10 मे राशीफळ, वृषभ राशीने आज भांडणापासून लांब राहणेच योग्य

10 मे राशीफळ, वृषभ राशीने आज भांडणापासून लांब राहणेच योग्य

 मेष : अडकलेला पैसा परत मिळेल


आज तुमचा अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नव्या सहकाऱ्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.सामाजिक कार्यात तुम्हाला सहभागी होण्याची गरज आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. वाहन खरेदीचा योग आहे


.कुंभ : विरोधकांवर मात कराल


आज संततीकडून आनंदवार्ता मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. विरोधकांवर मात कराल. धार्मिक कामांमध्ये रुचि वाढेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कामांमध्ये मन रमेल.


मीन: नवीन काम सुरु करु नका


आज कोणतेच नवे काम सुरु करु नका. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामांमध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांकडे लक्ष द्या. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील. रचनात्मक कामात प्रगती होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.


 वृषभ: भांडणापासून लांब राहा


काम पुढे ढकण्याची सवय तुम्हाला करिअरसाठी महागात पडणार आहे. कामाच्या ठिकाणी वैचारिक मतभेद वाढल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. भांडणापासून लांब राहा. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. वाहन चालवताना सावधान!


मिथुन: सांभाळून चाला


जोडीदाराला आज काहीतरी दुखापत होण्याची शक्यता आहे. सांभाळून चाला. संततीकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नोकरीमध्ये काही तरी बदल करावा असे वाटेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वाढणाऱ्या खर्चामुळे नवीन काही काम सुरु करु शकता.


कर्क: भावंडांमधील रुसवा दूर होईल


भाग्य तुमच्यासोबत आहे. नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: लहान भाऊ किंवा बहिणीसोबत असलेला रुसवा दूर होणार आहे. आरोग्यासाठी अत्यंत चांगला असा काळ आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. देण्याघेण्याच्या बाबतील थोडी काळजी घ्या


सिंह: मेहनतीचे फळ मिळेल


विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. व्यवसायात राजकारणातील व्यक्तिचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नति मिळण्याची संधी आहे. नोकरीत तुम्हाला तुमचे सहकारी मदत करु शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.


कन्या: आर्थिक नुकसान होण्याची शक्यता


कन्या राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा तुमचे वाहन अचानक खराब होऊ शकते.कौटुंबिक खर्च नियंत्रणात आणा. बजेट बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पूर्ण करताना अडचणी येऊ शकतात. प्रियकराशी झालेली भेट सुखद असेल.


तूळ: देण्याघेण्याच्या बाबतीत सावध राहा


आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन आरोग्य सुधारेल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. व्यवसायात नव्या ओळखीचा फायदा होईल. देण्याघेण्याच्या बाबत सावध राहा. कोणाला त्रास होईल असे बोलणे टाळा. तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल.


वृश्चिक: प्रेमात निराशा


प्रेमात निराशा होण्याची शक्यता आहे. जोडीदारापासून दूर राहावे लागेल. संततीचा प्रश्न सतावेल. कामाच्या ठिकाणी झालेल्या बदलाचा तुम्हाला फायदा होईल. उत्पन्नात वाढ होईल. नवे काम सुरु होण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीतील खटला सुटेल.


 धनु: कौटुंबिक संपत्तीचा वाद मिटेल


आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संपत्तीचा वाद मिटू शकतो. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा योग आहे. अनावश्यक खर्च करु नका. खासगी आयुष्यात तुमचे नाते अधिक खुलत जाईल. कठीण कामांपासून दूर राहा. ओळखींचा फायदा होईल.


मकर: कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील


आज कानदुखीचा त्रास होऊ शकतो. अध्यात्मात मन रमेल.प्रेम संबंध जपून ठेवा. आर्थिक प्रश्न सुटतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या योग्यतेमुळे तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढतील.समाजात मान- सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील.


हे ही वाचा


मेष राशासाठी कसे असेल 2019 हे वर्ष, वाचा


राशीनुसार कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली


राशीनुसार तुम्ही करा या सेक्स पोझिशन