30, मे 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या व्यक्तींचे प्रेमसंबंध मजबूत होतील

30, मे 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या व्यक्तींचे प्रेमसंबंध मजबूत होतील

मेष - रूपयांची देवाण-घेवाण करू नका


आज व्यावसायिक बाबतीत कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. पैशांच्या बाबत कोणतीही मोठी देवाण-घेवाण करू नका. कुटुंबामध्ये तणाव वाढण्याची शक्यता. व्यर्थ विवादापासून दूर राहा. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता. वाहनासंबंधी समस्या उद्भवण्याचीदेखील शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.


कुंभ - प्रेमसंबंध मजबूत होतील


आज तुमचे बिघडलेले प्रेमसंबंध मजबूत होतील, सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन आनंदित राहील. कोणत्या तरी जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घडतील. गैरसमजांपासून दूर राहा. सन्मान आणि धनामध्ये वृद्धी होईल. व्यावसायिक करिअरमध्ये लाभाची शक्यता. नव्या वाहनाची खरेदी करू शकता.


मीन - योजना सफल होतील


नोकरीमध्ये योग्य दिशा मिळून सफल होण्याची शक्यता. नवे संबंध प्रस्थापित होण्याच्या योजना सफल होतील. उत्पन्नासाठी नवे मार्ग दिसतील. तुमचा गेलेला आत्मविश्वास परत मिळेल. वाहन जपून हाताळा. मनोरंजन होण्याच्या संधीही मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.


वृषभ - जोडीदाराबरोबर होऊ शकतं भांडण


आज तुमचं घरातील मुख्य अथवा तुमच्या जोडीदाराबरोबर भांडण होण्याची शक्यता आहे. कोणाच्याही बोलाचालीत येऊन घरातील शांतता बिघडवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात तुमची उन्नती होईल. नव्या प्रोजेक्टपासून फायदा मिळेल. रखडलेली कामं मार्गी लागतील.


मिथुन - कौटुंबिक संबंध बिघडण्याची शक्यता


मित्र आणि कौटुंबिक संबंध बिघण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रांचा सहयोग तुम्हाला मिळणार नाही. विवादापासून दूर राहा. रखडलेली कामं मार्गी लागतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. देण्याघेण्याची बाबतीत सर्व समस्या सुटतील. वाहन जपून चालवा.


कर्क - मानसिक त्रासाने ग्रस्त असण्याची शक्यता


मानसिक त्रासामुळे तुम्ही खूपच ग्रस्त असाल. काही अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करू शकता. कोणत्या तरी चांगल्या बातमीने मन उत्साहित होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. व्यवसायात चांगले अनुभव मिळतील. विभिन्न क्षेत्रात तुमचं नाव होईल.


सिंह - कौटुंबिक संपत्ती मिळण्याचे योग


कौटुंबिक संपत्ती मिळण्याचे योग आहेत. चल अथवा अचल खरेदी करण्याची शक्यता. उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील. व्यापारिक सौदे तुम्हाला लाभदायक ठरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमाचा त्रिकोण होण्याची स्थिती निर्माण होईल. वैवाहिक संबंध अथवा प्रेमसंबंधामध्ये थोडं धीराने बघा.


कन्या - प्रेमसंबंधाला योग्य दिशा मिळेल


तुमच्यासाठी काही व्यक्ती महत्त्वाच्या ठरतील. प्रेमसंबंधाला योग्य दिशा मिळेल. एकमेकांमधील भांडणं विसरून काम केल्यास, यश मिळेल. कोर्टकचेरीच्या बाबत तुमची सुटका होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.


तूळ - विद्यार्थ्यांनी आळसाचा त्याग करावा


आज तुमच्यात अचानक काही गोष्टींमुळे आत्मविश्वास निर्माण होईल. आळसामुळे तुमचं शिक्षणात मन लागणार नाही. थोडा धीर धरा. जोडीदाराकडून तुम्हाला सहयोग मिळेल. सामाजिक जीवनात तुमचा सहयोग महत्त्वाचा ठरेल. सामाजिक सन्मान मिळेल आणि धनप्राप्ती होईल.


वृश्चिक - महाग उपहार अथवा धनप्राप्ती होण्याचा योग


सासरी तुम्हाला महाग वस्तू अथवा धनप्राप्ती होण्याचा योग आहे. जोडीदारासह सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. परदेश यात्रा होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं मार्गी लागतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. राजकारणात तुमच्या जबाबदारी वाढतील.


धनु - कार्यालयात त्रास होईल आणि कामं बिघडतील


कार्यालयात उगीचच त्रास होईल आणि कामं बिघडतील. आरोग्य आणि प्रतिष्ठा नीट राखा. आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नका. व्यावसायिक प्रवास होण्याची शक्यता आहे. मात्र प्रवासादरम्यान सतर्क राहा. धार्मिक कार्यात मन गुंतून राहील. जोडीदाराची साथ मिळेल.


मकर - कुटुंबामध्ये ज्येष्ठांची तब्बेत खराब होऊ शकते


कुटुंबामध्ये अचानक कोणत्यातरी ज्येष्ठांची तब्बेत खराब होऊ शकते. पूर्ण दिवस धावपळीची स्थिती राहील. जोडीदाराचं सान्निध्य आणि सहयोग मिळेल. व्यावसायिक योजनांना हळूहळू गती मिळेल. उत्पन्नामध्ये संतुलन राहील. धार्मिक कार्यात मन गुंतून राहील.


हेदेखील वाचा - 


राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली


जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'


हाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर