20 मे 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी आजचा दिवस प्रेमाचा

20 मे 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी आजचा दिवस प्रेमाचा

मेष - प्रियकराची भेट होईल


आज तुमची अचानक जुन्या प्रियकराशी भेट होईल. नवीन संबध दृढ होतील. घरातील कर्तव्य पूर्ण करण्यात यश मिळेल. संतानसुख मिळू शकते. सामाजिक कार्यात रस घ्याल. व्यावसायिक कामांसाठी प्रवास करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या.।


वृषभ - विद्यार्थ्यांना यश मिळेल


विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळेल. करिअरमध्ये उत्कर्ष होईल. व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी लोकप्रियता मिळेल. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे कमी होतील. जोडीदारासोबत प्रवास करण्याचा योग येईल. अचानक एखाद्याची मदत घ्यावी लागेल.


मिथुन - आज उधारी घेऊ नका


आज कोणाकडून पैसे उधार घेऊ नका. व्यावसायिक योजनांमध्ये आयुष्यभराची पुंजी टाकावी लागेल. मेहनत अधिक आणि लाभ कमी मिळेल. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावध रहा. कामात आळस करू नका. धार्मिक कार्यात मन रमवा.


कर्क-  आज तुम्हाला फ्रेश वाटेल


आज पूर्ण दिवस तुम्हाला ताजे वाटेल. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. विरोधकांवर मात कराल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.


सिंह- प्रेमसंबध बिघडण्याची शक्यता आहे


आज प्रिय व्यक्तीसोबत भांडण होऊ शकते. मित्रांचा मनमानी व्यवहार तुम्हाल दुःखी  करू शकतो. इतरांमुळे एखादा वैयक्तिक निर्णय बदलावा लागेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढेल. प्रवास करणे टाळा.


कन्या- आरोग्य बिघडू शकतो


व्यावसायिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडू शकते. रक्तदाबाची समस्या जाणवेल. प्रॉप्रटीचा वाद होण्याची शक्यता आहे. धुर्त लोकांपासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळतील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. रखडलेली कामे पूर्ण कराल.


तूळ- दिलेले पैसै परत मिळतील


कला आणि सिनेसृष्टीतील लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. दिलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात फायदा होईल. नोकरीत उत्पन्न वाढेल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. प्रवास घडेल. सामाजिक सन्मान आणि धनलाभ होईल.


वृश्चिक - कौटुंबिक सबंध सुधारतील


आज तुमच्या घरात मंगल कार्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. जुनी भांडणे विसरून नवीन सुरूवात करा. कौटुंबिक आनंद मिळेल. आई-वडीलांचे सहकार्य मिळेल. घरात धार्मिक कार्य होऊ शकते. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण राहील. प्रमोशन मिळेल.


धनु- विद्यार्थांनी अभ्यासात लक्ष द्या


विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद होतील. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसबंध सुधारतील. अचानक एखादी आनदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न होईल. वातावरणातील बदलांमुळे आजारपण येण्याची शक्यता आहे.


मकर - मौल्यवान भेट मिळेल


सासरच्या मंडळींकडून एखादी मौल्यवान भेट मिळेल. व्यावसायिक कामांसाठी प्रवास करण्यास योग्य काळ आहे. नवीन योजना सफळ होतील. सुखसुविधांवर खर्च कराल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.


कुंभ - विद्यार्थ्यांचा ताण वाढेल


विद्यार्थी अभ्यासामुळे आज ताणात असतील. कामाच्या ठिकाणी शिस्त पाळावी लागण्यामुळे त्रास होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कौंटुबिक वातावरण आनंदाचे असेल. राजकारणात जबाबदारी वाढेल.


मीन - घरातील व्यक्तीची तब्येत बिघडेल


घरात एखाद्या व्यक्तीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध रहा. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. देणी घेणी करताना सावध रहा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस घ्या.