सर्दी, खोकला आणि कफ यांचा त्रास पाऊस आणि थंडीच्या दिवसात हमखास जाणवतो. सर्दीमुळे तुम्हाला तापासारखं वाटतं आणि कधीकधी अंगदुखीही जाणवते. सामान्य सर्दीमुळे जेव्हा तुम्हाला खोकला किंवा ताप होतो तेव्हा घरी राहून आराम करण्यासारखा आनंद नाही. अशा परिस्थितीत डोकेदुखी, अंगदुखी, ताप, नाक गळणं इत्यादी त्रासदायक गोष्टी घडू शकतात. तुम्ही यावर औषधंही घेऊ शकता पण या त्रासावर तुम्ही घरच्या घरीही काही उपचार करून या त्रासापासून सुटका मिळवू शकता.
Table Of Content -
सर्दी-खोकला झाल्यास या गोष्टी टाळा
घरच्या घरी बनवा तुळशीचा काढा आणि कफ सिरप
सर्दी खोकला होण्याची अनेक कारण असू शकतात. पण मुख्यतः अॅलर्जी, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि अॅसिडीटी ही सर्दी खोकला होण्याची प्रमुख कारण आहेत.
सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही प्रभावी आणि गुणकारी उपाय घरच्या घरी करू शकता. यासाठी तुम्हाला अँटीबायोटीक गोळ्यांचा वापर करण्याची काहीच गरज नाही. चला जाणून घेऊया सर्दी खोकल्यावरील काही घरगुती उपाय -
कच्च्या मधात अँटीमायक्रोबायल आणि अँटीऑक्सीडंट गुण चांगल्या प्रमाणात असतात. मध तुमची प्रतिकारकशक्ती वाढवतं आणि खोकल्याचा प्रभावही कमी करतं. पण लक्षात ठेवा की, 1 वर्षाहून कमी वयाच्या मुलांना कधीही मध देऊ नये. नियमितपणे मधाचं सेवन केल्यास सर्दी, खोकला आणि कफचा त्रास सहसा जाणवत नाही.
चिकन सूप हा सर्दी खोकल्यांसाठी अगदी उत्तम घरगुती उपाय आहे. त्यातही जर तुम्ही भाज्यांसोबत चिकन सूपचं सेवन केल्यास तुमच्या शरीराला उर्जा मिळते. तसंच हे शरीरातील न्यूट्रीफिल या घटकाची गती कमी करतं. ज्यामुळे सर्दी-खोकला प्रभावित ठिकाणी याचा परिणाम लगेच जाणवतो. त्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळतो.
आलं हे आयुर्वेदातील सर्वात प्रभावी औषधी वनस्पतींपैकी एक आहे. यामध्ये अँटीव्हायरल गुण चांगल्या मात्रेमध्ये असतात. आल्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. याचं सेवन केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास नक्कीच कमी होईल. आलं तुम्ही कच्चं खाल्ल किंवा आल्याचा चहा करून घेतला तर खूप फरक जाणवेल. आल्याची पेस्ट बनवून त्याचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि मध घालून चहा तयार करा. तुमचा सर्दी खोकला लगेच कमी होईल.
लसूण हा अँटीमायक्रोबाईलयुक्त आहे. तुम्ही लसूणाचा उपयोग केल्यास सर्दीची लक्षण कमी होतात. लसूण नियमित रूपात सेवन केल्यास सर्दी खोकल्याच्या सुरूवातीच्या लक्षणातच बरं वाटेल. लसूण उष्ण प्रकृती असल्याने शरीराला उष्णता आणि पोषक तत्व मिळतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला झाल्यास नक्की लसूण वापरा. लहान मुलांना लसूण उष्ण पडू नये म्हणून त्यांच्या गळ्यात लसणाची माळ बांधली जाते.
तुमच्या शरीराच्या विकासासाठी व्हिटॅमीन सी फार महत्त्वपूर्ण आहे. आरोग्यासाठी व्हिटॅमीन सी खूपच फायदेशीर आहे. संत्र, लिंबू, द्राक्ष, आवळा आणि पालेभाज्या यांचं सेवन केल्यास तुमची व्हिटॅमीन सी ची गरज पूर्ण होते. गरम चहामध्ये लिंबाचा रस आणि मध घातल्यास तुम्हाला सर्दीदरम्यान होणारा कफचा त्रास लगेच कमी होतो. व्हिटॅमीन सीचं नियमित सेवन केल्यास तुमचं सर्दीच्या संसर्गापासून संरक्षण होईल.
