19 मे 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या उत्पन्नात वाढ

19 मे 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या उत्पन्नात वाढ

मेष - नोकरीचा शोध कमी होईल


नोकरी मिळेल. तुमचे मत स्पष्टपणे मांडा. सर्वांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात सफळता मिळेल. आवडीचे काम मिळाल्यामुळे उत्साह वाढेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींची भेट होईल.


कुंभ - पोटाची समस्या जाणवेल


आहाराबाबत सावध न राहील्यामुळे पोटदुखी  जाणवेल. व्यवसायात समस्या येतील. नोकरीत इतरांच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त व्हाल. जीवनात गडबडीच्या वातावरणामुळे ताण वाढेल. प्रेमसंबध आनंदाचे राहतील.


मीन - भांडण संपेल


कौटुंबिक वाद संपून नवीन ओळखी वाढणार आहेत. यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. पैशांचे व्यवहार जपून करा. वैवाहिक जीवनात चर्चेमुळे यश मिळेल. जोडीदारासोबत प्रवास करण्याचा योग आहे. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.


वृषभ - कर्ज घेताना सावध रहा


विनाकारण होणारे खर्च नियंत्रणात आणा. कर्ज घेताना सावध रहा. कामाच्या ठिकाणी नवीन टेकनिकने काम करणे कठीण जाईल. वादविवादांपासून दूर रहा. रखडलेली कामे पूर्ण करा. देणी-घेणी करताना सावधान रहा. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.


मिथुन- फ्रेश वाटेल


आज दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विरोधकांचा त्रास कमी होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.


कर्क- नवीन ओळखी करताना सावध रहा


कौटूंबिक नातेसबंध बिघडण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी करताना सावध रहा. फसवणूक होऊ शकते. आधिकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नका. राग आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय त्रासदायक ठरेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. देणी घेणी करताना सावध रहा.


सिंह - उत्पन्नात वाढ होईल


उत्पन्नांचे नवे साधन मिळेल. वारसा हक्क मिळेल. व्यावसायिक व्यवहारात फायदा होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. एखादी संपत्ती खरेदी कराल. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. बिघडलेली कामे सुधारतील.


कन्या - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी  घ्या


जोडीदाराचे आरोग्य बिघडल्यामुळे निराश व्हाल. आहाराबाबत सावध रहा. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. वाद-विवाद करणे टाळा. एखाद्या बिघडलेल्या काम सुधारल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. सामाजिक सन्मान मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल.


तूळ- जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल


प्रिय व्यक्तीवरील प्रेम वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसाय अथवा नोकरीत रखडलेली कामे सहकाऱ्याच्या मदतीने  पूर्ण होतील. जोखिमीची कामे करू नका. राजकारणात जबाबदारी वाढेल. परदेशी जाण्याची संधी मिळेल.वृश्चिक - विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल


आज दगदग झाल्याने थकवा जाणवेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. एखाद्या छोट्या गोष्टीवरून अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. नोकरीत समस्या येतील. जोखिम घेऊ नका. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे.


धनु- मौैल्यवान भेटवस्तू मिळेल


आज तुमचा दिवस चांगला असेल. एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळू शकते. दिलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात फायदा होईल. उत्पन्न वाढेल. मुलांकडून शुभ समाचार मिळण्याची शक्यता. प्रवास करण्याचा योग आहे.


मकर- बेजबाबदारपणामुळे संधी गमवाल


आज तुमच्या बेजबाबदारपणामुळे चांगली संधी गमवाल. व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढेल. विरोधक आव्हान देतील. जोडीदाराची साथ लाभेल. रचनात्मक कामात प्रगती होईल. वाहन चालवताना सावध रहा.