12, मे 2019 चं राशीफळ, कुंभ राशीला महागडं गिफ्ट मिळण्याची शक्यता

12, मे 2019 चं राशीफळ, कुंभ राशीला महागडं गिफ्ट मिळण्याची शक्यता

मेष - खासगी संबंधातील मतभेद दूर होतील


खासगी संबंधांमध्ये काही मतभेद असतील तर ते दूर होतील. मित्रांच्या सहायाने व्यापारातील त्रास कमी होईल. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मदतीच्या वेळी जोखीम उचलायला तयार राहा. देण्याघेण्याबाबत असलेले त्रास संपतील. रखडलेली कामं आरामात पूर्ण होतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.


कुंभ - महागडं गिफ्ट मिळण्याची शक्यता


आई - वडिलांच्या प्रेमासह महागडं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. चल - अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना होऊ शकते. परदेशात जाण्याचा योग येऊ शकतो. रखडलेली कामं पूर्ण होतील. विचारपूर्वक निर्णय घेऊन गुंतवणूक करा.


मीन - हवामानामुळे आजारी पडण्याची शक्यता


हवामानामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. आपली दैनंदिनी नीट ठरवा. संपत्ती खरेदी करताना त्रास होईल. खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. तात्कालिक लाभासाठी तडजोड करण्यासाठी तयार राहा. धार्मिक कार्यात मन रमेल.


वृषभ - मेहनत करूनही यश मिळणं कठीण आहे


आज मेहनत करूनही तुम्हाला यश मिळणं कठीण आहे. धैर्य ठेवा. कार्यालयात तुम्हाला जोखीम घ्यावी लागले. द्विधा मनस्थिती असल्यामुळे कामात मन लागणार नाही. रागावर नियंत्रण ठेवा. लहान - सहान आजाराने त्रस्त व्हाल. जोडीदाराची साथ मिळेल.


मिथुन - सुख समाधानामध्ये वृद्धी होईल


सुख समाधानामध्ये वृद्धी होईल. प्रवासात नवे व्यावसायिक मित्र भेटण्याची शक्यता आहे. संपत्तीबाबत तुमचे त्रास संपतील. नोकरीमध्ये उन्नती होण्याची शक्यता आहे. लाभाचे नवे स्रोत निर्माण होतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनप्राप्ती होईल. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या.


कर्क - नोकरीमध्ये आळस झटकून द्या


नोकरीमध्ये आळस झटका आणि जिद्दीपणा करू नका. त्यामुळे त्रास वाढण्याची शक्यता आहे. घाईघाईत चुका होण्याची शक्यता आहे. सांभाळून राहा. नको तिथे बोलू नका. प्रेमसंबंधांमध्ये प्रगती. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांची भेट होईल. रखडलेली कामं मार्ग लागतील.


सिंह - दातदुखीने त्रस्त होण्याची शक्यता


दातदुखीने त्रस्त होण्याची शक्यता आहे. भविष्याच्या काळजीने मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम उचलू नका. दुसऱ्यांच्या सहकार्याने यश मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल.


कन्या - नव्या संपर्कामुळे तुमची उन्नती होईल


कौटुंबिक विवादात सन्मानजन्य पर्याय सापडेल. नव्या संपर्काच्या सहाय्याने तुमची उन्नती होईल. मनातील बोलल्यामुळे तणावमुक्त वाटेल. अधिक धावपळ केल्याने तब्बेत बिघडू शकते. परदेशी जाण्याचा योग आहे. रखडलेली कामं मित्रांच्या सहाय्याने पूर्ण होतील. उत्पन्न वाढेल.


तूळ - रखडलेल्या कामांमध्ये गती येईल


तुमच्या रखडलेल्या कामांमध्ये गती येईल. आत्मविश्वासाने काम करा, यश मिळेल. व्यवसायात प्रभावशाली व्यक्तींची ओळख होऊन लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्याचं आयोजन होण्याची शक्यता. नातेवाईकांचं बोलणं मनावर घेऊ नका. घेण्यादेण्यात सावधानता बाळगा.


वृश्चिक - संपत्तीसंबंधित अडचणी येऊ शकतात


आयात - निर्यात व्यापाराशीसंबंधित लोकांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. संपत्तीबाबत अडचण येऊ शकते. विवादापासून दूर राहा. कुटुंबाकडून भावनात्मक पाठिंबा मिळेल. राजकारणाकडे कल वाढू शकतो. वाहन चालवताना जपा. आरोग्याची काळजी घ्या.


धनु - आरोग्यात सुधारणा होईल


जीवनशैलीत बदल केल्याने, आरोग्यात सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामं मार्गी लागतील. सामाजिक संबंधांमध्ये संतुलित व्यवहार होईल. व्यावसायिक भागीदारीमध्ये लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामाने खूष होतील.


मकर - तणाव वाढू शकतो


भावनात्मक संबंधामध्ये तणाव वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांशी वाद वाढण्याची शक्यता आहे. भावनिक होऊन घेतलेला निर्णय बदलावा लागू शकतो. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कायद्याच्या कचाट्यातून बाहेर याल. उत्पन्न वाढेल.