26 मे राशीफळ, मीन राशीने खाण्यापिण्याकडे द्यावे लक्ष

26 मे राशीफळ, मीन राशीने खाण्यापिण्याकडे द्यावे लक्ष

मेष : महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता


आई-वडीलांकडून काहीतरी महागडी वस्तू भेट मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नात्यातील कटुपणा दूर होईल.स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकाल. परदेश यात्रेचा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो. अडकलेली कामे पूर्ण होतील.


कुंभ: प्रेमात तणाव निर्माण होईल


प्रेमात तणाव येण्याची शक्यता आहे. व्यवसाय किंवा नोकरीत अडचणी येऊ शकतात. विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी मिळू शकते. वाहन चालवताना सावधान.अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्याची आवड वाढेल.


मीन: पोटाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता


पोटाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसाय चांगला सुरु असल्यामुळे आनंद टिकून राहील. नोकरीत अपेक्षित यश मिळेल. नवी ओळख करताना सावधान. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.


वृषभ: वडिलांची मिळेल साथ


नातेवाईकांशी आज दिलखुलास गप्पा माराल. त्यामुळेआलेला तणाव दूर होईल. कठीण प्रसंगात वडिलांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्वपूर्ण जबाबदारी मिळेल. आत्मविश्वास वाढेल.व्यवसायातील काही गोष्टी मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. बाहेर जाण्याचे योग आहेत.


मिथुन: विद्यार्थ्यांचे मन अशांत राहील


शिक्षणातील समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे मन अशांत राहील. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. कोणताही निर्णय घेण्यास असमर्थ ठराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात


कर्क: आर्थिक परिस्थिती सुधारेल


उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मन प्रसन्न राहील. तुमच्या नशीबाची तुम्हाला साथ मिळणार आहे. पार्ट टाईम काम करण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तींची भेट होईल. सुखद यात्रेचे योग आहेत. प्रेम संबंधातील गोडवा टिकून राहील.


 सिंह : कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल


कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या चुकांमुळे वरिष्ठांचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. अचानक कुठूनतरी मिळणारा पैसा मिळता मिळता अडकण्याची शक्यता आहे. मन चिंतीत राहील. जोडीदाराचे सानिध्य आणि सहकार्य लाभेल. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल.  


 कन्या: आरोग्याची काळजी घ्या


आरोग्याच्या कुरबुरी सतावू शकतात. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात फायदा होईल. मानसिक समाधान मिळेल. पण कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. कुटुंबात धार्मिक काम पूर्ण पूर्ण होतील. सध्या प्रवास टाळा.


 तूळ: नात्यात रोमांस टिकून राहील


भावंडांमध्ये आलेली कटुता दूर होईल. कुटुंबात काही मंगलकार्याची योजना बनवाल. जोडीदारासोबतचे प्रेम आणि रोमांस टिकून राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.व्यवसायिक गुंतवणुकीतून फायदा होईल. रचनात्मक कामात प्रगती होईल.


वृश्चिक: नोकरीचा शोध होईल पूर्ण


आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध पूर्ण होईल. व्यवसायासाठी आखलेल्या काही योजना पूर्ण होतील. नवा प्रोजेक्ट किंवा काम मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली काम पूर्ण होतील. जोडीदाराकडून भांडण होण्याची शक्यता आहे.


धनु: किमती सामान हरवण्याची शक्यता


आज मन दु:खी राहील. आज तुमची एखादी किमती वस्तू घड्याळ असे काही चोरीला जाण्याची शक्यता आहे. वाहन आणि घरासंबंधी अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रा घडण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. राहिलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.


मकर: आरोग्यात होईल सुधारणा


दीर्घ आजारातून बाहेर पडून तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. घरी राहून आराम केल्यास उत्तम. भांडणापासून लांब राहा. व्यवसायात फायदा होण्याच्या अनेक संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. विरोधक नामोहरम होतील. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याचे व्यवहार करताना सावध राहा. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.


हेही वाचा


राशीनुसार कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली


तुमचेही मित्र वागतात का असे,मग वाचा त्यांच्या राशीचे विशेष


जाणून घ्या प्रत्येक राशी कशा व्यक्त करतात प्रेम