निरोगी राहण्यासाठी नियमित प्या 'नारळपाणी' in Marathi | POPxo

निरोगी राहण्यासाठी नियमित प्या 'नारळपाणी'

निरोगी राहण्यासाठी नियमित प्या 'नारळपाणी'

नारळपाणी हा निसर्गाचा एक चमत्कार आहे. कठीण कवच असलेल्या शहाळ्यात दडलेल्या मधुर आणि थंड पाण्यात तहान भागवण्याची क्षमता आहे. नारळपाण्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म दडलेले आहेत. ज्यामुळे नारळपाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आजारी रूग्ण, वृद्ध माणसे आणि गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता असते. तज्ञांच्या मते नारळपाणी पिण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ उत्तम आहे. कारण या काळात शरीराला जास्त उर्जेची गरज असते. व्यायाम अथवा शारीरिक कसरत केल्यावर नारळपाणी पिण्याने तुम्हाला फ्रेश वाटू शकते. नारळपाण्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि उत्साही दिसता. यासाठीच नारळपाणी पिण्याचे हे आरोग्यदायी जरुर वाचा.


coconut water 1 %281%29


नारळ पाण्याचे आरोग्यदायी फायदे -


  • नारळपाण्यामुळे शरीरातील विषद्रव्ये युरीनद्वारे बाहेर टाकली जातात. ज्यामुळे तुमचा मूत्रमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते. किडनी निरोगी राहण्यासाठी दिवसाची सुरूवात नारळपाण्याने करा.

  • नारळपाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळते आणि फ्रेश वाटू लागतं.

  • नारळपाण्यात पुरेसे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. हाडे आणि दातांच्या मजबूतीसाठी गरजेचे असते. मॅग्नेशियमुळे स्नायू बळकट होतात. यासाठी आजारी माणसे आणि गरोदर महिलांनी नारळपाणी प्यावे.

  • नारळपाण्यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालते. यासाठी थायरॉईड असतुंलन असलेल्या लोकांनी दररोज सकाळी नियमित नारळपाणी प्यावे.

  • नारळपाण्यामुळे वजन नियंत्रित राहते. कारण नारळपाण्यात कॅलरीज कमी असतात. शिवाय नारळपाण्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भुक कमी लागते. यासाठी वजन कमी करणाऱ्या लोकांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दितात.

  • नारळपाण्यात पुरेसे अॅंटी ऑक्सिडंट असल्यामुळे उन्हाळाच्या दिवसांमध्ये नारळपाणी पिण्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.

  • थोडक्यात नारळपाणी सर्वांथाने आरोग्यासाठी उत्तम आहे. व्यायाम अथवा अती श्रम केल्यावर नारळपाणी पिण्याने तुम्हाला इस्टंट एनर्जी मिळते. वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर मधल्या काळात नारळपाण्याने तुम्हाला भुकेवर नियंत्रण ठेवणं सोपं जाऊ शकतं.

  • नारळपाण्यामुळे रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. ज्यांचा रक्तदाब अनियंत्रित राहतो. नारळात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांना नारळपामी पिण्याने फायदा होऊ शकतो.

  • जर तुम्हाला सतत डोकेदुखी अथवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर नियमित नारळपाणी प्या. नारळातील मॅग्नेशियममुळे मायग्रेनतचा त्रास हळूहळू कमी होतो. असं जरी असलं तरी जर तुम्हाला सतत आणि त्रासदायक मायग्रेनची समस्या असेल तर घरी उपचार करू नका. त्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.


coconut water %281%29


मधुमेहींनी नारळपाणी पिणे हितकारक आहे का?


नारळपाण्यामध्ये रक्तातील साखर अती प्रमाणात वाढत नाही. शिवाय त्यामध्ये इतर अनेक चांगले घटक असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी हितकारक असतात. त्यामुळे मधुमेहींनी नारळपाणी पिण्यास काहीच हरकत नाही. मात्र नारळपाणी प्रमाणात प्यावे कारण अती प्रमाणात कोणतेही पेय अथवा पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.


उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी प्या 'लिंबूपाणी'


उष्माघाताची लक्षणे आणि उपाय (Heat stroke symptoms and treatment in Marathi)


उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय


उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे


मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक