जाणून घ्या कापूरचे फायदे मराठीमध्ये (Health Benefits Of Camphor)

कापूर चे फायदे

भारतीय संस्कृतीत अनेक धार्मिक विधीत कापूर आरती करण्याची पद्धत आहे. देवाची पूजा करताना कापूर आरती अथवा धुपारती केली जाते. घरात कापूर जाळण्याने घरात शिरलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशी मान्यता आहे. यासाठी प्रत्येक शुभकार्यात कापूर जाळला जातो. मात्र धार्मिक विधीत अत्यंत पवित्र मानला जाणारा कापूर माणसाच्या आरोग्यासाठीदेखील अतिशय उपयुक्त आहे. कापराच्या वापराने अनेक आरोग्य समस्या दूर ठेवता येऊ शकतात. कोरोनाच्या काळात संक्रमण दूर ठेवण्यासाठी घरात कापूर जाण्याचा सल्ला दिला जातो. कारण कापरामुळे घर निर्जंतूक होते. यासाठीच जाणून घ्या कापूरचे आरोग्य फायदे


वेदना आणि सूज कमी होते (Relieves Pain And Swelling)


जर एखाद्या ठिकाणी मुका मार लागला असेल तर स्नायूंना सूज येऊन तो भाग फुगल्याप्रमाणे वाटू लागतो. सूज आल्यामुळे त्या भागातून प्रचंड वेदना जाणवतात. अशावेळी सूज आलेल्या भागावर तुम्ही कापूर लावू शकता. कारण कापरामध्ये दाह आणि जळजळ कमी करण्याची क्षमता असते. कापराची पूड करून तेलासोबत त्या भागावर लावा आणि काही मिनीटे तो भाग बांधून ठेवा. असं नियमित केल्यामुळे हळूहळू त्या भागावरची सूज कमी होते.


त्वचेवरील रॅशेस कमी होतात (Alleviates Skin Rashes)


त्वचेच्या समस्यांमध्ये आणखी एक मोठी समस्या जाणवते ती म्हणजे त्वचेवरील रॅशेस. उष्णता, घाम, सतत पाण्यात काम करणे, अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. त्वचेवरील पुरळ कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कापराचा  वापर करणे. कारण कापरामुळे तुमच्या त्वचेवरील पुरळ आणि लालसरपणा लगेच कमी होतो. यासाठी पाण्यात थोडं कापराचं तेल मिसळा आणि पुरळ आलेल्या भागावर लावा. ज्यामुळे त्या भागावरील पुरळ हळू हळू कमी होईल. यासोबतच जाणून घ्या पुरळ घरगुती उपाय, असे कमी करा अंगावरील रॅशेस (Home Remedies For Skin Rashes In Marathi)


भाजलेली त्वचा बरी होते (Heals Burns)


कापराचे फायदे अनेक आहेत कारण कापरामध्ये वेदना  कमी  करणारे आणि त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक मलम अथवा क्रिममध्ये कापराचा वापर केला जातो. तुम्ही त्वचेवरील भाजलेली जखम बरी करण्यासाठी त्वचेवर कापराचे तेल लावू शकता. व्हॅसलीनमध्येही कापराचा अंशतः वापर केलेला असल्यामुळे ते वापरण्यासही काहीच हरकत नाही. व्हॅसलीन मुळेही त्वचेच्या अनेक समस्या बऱ्या होतात. याशिवाय कापूर तेलात मिसळून लावण्यामुळे त्वचेची जळजळ लगेच कमी होते. 


आर्थ्राटीसवर उपचार (Treats Arthritis)


जर तुम्हाला आर्थ्राटीस असेल तर सांध्याच्या दुखण्यामुळे तुम्ही पुरते बेजार होता. आर्थ्राटीसमुळे साधं उठणं आणि बसणं अशा दैनंदिन क्रिया करणंदेखील कठीण जाऊ शकतं. मात्र कापूर तुमच्या या त्रासावर वरदान ठरू शकतो. यासाठी तेलामध्ये कापूर मिसळा आणि सांध्यावर त्याने मालिश करा. कापरातील थंडाव्यामुळे तुमच्या सांधेदुखीवर आराम मिळतो. दाह आणि वेदना कमी झाल्यामुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे व्यवस्थित करता येऊ शकतात. यासोबतच जाणून घ्या आर्थ्रायटिसच्या रुग्णांसाठी आहार.