आपल्या प्रत्येकालाच माहित आहे की, घसा खवखवू लागला किंवा सर्दी खोकल्याचा त्रास सुरू होताच पहिला सल्ला मिळतो तो मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या करण्याचा. कोमट पाण्यासोबत मीठ घातल्याने कफच प्रमाण लगेच कमी होतं. कारण हे अँटीबॅक्टेरियलचं काम करतं.
स्वयंपाकघरात सर्दी खोकल्यावर अगदी सहज उपलब्ध असलेला उपचार म्हणजे हळद. हळदीमध्ये अँटीऑक्सीडंटचं प्रमाण खूप चांगलं असतं. त्यामुळे हे खूपच गुणकारी आहे. हळद आणि गरम दूध हे सर्दी-खोकल्यावरील सर्वात सोपा असा घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात एक छोटा चमचा हळदी घालून सेवन करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.
मसाला चहा अगदी दैनंदिन जीवनातही काही लोक आवर्जून पितात. पण तुम्हाला माहीत आहे का हाच मसाला चहा, सर्दीवरही गुणकारी आहे. मसाला चहामध्ये तुळस, आल आणि काळीमिरी घालून प्यायलास फारच फायदेशीर आहे. या तिन्ही घटकांमध्ये भरपूर औषधीय गुण आहेत.
सर्दी आणि खोकल्यावर अळशीच्या बिया हा फारच प्रभावी उपाय आहे. यासाठी अळशीच्या थोड्या बिया पाण्यात उकळून घ्या. हे पाणी आटेपर्यंत उकळून घ्या. मग थंड करून हे पाणी लिंबाचा रस आणि मध घालून प्या. यामुळे तुमच्या सर्दी-खोकल्यावर लगेच परिणाम होईल.
आल्याचा फक्त चहाच नाहीतर चाटणही सर्दी-खोकल्यावर गुणकारी आहे. जर तुम्हाला आल्याचा चहा आवडत नसेल तर तुम्ही आलं आणि मीठाचं चाटण किंवा आल्याचे छोटे छोटे तुकडेही चावून खाऊ शकता. यामुळे तुमच्या घश्याला लगेच आराम मिळेल.
गाजराचा रस हा फक्त डोळ्यांसाठीच नाहीतर सर्दी खोकल्यावरही गुणकारी आहे. तुम्ही यासाठी कच्चं गाजरही खाऊ शकता किंवा गाजराचा रसही पिऊ शकता.
कधी कधी अनेक उपचार करण्याऐवजी आपल्या शरीराला गरज असते ती शांत झोपेची. चांगल्या आणि शांत झोपेनेही आपल्याला बरं वाटतं. एखाद्या औषधाचा परिणाम चांगली झोप घेतल्याने त्वरित दिसून येतो. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यावर चांगली झोप नक्की घ्या.
सर्दी झाल्यावर लगेच होणारा परिणाम म्हणजे नाक चोंदण. नोक चोंदल्यासारख किंवा बंद झालं असं आपण म्हणतो. जर तुम्ही गरम पाण्याची वाफ घेतल्यास हळूहळू नाक मोकळं होतं आणि श्वास घ्यायलाही त्रास होत नाही.
- तुमच्या आहारात किण्वित किंवा फेमेंटेड खाद्यपदार्थ आणि पेयांचा वापर दैनंदिन आणि सर्दी खोकला झाल्यावर करावा. हे तुमच्या जलद पचनासाठी चांगले असतात. हा आहार घेतल्यास तुमची प्रतिकारकशक्ती वाढते.
- सर्दी झाल्यावर साखर आणि अॅसिडपासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांचं सेवन टाळा.
- वर सांगितल्याप्रमाणे या काळात जास्तीत जास्त व्हिटॅमीन सी युक्त पदार्थांचं सेवन करा.
- सर्दी-खोकला झाल्यावर आपल्या शरीराच्या स्वच्छतेची जास्तीत जास्त काळजी घ्या. वेळोवेळी हात धुवा.
- जास्त सर्दी झाल्यास जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
- सर्दी झाल्यावर जास्त ऊन आणि धूळीचा संपर्क टाळा. त्यामुळे सर्दी जास्त वाढेल.
तुळशीची पानं, त्याचा रस आणि चहा याचा योग्य वापर केल्यास अनेक गंभीर आजारांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.
