21 मे 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी आज आरोग्यदायी दिवस

21 मे 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी आज आरोग्यदायी दिवस

मेष - आरोग्य सुधारेल


जीवनशैलीत बदल करून आरोग्यात सुधारणा होऊ शकेल. आत्मविश्वास वाढेल. बिघडलेली कामे सुधारण्यात यश मिळेल. सामाजिक कार्यांत समतोल राखता आल्यामुळे सन्मान मिळेल. व्यावसायिक भागिदारीतून लाभ होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील.


कुंभ - दिलेले पैसे परत मिळतील


अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. जोडीदारासोबत एखादे नवे काम सुरू कराल. व्यवसायातील समस्या दूर होतील. खर्चात कपात करा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.


मीन - शिक्षण आणि नोकरीत समस्या येतील.


शिक्षण आणि नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ओळखी वाढवताना सावध रहा. पैशांबाबत समस्या येऊ शकतात. बिघडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण कराल. नातेवाईकांच्या बोलण्याने दुःखी होऊ नका.


वृषभ - मित्रांची भेट होईल


जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जुने मित्र भेटल्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी उन्नती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. राजकारणात यश मिळेल. विनाकारण वाद घालणे टाळा.


मिथुन - राजकारणात यश


आजचा दिवस आनंदाचा आणि शांतीचा असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. नवीन कामात पद आणि प्रतिष्ठा मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य आणि साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.


कर्क - पैशांची चणचण जाणवेल.


पैशांबाबत कोणतीच जोखीम उचलू नका. पैशांची चणचण जाणवू शकते. कर्ज घेताना सावध रहा. ताणतणावामुळे आरोग्य संकटात येण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी कौशल्याने काम करा. जोडीदारासोबत वेळ घालवा.


सिंह - आरोग्यात सुधारणा होईल.


दीर्घ आजारपणातून आराम मिळेल. फोन बंद करून आराम करा. दिनचर्या नियमित ठेवा. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढेल. विरोधकांपासून सावध रहा. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.


कन्या - जोडीदारामुळे तणाव वाढेल


जोडीदारामुळे आज तुमच्या आयुष्यात ताणतणाव वाढेल. मुलांना तुमच्या प्रेमाची आणि आधाराची गरज आहे हे लक्षात ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. देणी घेणी करताना सावध रहा. विरोधकांकडे दुर्लक्ष करू नका. एखादी समस्या समोर येऊ शकते. व्यवसायासाठी प्रवास करणं टाळा.


तूळ - पोटाच्या समस्यांनी त्रस्त व्हाल


प्रवास करताना आहाराबाबत सावध रहा. पोटाची समस्या जाणवू शकते. व्यवसायामध्ये समस्या येतील. नोकरीत इतरांच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त व्हाल. उलथा-पालथ झाल्यामुळे निराश होऊ नका. प्रेमसंबधात आनंदाचे वातावरण राहील.


वृश्चिक - नवीन काम मिळेल


व्यवसायात धावपळ केल्यामुळे चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. आर्थिक बाबातीत सुख समाधान मिळेल. मित्रांसोबत प्रवासाचा बेत आखआल. रखडलेले पैसे मिळतील. सासरच्या मंडळींकडून सहकार्य मिळेल.


धनु - कौटुंबिक भांडणे संपतील


कुटुंबातील वाद मिटतील. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे  सहकार्य मिळेल. विरोधकांना नमविण्यात यश येईल. आत्मविश्वास वाढेल. विनाकारण खर्च करू नका. गुंतवणूकीचा निर्णय लांबणीवर ढकला.


मकर - कामाच्या ठिकाणी सावध रहा


आज तुमच्या दुर्लक्षपणामुळे समस्या  येऊ शकते. तरूणांना करिअरची चांगली संधी प्राप्त होईल. धुर्त लोकांपासून सावध रहा. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.


आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का


2019 वार्षिक भविष्य कुंभ (Aquarius) राशी : जे पेरलंय त्याचं फळ मिळणार या वर्षात


12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली