14 मे 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा

14 मे 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा

मेष - धनलाभ होण्याची शक्यता


आज तुमच्यासाठी  भाग्योदयाचा दिवस. जोडीदाराकडून धनलाभ होण्याची शक्यता. उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होईल. व्यवसायात राजकारणाचा फायदा होऊ शकतो. वाहन चालवताना सावध रहा. धार्मिक कामात यश मिळेल.वृषभ - अशक्तपणा जाणवेल


कामाच्या ठिकाणी दगदग होण्याची शक्यता आहे. शारीरिक कमजोरी जाणवेल. तुमचे मत मांडण्यासाठी योग्य संधीची वाट पहा. जोखिम उचलू नका. रखडलेली  कामे पूर्ण होतील. सामाजिक सन्मान आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.मिथुन - जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता


जोडीदाराशी भांडण होऊ शकते. भावासोबत केलेल्या व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. वाहन चालवताना सावध रहा.कर्क - व्यवसायातील एखादे काम  रद्द होण्याची शक्यता


कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना सावध रहा. बेजबाबदारपणे वागू नका. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना सावध रहा. अधिक मेहनत घेऊनपण नफा होणार नाही. प्रिय व्यक्तीशी भेट होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता.सिंह - उत्कर्ष आणि उन्नती होण्याचे संकेत


आज तुमची चारी बाजूने प्रगती होणार आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रातील व्यक्तींसाठी लाभदायक दिवस आहे. नवीन प्रेमसंबध निर्माण होण्याची शक्यता. आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी स्तुती होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.कन्या - एखादे महत्त्वाचे काम रद्द होईल


कामाच्या ठिकाणी उशीर झाल्यामुळे वरिष्ठ नाराज होतील. वादविवाद करणे टाळा. एखादे महत्त्वाचे काम रद्द होऊ शकते. भरपूर मेहनत करूनही लाभ मिळणार नाही.  प्रवासात सावध रहा. आई-वडिलांचे सहकार्य मिळेलतूळ - मन निराश  राहील


आज तुमचे मन निराश आणि अप्रसन्न राहील. सतत चिडचिड होईल. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होईल. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. देणी-घेणी करताना सावध रहा. प्रॉपर्टीबाबत वाज होण्याची शक्यता.वृश्चिक - आज शांतता आणि  आनंद मिळेल


आज तुमच्या आनंद आणि शांतता मिळेल. प्रेमात यश मिळेल. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रचनात्मक कार्यात यश मिळेल.धनु - उच्च शिक्षणात यश मिळेल


आज तुम्हाला उच्च शिक्षणात यश मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. एखाद्याच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण कराल. कुटुंब आणि मित्रांसोबत प्रवासाचा बेत आखाल. राजकारणात जबाबदारी वाढेल.मकर - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता


भागिदारीच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या वाढतील. आर्थिक स्थिती बिघडेल. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.कुंभ - गुडघेदुखी कमी होईल


आज तुमच्या गुडघेदुखीचा त्रास कमी होईल. नियमित व्यायाम आणि आहाराबाबत सावध रहा. कामाच्या ठिकाणी त्रास होईल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवास सुखाचा होईल. रचनात्मक कार्यांत यश मिळेल.मीन - कुटुंबात वाद होतील


कौटुंबिक वाद चिघळण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. वैचारिक मतभेद होतील. विरोधक त्रास देतील. आत्मविश्वास कमी राहील. खर्च वाढेल. रखडलेले पैसै मिळण्याची शक्यता आहे.