नखांचे फंगस कमी होते (Treatment Of Nail Fungus)


कापूर हे एक परिणामकारक निर्जंतूक करणारे साधन असल्यामुळे याचा वापर तुम्ही तुमच्या नखांच्या फंगसवरही करू शकता. कापरामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या आणि बुरशी नष्ट होतात. यासाठीच जर तुमच्या नखांना फंगस होत असेल. तर तेलात कापूर मिसळा आणि त्या तेलाने नियमित नखांना मालिश करा. नखांवर कोणत्या प्रकारचे फंगस झाले आहे हे स्कीन स्पेशलिस्टकडून जाणून घ्या आणि त्यावर त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करा


Treatment of Nail Fungus


शांत झोप लागण्यास मदत (Helps Induce Sleep)


निद्रानाश हा आजकाल अनेकांना जाणवणारी आरोग्य समस्या आहे. अपुरी झोप मिळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कारण चिंता, काळजी, नैराश्य, आरोग्य समस्या अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला रात्री उशीरापर्यंत झोप लागत नाही. झोप लागण्यासाठी सतत गोळ्या घेणं आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. यासाठीच या समस्येला बरं करण्यासाठी कापराचा वापर करा. कापरामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला शांत झोप लागते. कापराचे तेल उशीवर टाकून त्या मंद सुवासात झोपण्याचा प्रयत्न करा. यासोबतच वाचा शांत झोप लागण्यासाठी उपाय (Good Sleeping Tips In Marathi)


सर्दी खोकला बरा होतो (Treats Cold And Cough)


सर्दी खोकला हे संसर्गजन्य विकार संक्रमित व्यक्ती अथवा वातावरणातील बदलांमुळे होत असतात. कोरोनाच्या काळात सर्दी खोकला होणार नाही याची विशेष काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. सर्दी खोकला बरा करण्यासाठी तुम्ही कापराचा वापर करू शकता. कारण कापरामध्ये वातावरण निर्जंतूक करणारे गुणधर्म असतात. यासाठीच विक्स वेपोरेबमध्येही कापराच्या तेलाचा वापर केला जातो. तुम्ही घरात कापूर जाळून, कापराच्या तेलाचा अथवा विक्स वेपोरेबचा वापर करून  तुमची  सर्दी बरी करू शकता. 


एक्नेवर घरगुती उपचार (Remedies For Acne)


कापूर त्वचेसाठी अतिशय उत्तम असतो. त्यामुळे कापराचा फायदे तुम्ही तुमच्या त्वचेवरील एक्ने अथवा पिंपल्स कमी करण्यासाठी नक्कीच करू शकता. कापराच्या तेलामुळे तुमच्या त्वचेतील पिंपल्समुळे निर्माण झालेले डाग, काळसरपणा, लालसर लाली आणि दाह कमी होतो. यासाठीच नारळाच्या तेलात कापूर मिसळा आणि तुमच्या पिंपल्सवर लावा. याचे कोणतेही दुष्परिणाम  तुमच्या त्वचेवर होत नाहीत. कापराचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो. 


केसांची वाढ चांगली होते (Promotes Hair Growth)


केस गळणे ही एक गंभीर समस्या आहे. कारण केस गळण्यामागे आणखी अनेक कारणे आणि आरोग्य समस्या कारणीभूत असू शकतात. त्यामुळे जर तुमचे प्रमाणाबाहेर आणि सतत केस गळत असतील तर त्यावर योग्य उपचार करायला हवेत. कापराच्या तेलाने तुम्ही तुमचे केस गळणे  कमी करून केसांच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकता. यासाठी तुमच्या रेग्युलर तेलात कापराचे तेल मिसळा आणि केसांवर उपचार करा. 


Promotes Hair Growth


केसांतील उवांवर घरगुती उपचार (Home Remedy For Head Lice)


लहान मुलांना केसात उवा झाल्या तर त्या कमी करणे ही पालकांसाठी एक समस्याच असते. कारण लहान मुले इतर लहान मुलांच्या सतत संपर्कात येत असतात. उवा आणि लिखा या एकमेकांच्या संपर्कातून संक्रमित होत असतात. ज्यामुळे लहान मुलांच्या डोक्यात उवा होणे ही गोष्ट न थांबवता येण्यासारखी आहे. मात्र यावर तुम्ही कापराचा उपचार करू शकता. कारण उवांवर कापराचे चांगला परिणाम होतो. उवा कमी करण्यासाठी नारळाच्या तेलात कापूर भिजवा आणि ते तेल केसांना लावा. काही मिनीटांनी केसांना शॅंपू करा ज्यामुळे उवा मरून जातील. 


camphor


कापराचे फायदे याबाबत प्रश्न (FAQs)


1. कापूर जाळणे आरोग्यासाठी चांगले असते का ?


कापूर चे आरोग्य फायदे अनेक आहेत कारण कापरात अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि फंगल आणि अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचा शरीरावर चांगलाच परिणाम होतो. 


2. कापूर फुफ्फुसांसाठी चांगला असतो का ?


कापरामध्ये वातावरण निर्जंतूक करणारे गुणधर्म असल्यामुळे कापराने हवा शुद्ध होते. सहाजिकच याचा चांगला परिणाम तुमच्या फुफ्फुसावर होतो. 


3. कापूर खाल्ला तर काय होते ?


कापूर जाळणे आणि कापराचा त्वचेवर वापर करणे जरी हितकारक असले तरी कापूर खाणे आरोग्यासाठी हितकारक असेलच असं नाही. बऱ्याचदा यामुळे श्वसनाचे त्रास, चक्कर अशा गंभीर समस्या निर्माण  होऊ शकतात. त्यामुळे कापूर शक्यतो खाऊ नये. 


फोटोसौजन्य - शटरस्टॉक