16 मे राशीफळ, वृषभ राशीला आज गुंतवणुकीतून फायदा मिळणार

16 मे  राशीफळ, वृषभ राशीला आज गुंतवणुकीतून फायदा मिळणार

 


मेष - नात्यातील तणाव टाळा


तुमच्या रागावर आज नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ज्यामुळे नात्यात निर्माण होणारे तणाव टाळता येतील. मन आणि आरोग्यावर परिणाम होईल. व्यावसायिक यात्रेचा योग आहे. आर्थिक गोष्टींमध्ये विचार करून निर्णय घ्या. सामाजिक कार्यामुळे तुमची धावपळ होण्याची शक्यता आहे. नव्या ओळखींपासून सावध राहा.


कुंभ - मूल्यवान वस्तूंची काळजी घ्या


आज नातेवाईकांशी देवाणघेवाण करू नका, संबंध खराब होतील. मूल्यवान वस्तूंची काळजी घ्या. चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. वाद- विवादापासून दूर राहा. रखडलेली काम पूर्ण होतील. राजकारणात सक्रियता वाढेल.


मीन- वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल


वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. नियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी जवाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात चढ-उताराची स्थिती कायम राहील. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. जोखमीच्या कामांपासून दूर राहा. फिरायला जाण्याची संधी मिळेल.


वृषभ - आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे होईल फायदा


आज तुम्ही एखादी नवीन योजना आखाल. आधी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात मुलांच्या संबंधी एखादी चांगली बातमी कळेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बढती होईल. आरोग्याची काळजी घ्या.


मिथुन - तब्येत बिघडण्याची शक्यता


खाण्यापिण्याची काळजी घ्या. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी त्रास जाणवेल. शक्य असल्यास वाद टाळा. कौटुंबिक खर्च वाढेल. देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. रखडलेली काम पूर्ण होतील. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल.


कर्क - रोमँटीक सरप्राइज मिळू शकतं


कौटुंबिक आणि आर्थिक प्रकरणात यश मिळेल. जोडीदाराकडून रोमँटीक सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.  तुमच्या एखाद्या कामामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. एखाद्या संस्थेकडून सन्मान करण्यात येईल. राजकारणात जबावदारी वाढेल. मित्रांची भेट होईल.


सिंह - कामाच्या ठिकाणी त्रास होईल


कामाच्या ठिकाणी अचानक आलेल्या संकटांमुळे त्रास होईल. नोकरीमध्ये बदल करण्याचा निर्णय घ्याल. व्यापारामध्ये नुकसान टाळण्यासाठी आमिष टाळा. विरोधकांपासून सावध राहा. जोडीदाराशी संबंध सुधारतील. फिरायला जाण्याचा योग आहे.


कन्या - कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग


तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग आहे. व्यवसायातील नव्या भागीदारीमुळे तुम्ही आनंदी राहाल. एखादी प्रोपर्टी खरेदी करण्याचा विचार कराल. रचनात्मक कार्यामध्ये प्रगती होईल. प्रतिष्ठा आणि संपत्ती वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या.


तुळ - नवं काम शोधण्यासाठी भटकावं लागेल


नव्या कामाच्या शोधासाठी तुम्हाला पायपीट करावी लागेल. योग्य वेळी निर्णय न घेतल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाद- विवादापासून दूर रहा. मेहनतीचं पूर्ण फळ न मिळाल्याने निराशा वाढेल. जोडीदाराची साथ मिळेल. न्यायालयीन प्रकरणं सुटतील.


वृश्चिक - डोळ्यांचा त्रास जाणवेल


आज तुमची जास्त धावपळ होईल आणि डोळ्यांचा त्रासही जाणवेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. देवाण-घेवाणीच्या व्यवहारात दुर्लक्ष करू नका. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल.


धनु - नव्या ओळखींमुळे फायदा होईल


कौटु्ंबिक प्रकरणातील जुने वाद मिटल्यामुळे तुम्हाला हायसं वाटेल. नव्या ओळखींमुळे लाभ होईल. कामाच्या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य मिळेल. न्यायालयीन प्रकरणात सतर्क राहा. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.आर्थिक स्थिती मजबूत होईल. दिखाव्याच्या नादात कर्जबाजारी व्हाल त्यामुळे काळजी घ्या.


मकर - उच्च शिक्षणात यश मिळेल


युवांना हवी नोकरी मिळवण्यात यश मिळेल. उच्च शिक्षणात यश प्राप्त होईल. वरिष्ठांशी मिळतंजुळतं घेतल्यास प्रगतीसाठी सहाय्य मिळेल. प्रवास चांगला होईल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल. अडकलेली काम वेळेवर पूर्ण होतील.


हेही वाचा 


2019 वार्षिक भविष्य मीन (Pisces) राशी : वर्षाची सुरुवात उत्तम, मध्य काळजी करायला लावणारा तर शेवट गोड


वार्षिक भविष्य 2019 सिंह (Leo) राशी : नवीन वर्षात कभी खुशी कभी गम


2019 वार्षिक भविष्य कन्या (Virgo) राशी : थोडी सावधगिरी मग वर्षभर आनंदी आनंदच