22 मे 2019 चं राशीफळ, आज कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना मिळेल यश

22 मे 2019 चं राशीफळ, आज कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना मिळेल यश

मेष - अभ्यासात समस्या जाणवतील


अभ्यासात वारंवार व्यत्यय येण्याची शक्यता आहे. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. लक्ष्यप्राप्तीसाठी मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी व्यर्थ गप्पा मारू नका. विरोधकांपासून सावध रहा. मुलांसोबत चांगला वेळ घालवा. देणी घेणी करताना सावध रहा.


वृषभ - आरोग्याची  काळजी घ्या


व्यावसायिक ताणतणावापासून दूर रहा. आरोग्याची काळजी घेण्याची गरज भासू शकते. रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. प्रॉपर्टीबाबत वाद मिटतील. धुर्त लोकांपासून सावध रहा. कामाच्या  ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. धार्मिक कामात मन रमवा. रखडलेली कामे पूर्ण कराल.


मिथुन - जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता


जोडीदारासोबत वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. भावाच्या मदतीने व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.  रचनात्मक कार्यात प्रगती होईल. वाहन चालवताना सावध रहा.


कर्क - विद्यार्थ्यांना यश मिळेल


विद्यार्थ्यांना परिक्षेत चांगले यश मिळेल. मार्केटिंग आणि सेल्समध्ये मुश्किलीने यश हाती येईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदाराच्या भावनांचा मान राखा. बिघडलेली कामे पुन्हा पूर्ववत होण्यात यश मिळेल.


सिंह - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे


भागिदारीच्या व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सावध रहा. खर्च वाढल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात रस वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.


कन्या - आईच्या तब्येतीत सुधारणा होईल


आईची तब्येत सुधारण्याची शक्यता आहे. दिनक्रम नियमित राखा. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक ओळखी होतील. राजकारणात जबाबदारी वाढेल.


तूळ  - कौटुंबिक कलह वाढतील


संपत्तीच्या वादांमुळे कलह वाढण्याची शक्यता आहे. कडू बोलण्यामुळे लोक नाराज होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. सहज वाटणारी कामे करतानादेखील त्रास जाणवेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.


वृश्चिक - पाय अथवा गुडघ्याचा त्रास जाणवेल


आज तुम्हाला पाय अथवा गुडघेदुखी होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. विवाहाच्या चर्चांना यश मिळेल. वादात्मक समस्या सुटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन व्यवहार होण्याची शक्यता आहे. वादापासून दूर रहा.


धनु -  धनसंपत्तीबाबत खुशखबर मिळेल


अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये एखादे नवे काम सुरू कराल. व्यवसायातील समस्या दूर होतील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. परदेशी जाण्याचा योग आहे. वाहन चालवताना सावध रहा.


मकर - नात्यातील कडवटपणा कमी होईल


जुनी नाती आज पुन्हा नव्याने निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबध निर्माण होऊ शकतात. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता. अचानक लाभ होऊ शकतो. नोकरीत मनापासून काम करा. वाहन अथवा जमीन खरेदी करण्याचा बेत आखाल. रचनात्मक कामाच मन रमवाल.


कुंभ - विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही


आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. प्रोफेशनल जीवनात समस्या येण्याची शक्यता आहे. वादविवादांपासून दूर रहा. रचनात्मक कामात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वृद्ध आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.


मीन -  उत्पन्नांचे साधन वाढेल


आज तुमच्या भाग्याची तुम्हाला चांगली साथ लाभेल. उत्पन्नांची नवीन साधने उपलब्ध होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मन प्रसन्न राहील. पार्ट टाईम काम करण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. प्रेमसंबध सुधारतील.