18 मे राशीफळ, मिथुन राशीला संभवतात अचानक प्रवासाचे योग

18 मे राशीफळ, मिथुन राशीला संभवतात अचानक प्रवासाचे योग

मेष: आज मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता


आज तुम्हाला पैशासंदर्भात अडचणी येतील. कोणती तरी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या ठिकाणी काही काम होता होता थांबतील. पैसा लावूनही व्यवसायात फायदा होईल अशी आज परिस्थिती नाही. कर्ज घेण्यापासून सावध राहा. जोडीदाराला दुर्लक्षित करु नका. त्याच्यासोबत नीट बोला.


कुंभ: नव्या ओळखीतून होतील आर्थिक लाभ


तुमच्या मिळून मिसळून वागण्यामुळे व्यवहारिक संबंध चांगले होतील. जोडीदारासोबत झालेले गैरसमज दूर होतील. भावनात्मक दृष्ट्या तुम्हाला चांगले वाटेल. व्यवसायात वृद्धि होईल नव्या ओळखीतून आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नति होईल. रचनात्मक कामात रुचि वाढेल.


मीन: भाग्योदयातील अडचणी दूर होतील


तुमच्या भाग्योदयात येणारी अडचण दूर होईल. विद्यार्थीवर्गाची कला आणि संगीत क्षेत्रात रुचि वाढेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात फायदा होआल. फायद्यासाठी काही ठिकाणी तडजोड करायला तयार राहाल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे.


 वृषभ : कुटुंबात आनंदी वातावरण राहील


संततीकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी  वातावरण राहील. व्यवसायासाठी आखलेली एखादी नवी योजना सफल होईल. जोडीदारासोबत कोणत्यातरी कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल. बिघडलेले काम पूर्ण होईल.


मिथुन: अचानक प्रवासाचे योग


प्रेमात तणावपूर्ण परिस्थिती येण्याची शक्यता आहे. अचानक काही बातमी कानी पडेल आणि तुम्हाला तडक बाहेर जावे लागेल. तुमच्या विश्वास संपादन करुन कोणीतरी तुमचे पैसे काढून घेऊ शकतात. तुमचे आरोग्य चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यकुशलता जपून ठेवा.


कर्क : जमीन खरेदीपासून सावधान


नव्या कामातील गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. सासरच्या व्यक्तिंकडून महाग अशी भेटवस्तू मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती राहील. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. जमीन खरेदी करण्यापासून सावध राहा. वाहन चालवताना सावधान


सिंह: आत्मविश्वास कमी होईल


दिवसभर आरोग्याची कुरबुर असेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. जोडीदारासोबत थोडे खटके उडतील. वादविवादापासून सावध राहा. आत्मविश्वास कमी असल्यामुळे तुम्ही निर्णय घेताना मागे पुढे व्हाल. धार्मिक कार्यात विश्वास वाढेल. देण्याघेण्याचे व्यवहार करताना सावधान. धनलाभ होण्याची शक्यता


कन्या : आर्थिक परिस्थिती चांगली राहील


घरात पाहुण्याचे येणे-जाणे वाढेल. प्रेमसंबंधामध्ये सुखद अनुभव येतील. आज तुम्ही केलेल्या संघर्षाचे तुम्हाला फलित मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला पदोन्नति मिळेल. राजनैतिक लाभ होईल. अडकलेली काम पूर्ण होतील.


 तूळ: कामाच्या ठिकाणी मतभेद होतील


कामाच्या ठिकाणी मतभेद झाल्यामुळे कठीण प्रसंग ओढावू शकतात.व्यवसायातील कोणतातरी करार मोडण्याची शक्यता आगे. नाहक धावपळ होईल.आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आकस्मिक धनलाभाचे योग आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वाहन चालवताना काळजी घ्या


वृश्चिक: मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या


व्यवसायात नवा पार्टनर मिळेल. आज अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. देण्याघेण्याचे व्यवहार सुटतील. विरोधक हार मानतील. रचनात्मक कामात यश मिळेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबच संबंध अधिक चांगले होतील. विरोधकांचे समर्थन मिळू शकते.


धनु : जोखीम उचलायला तयार राहा


आज धावपळीमुळे थकवा जाणवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. क्षुल्लक कारणामुळे अधिकारांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अडचणी येतील.जोखीम उचलायला तयार राहा. विरोधक नुकसान पोहोचवण्याचे प्रयत्न करतील.


मकर: मन अस्वस्थ राहील


आज तुमचे चित्त थाऱ्यावर नसेल. त्यामुळे तुमची सतत चिडचिड होऊ शकते.काहीही बोलताना संयम ठेवा. आईचे सहकार्य मिळेल. नोकरीसंदर्भात एखादा दौरा घडण्याची शक्यता आहे.  नवे पार्टनर मिळू शकतात. अडकलेली कामे पूर्ण होतील. धार्मिका कार्यात रुची वाढेल.


हेही वाचा


12 राशींमध्ये या राशी आहेत अधिक बलशाली


आपल्या राशीनुसार करुन पाहा या सेक्स पोझिशन्स


2019 हे वर्ष वृश्चिक राशीचे वाचा... संपूर्ण वर्षाचे भविष्य