11 मे, 2019 चं राशीफळ, मीन राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक समस्या सुटतील

11 मे, 2019 चं राशीफळ, मीन राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक समस्या सुटतील

मेष - उन्नती होण्याच्या मार्गात येईल अडचण


कार्यालयात विरोधकांपासून सावध राहा. उन्नती होण्याच्या मार्गात अडचणी येतील. व्यवसायात चढउताराची परिस्थिती उद्भवेल. कुटुंबातील संबंध सुधारण्याकडे कल ठेवा. आपल्या जोडीदाराबरोबर धार्मिक कार्याचं आयोजन कराल. राजकारणातील महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.


कुंभ - तुमच्या आईला पायाचा त्रास होण्याची शक्यता


तुमच्या आईला गुढघेदुखी अथवा पायाचा त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या खाण्या-पिण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. बेजबाबदारपणे वागू नका. तुमच्या मुलांकडून चांगल्या वार्ता समजण्याची शक्यता आहे. अचानक धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील.


मीन - कौटुंबिक समस्या सुटतील


तुमचा पगार वाढल्यामुळे कौटुंबिक समस्या सुटतील आणि नात्यामध्ये सुधारणा होईल. प्रेमसंबंध रोमँटिक राहतील. व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमच्या सहकाऱ्यांचा सहयोग मिळेल. राजकारणात तुमची जबाबदारी वाढेल. कायद्याच्या कचाट्यातून तुमची सुटका होईल.


वृषभ - आर्थिक लाभ होईल


नवे व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसंच आर्थिक लाभदेखील होतील. तुमच्या संपत्तीसंदर्भातील वाद मिटण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं मार्गी लागतील. मित्रांचा सहयोग फायदेशीर ठरेल. कुटुंबामध्ये सुख शांती समधान लाभेल. वाहन नीट चालवा.


मिथुन - नोकरीमध्ये अडचण येण्याची शक्यता


आज कार्यालयात घाईघाई केल्यास, चुका होऊ शकतात. नोकरीमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. कोणतंही महत्त्वाचं काम हे विचारपूर्वक निर्णय घेऊनच करा. राजकारणातील जबाबदारी वाढेल. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.


कर्क - आरोग्याची काळजी घ्या


तुमचं आरोग्य आज बिघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराचीही तब्बेत खराब होऊ शकते. व्यवसाय अथवा नोकरीसंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. आपल्या हुशारीने रखडेलेली कामं पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान मिळेल. आत्मविश्वास वाढेल.


सिंह - एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला आकर्षण जाणवेल


जोडीदाराबरोबर भावनात्मक राहण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या खास व्यक्तीचं तुम्हाला आकर्षण वाटेल. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात लाभ आणि उन्नती होण्याची संधी चालून येईल. कोणत्यातरी संस्थेद्वारे तुमचा सन्मान होईल.


कन्या - विद्यार्थ्यांची अभ्यासात रूची वाढेल


लेखन आणि अभ्यासात विद्यार्थ्यांची रूची वाढेल. भागीदारीत काम सुरू करा. व्यवसायात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. रचनात्मक कार्यांमध्ये व्यस्त राहाल. सन्मानात वाढ होईल. विवादापासून दूर राहा. कर्मक्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल. आरोग्यासंबंधित थोडी काळजी वाटेल.


तूळ - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता


व्यवसाय अतिशय धीम्या गतीने चालण्याची शक्यता आहे. कोणतीही पैशांची गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. मानसिक शांती मिळवण्यासाठी तुम्हाला त्रास घ्यावा लागेल. आई - वडिलांचं प्रेम आणि सहवास मिळेल. कायद्याच्या बाबीपासून सुटका होईल.


वृश्चिक - रक्तदाबासारख्या आजारांमध्ये होईल सुधारणा


रक्तदाबासारख्या आजारांमध्ये होईल सुधारणा होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. आत्मसन्मान आणि सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक कामांमध्ये प्रगती होईल. कौटुंबिक जीवन सुखकर होईल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. वाहन नीट चालवा.


धनु - नात्यांमध्ये तणाव येण्याची शक्यता


खासगी गोष्टींमुळे नात्यांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. कोणाचीही टीका होण्यापासून स्वतःला दूर ठेवा. तुमची इमेज बिघडू देऊ नका. कोणत्याही सहकाऱ्याच्या वाईट वागणुकीने तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसायात चढउतार होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.


मकर - धनप्राप्तीचा योग आहे


नव्या योजना पूर्ण करण्यासाठी आज चांगला योग. व्यावसायिक विस्तारासाठी तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे. कार्यालयात उन्नती होईल. आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. संततीच्या विवाहामध्ये उशीर होत असल्यामुळे चिंता वाढण्याची शक्यता. धार्मिक कार्यात रस वाढेल.