाग कमी होतो. तसेच ग्रीन-टीमधील व्हिटॅमिन के तुमच्या डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळंदेखील कमी करतात. यासाठी दोन ग्रीन-टी बॅग अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवा. थंड झालेल्या ग्रीन-टी बॅग अर्धातास डोळ्यांवर ठेवा आणि आराम करा. आठवड्यातून एकदा असे करण्याची सवय स्वतःला लावा.
सुर्यकिरणांपासून त्वचेचं रक्षण होते
त्वचेतील दाह कमी होण्यासाठी काही सौदर्य प्रसाधनांमध्ये ग्रीन-टीचा वापर केला जातो. ज्यामुळे सुर्यप्रकाशापासून तुमची त्वचा सुरक्षित राहू शकते. ग्रीन-टीचा वापर केल्यामुळे रॅशेस व सनबर्नचा त्रास तुम्हाला होत नाही. अशा उत्पादनांमध्ये असलेल्या ग्रीन-टीमधील घटक तुमच्या त्वचेला ओलसर व पोषक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला आराम मिळतो.
ग्रीन टी एक उत्तम टोनर आहे
ग्रीन-टी मुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण निघून जाते. त्वचेची छिद्रं मोकळी होतात. सहाजिकच तुम्ही आणखी सुंदर दिसू लागता. म्हणूनच ग्रीन टीचा तुम्ही टोनर म्हणून वापर करू शकता. यासाठी एका कपात पाणी घेऊन त्यात ग्रीन टी मिसळा. हे पाणी कापसाच्या मदतीने तुमच्या त्वचेवर लावा.
चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर ग्रीन-टी फारच फायदेशीर आहे. ग्रीन-टीमध्ये टॅनिन असतं. ज्यामुळे त्वचेतील तेलनिर्मिती रोखली जाते. नियमित ग्रीन-टी घेतल्याने तुमच्या त्वचेचा बॅलन्स उत्तम राहतो. तुमची त्वचा अधिक मऊ आणि चमकदार दिसू लागते.
त्वचा नितळ आणि मऊ होते
ग्रीन-टीमुळे तुमची त्वचा अधिक मुलायम आणि चमकदार होते. कारण ग्रीन-टी तुमच्या चेहऱ्यावरील काळे चट्टे दूर करते. यासाठी तुम्ही एक कप ग्रीन-टी सेवन शकता अथवा ग्रीन-टीच्या पानांची एक कोरडी पावडर तयार करुन ठेवा. या पावडरमध्ये मध आणि लिंबाचा रस टाकून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट् चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनीटे हा पॅक सुकू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा आणि टॉवेलने हळुवारपणे चेहरा टिपून घ्या.
पिंपल्स कमी होतात
तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स अथवा मुरमं असतील तर ग्रीन-टी तुमच्यासाठी वरदान ठरु शकते. ग्रीन-टीच्या पानांमध्ये कॅचेटीन मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमचा हॉर्मोनल बॅलन्स नियंत्रित राहतो. तुमचे हॉमोन्स नियंत्रित असल्याने तुमच्या चेहऱ्यावरील अॅक्नेची समस्या देखील आपोआप दूर होते. यासाठी तुमच्या पिंपल्सवर थंड पाण्यामध्ये गरम ग्रीन-टी मिसळा आणि लावा. एका कापसाच्या छोट्या गोळ्यावर हे मिश्रण घेऊन तुमच्या चेहऱ्यावरील अॅक्नेवर ते लावा. पंधरा ते वीस मिनीट झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. महिन्यातून कमीत कमी दोन ते तीनवेळा हे करुन बघा.
वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी
तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक