27 मे 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आज भाग्योदयाचा दिवस

27 मे 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आज भाग्योदयाचा दिवस

मेष - आरोग्य सांभाळा


दातांशीनिगडीत समस्येमुळे तुम्हाला त्रास होईल. भविष्याच्या बाबतीतल्या काही चिंतामुळे तुमच्या मनात अनेक नकारात्मक विचार येतील. आर्थिकबाबतीत कोणताही धोका पत्करू नका. दुसऱ्यांची मदत घेतल्यास तुम्हाला नक्की यश मिळेल. रचनात्मक कार्यांमध्य प्रगती होईल. जोडीदाराची साथ मिळेल.


कुंभ - आईच्या तब्येतीत सुधार होईल


तुमच्या आईची तब्येत बऱ्याच दिवसांपासून बरी नसल्यास त्यात आता सुधारणा होईल. तुमचं नियमित रूटीन चालू राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. पार्टनरसोबत सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावाल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी होतील. राजकारणात तुमचा सहभाग असल्यास जबाबदाऱ्या वाढतील.


मीन- जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता


जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. संततीच्याबाबतीत निराशाजनक बातमी मिळेल. लाळ घोटेपणा करणाऱ्यांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होतील. अडकलेली काम सहज पूर्ण होतील. आईबाबांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्याल.


वृषभ - अचानक धनलाभ होण्याचा योग


आज तुम्हाला अचानक धन लाभ होण्याचा योग आहे. व्यावसायिक प्रकरणांमध्ये यश मिळेल. नोकरीत तुम्हाला बढती मिळेल आणि जवाबदाऱ्या वाढतील. देवाण-घेवाणीच्या प्रकरणातील समस्या सुटतील. संपत्ती खरेदीची योजना आखाल. रचनात्मक कार्यात यश मिळेल.


मिथुन - जोडीदारासोबत एन्जॉय कराल


कोणाच्या तरी आकर्षणाला तुम्ही भुलण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही जे काम कराल त्यात तुमची छाप सोडाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांची मदत मिळेल. विरोधक हार पत्करतील. राजकारणातही तुमचा मान वाढेल. आरोग्याची मात्र काळजी घ्या.


कर्क - नवं काम लांबणीवर टाका


आज जर तुम्ही एखाद्या नव्या कामाला सुरूवात करण्याच्या विचारात असाल तर ते लांबणीवर टाका. एखादी समस्या उद्भवू शकते. विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या समस्यांमध्ये वाढ होईल. व्यावसायिक भागीदारी रद्द होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संबंध सुधारतील.


सिंह - उत्पन्नात वाढ होईल


आज भाग्योदयचा दिवस आहे. पार्टनराच्या माध्यमातून धन लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. कार्यक्षेत्रात तुमची बढती होईल. व्यवसायात राजकारणातून फायदा मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. धार्मिक कार्यात मन रमेल.


कन्या - नोकरीतील अडचणींमध्ये वाढ 


व्यवसायात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान उचलावं लागू शकतं. नोकरीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. फिरायला जाण्याचा कार्यक्रम पुढे ढकला. कौटुंबिक नात्यात मधुरता येईल. खेळण्याच्या एखाद्या कार्यक्रमात भाग घ्याल. जुन्या मित्रांची भेट होईल.


तूळ - जास्त धावपळीमुळे थकवा जाणवेल


जास्त धावपळ झाल्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका. देवाण-घेवाणीची प्रकरण सुटतील. व्यापारातील सौदे व्यावसायिक विस्तारासाठी सहाय्यक ठरतील. मित्रांसोबत फिरायला जायचा प्लॅन होऊ शकतो.


वृश्चिक - खास व्यक्तीशी भेट होईल


जे तुमच्यावर मनातल्या मनात प्रेम करतात त्यांच्याशी अचानक भेट होण्याची शक्यता आहे. नवे संबंध होण्याची योग आहेत. जोडीदारांसोबत तुमचं नातं चांगल होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल.


धनु - व्यवसायात मिळेल यश


भाग्योदयाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती अनुकूल राहील. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. न्यायालयीन प्रकरणातही चांगली बातमी मिळेल. आत्मविश्वास वाढेल फक्त रागावर नियंत्रण ठेवा.


मकर- आर्थिक नुकसान होईल


घाईघाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. नोकरीच्या स्थानात परिवर्तन येण्याची शक्यता आहे. विरोधक समोरून आव्हान देतील. जुन्या समस्या दूर होतील. धार्मिक यात्रेचा योग आहे. रचनात्मक कार्यात मन रमेल.


हेही वाचा -


2019 वार्षिक भविष्य कर्क (Cancer)राशी 


2019 वार्षिक भविष्य मकर (Capricon)राशी 


2019 वार्षिक भविष्य मीन (Pisces) राशी