17 मे राशीफळ, वृषभ राशीला मिळणार नाही मित्रांची साथ

17 मे राशीफळ, वृषभ राशीला मिळणार नाही मित्रांची साथ

मेष:आरोग्य सुधारणा होईल


आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन आरोग्यात सुधारणा होईल. तुम्हाला आज फ्रेश वाटेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही गोष्टींचा तिढा असेल तर तो सुटेल. राजकारणात सक्रीय असणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील. नव्या संपर्कांपासून सावधान… भांडणापासून दूर राहा.


कुंभ :नोकरीच्या नव्या संधी मिळतील


शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण आहे. तरुणांना नोकरीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर होतील. अनुभवी व्यक्तींपासून फायदा होईल. राजकारणात जबाबदारी वाढू शकते. जोडीदारासोबतचे संबंध चांगले होतील.


मीन: उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसणार नाही


आज तुम्हाला शैक्षणिक ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कमी उत्पन्न आणि जास्त खर्च अशी परिस्थिती राहील. पैशांच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात. आत्मविश्वास कमी होईल.आईची मदत मिळले. असे कोणतेही काम करु नका ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा पणाला लागेल. राजकारणात मदत मिळेल.


वृषभ: आज मित्रांची मदत मिळणार नाही


ज्यावेळी तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुमचे मित्र तुम्हाला मदत करणार नाही. खासगी संबंधासाठी वेळ देणे आवश्यक आहे. करिअर संदर्भातील कोणताही निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. राजकारणात तुम्हाला अधिक फायदा मिळेल.कोर्टाचा निर्णय तुमचा बाजूने लागेल.


मिथुन: अडकलेला पैसा परत मिळेल


तुमचा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत तुम्ही एखादे नवे काम सुरु करु शकता. व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. खर्च कमी करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. परदेशात जाण्याचा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.


कर्क:  डोळ्यांच्या आजारांपासून सावधान


डोळ्या संदर्भातील आजारांपासून सावध राहण्याची गरज आहे. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या.अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाची स्तुती होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. बाहेर जाण्याचे योग आहेत.


सिंह: जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल


जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संतानच्या सहकार्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील. भूतकाळातील काही चुका दुरुसत्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात राहतील. व्यवसायिक लाभ हवा असल्यास थोडी तडजोड करावी लागेल. घेण्या देण्याचे प्रश्न सुटतील


 कन्या: मनात विचारांचे काहूर माजेल


आज तुम्हाला मिळालेले नवे कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आज काही त्रास होण्याची शक्यता आहे. सांभाळून राहा. उगाचच तुमच्या मनात विचार येत राहतील. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसेल.


तूळ: व्यावसायिक यात्रेतून फायदा होईल


कौटुंबिक मालमत्ता मिळवण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रा फायद्याची ठरेल. नव्या ओळखी होतील. स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल. सासरहून पैसा किंवा काहीतरी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो.


वृश्चिक: वादापासून दूर राहा


आज तुमच्या बेजबाबदारपणामुळे तुम्ही चांगल्या संधी गमावू शकता. व्यावसायिक यात्रेदरम्यान सावध राहा.कोणत्या तरी अडचणीत सापडाल. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वादांपासून दूर राहा.वृद्धांच्या मदतीमुळे तुमच्या जुन्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल.जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा.खासगी संबंधातील  गैरसमज दूर होतील.


धनु: व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे


रक्त आणि ह्रदयासंदर्भातील आजारांपासून सतर्क राहा. आज महत्वाचा निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे.तुमचे गोड वागणे तुमचे समाजातील स्थान वाढवेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.


मकर: आयुष्यातील गुंता सुटेल


तुमच्या कठीण प्रसंगी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आयुष्यातील गुंता सुटेल.कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.उत्पादनाचे स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. कोणत्यातरी सामाजिक संस्थेतर्फे तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वयोवृद्धांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.