तुळशीचा काढा बनवण्याचं साहित्य (Ingredients):
तुळशीची 10-12 पान
लेमन ग्रास
एक इंच आल्याचा तुकडा (किसून घ्या)
4 कप पाणी
गूळ 3 चमचे किंवा तीन छोटे तुकडे
तुळशीचा काढा बनवण्याची कृती (Process):
सर्वात आधी तुळशीची पान आणि लेमनग्रास चांगलं धुवून घ्या. नंतर भांड्यात मध्यम आचेवर पाणी उकळण्यासाठी ठेवा. हलकंस गरम झाल्यावर त्यात तुळशीची पान, लेमन ग्रास आणि आलं घालून 4-5 मिनिटं उकळून घ्या. यानंतर गूळ घालून गॅस बंद करा. गूळ विरघळेपर्यंत चमच्याने फिरवत राहा. एक-दोन मिनिटाने थंड झाल्यावर गाळून गरमगरम प्या. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये काळीमिरीही घालू शकता. अजून चव हवी असल्यास वेलचीही कुटून घालू शकता. लेमन ग्रास न मिळाल्यासही तुम्ही तुळशीचा काढा बनवू शकता.
डॉक्टरांकडे जाण्याआधी तुम्ही घरच्या घरी खोकल्यावर कफ सिरप बनवू शकता. हे सिरप बनवण्यासाठी तुम्हाला लागेल. छोटा आल्याचा तुकडा, किसलेलं लिंबू, एक कप गरम पाणी घ्या. हे सर्व मिश्रण मंद आचेवर गरम करा. नंतर त्यात मध घाला. नंतर त्यात लिंबाचा रस घालून पुन्हा थोडं गरम करा. तुमचं घरगुती कफ सिरप तयार आहे.
कफ सिरप बनवण्यासाठी तुम्ही आल्याऐवजी ग्लिसरीनचाही वापर करून शकता. यासाठी तुम्हाला लागेल मध, लिंबाचा रस, खायचं ग्लिसरीन आणि एक कप. हे सिरप बनवण्यासाठी एका वाडग्यात 1/4 कप ग्लिसरीन घ्या, त्यात तेवढाच मध आणि लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करा. हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने घ्या.
कफ सिरप बनवल्यावर ते आवर्जून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. म्हणजे पुढील काही दिवस तुम्हाला त्याचा वापर करता येईल.
बकव्हीट मधाचा (buckwheat honey) वापर हा 2 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांमधील खोकल्यावर फारच गुणकारी असतो.
जर तुमच्याकडे ताजे आल्याचे तुकडे नसतील तर तुम्ही घरच्या घरी कफ सिरप बनवताना सुंठ पावडरचाही वापर करू शकता.
- 1 ते 5 वयाच्या मुलांना प्रत्येक दोन तासाने अर्धा ते एक चमचा हे सिरप द्या.
- 5 ते 12 वयाच्या मुलांना दर दोन तासांनी दोन चमचे सिरप द्या.
- 12 वय आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांना दर चार तासांनी 1 ते 2 चमचे सिरप द्या.
कफ-खोकला झाल्यास तो साधारणतः दोन ते तीन आठवड्यात बरा होतोच. पण तुमचा कफ-खोकला जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळासाठी राहिला तर तुम्ही डॉक्टरांकडे त्वरित जायला हवं.
कफचा त्रास हा रात्रीच्या वेळी जास्त जाणवतो. जेव्हा आपण बेडवर झोपतो तेव्हा स्नायू मागे खेचले जातात आणि त्यामुळे तुम्हाला कफचा त्रास जास्त जाणवतो. हे टाळायचं असल्यास तुम्ही डोकं थोडं वर ठेवून झोपू शकता. त्यामुळे त्रास कमी होईल.
मासा जसा सतत पाणी पित असतो त्याप्रमाणे तुम्ही कफ-खोकला झाल्यावर जास्तीत जास्त हायड्रेटेड राहा. ज्यामुळे कफ शरीराबाहेर फेकला जाईल. व्हिटॅमीन सीचा आहारात समावेश करा.
सर्दीचा त्रास हा साधारणतः 2 ते 3 दिवस होतो. या काळात तुमच्यामुळे इतरांनाही संसर्ग होण्याची भीती असते. जास्तीतजास्त सर्दीचा त्रास हा 3 आठवड्यांपर्यंत जाणवतो. पण शक्यतो व्यवस्थित काळजी घेतल्यास सर्दी एका आठवड्यातच बरी होते.
सर्दीमुळे अगदी बेजार झाल्यासारखं होतं. तसंच ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला इतर गोष्टीचंही इन्फेक्शन होण्याची भीती असते. त्यामुळे तुम्हाला सर्दीचा जास्तच त्रास होत असल्यास शक्यतो घरी राहून योग्य आहार घ्यावा आणि जास्तीत जास्त आराम करावा.