4 जून 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या उत्पन्नात होईल वाढ

4 जून 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या उत्पन्नात होईल वाढ

मेष - उत्पन्नात होईल वाढ


आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतातही वाढ होईल. एखाद्या संस्थेकडून तुमचा सन्मान करण्यात येईल. एखाद्या मित्राच्या मदतीने व्यवसायाचा विस्तार कराल. कुटुंबात खेळीमेळीचं वातावरण राहील.


वार्षिक भविष्य मेष (Aries) राशी : थोडी सावधानता बाळगल्यास वर्ष तुमचंच


कुंभ - विवाहातील अडथळे दूर होतील


चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीशी तुमचे संबंध सुधारतील. विवाहातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात नफा होईल. राजकारणातील स्थिती मजबूत होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.


मीन- नवं काम लांबणीवर टाका


आज विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडेल. नवं काम सुरू करणार असाल तर थोडं लांबणीवर टाका. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. विचार-विनिमय करून व्यवहार करा. विरोधकांपासून सतर्क राहा. अध्यात्म आणि याोगात तुमचं मन रमेल.


वृषभ - व्यवसायात सावधानता बाळगा  


विद्यार्थ्यांनी चांगल्या रिजल्टसाठी अधिक मेहनत करण्याची गरज आहे. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. राजकारणात तुम्हाला मदतीने यश मिळेल. आर्थिक व्यवहारात जोखीम उचलू नका. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. पार्टनरची मदत मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.


मिथुन - शारीरिक थकवा जाणवेल


आज तुमचा धावपळीत वेळ व्यर्थ होईल. शारीरिक थकवा जाणवेल. अत्याधिक मेहनत करूनही मनासारखा मोबदला मिळणार नाही. मित्रांच्या मदतीने एखादं नवं काम हाती घ्याल. पार्टनरशी प्रेमसंबंध सुधारतील. अचानक धनलाभ होईल.


कर्क - प्रेमप्रकरणात मिळेल यश


प्रेमप्रकरणात तुम्हाला आज यश मिळेल. नात्यांमध्ये कटुता येईल. पार्टनरसोबत चांगला वेळ घालवाल. नवे संबंध प्रस्थापित कराल. कार्यस्थळी तुम्हाला हवी ती जवाबदारी सोपवली जाईल. व्यवसायामध्ये फायदा होईल. आर्थिक विवंचना दूर होतील.


वार्षिक भविष्य 2019 सिंह (Leo) राशी : नवीन वर्षात कभी खुशी कभी गम


सिंह - करियरमध्ये कराल प्रगती


चांगल्या करियरच्या दृष्टीने तुम्ही वाटचाल कराल. संभाषण कौशल्याने यश मिळवाल. राजकारणात असलेल्या व्यक्तींना आज चांगल्या संधी प्राप्त होतील. पार्टनरसोबत फिरायला जायचा प्लॅन कराल. रखडलेली काम पूर्ण होतील. आरोग्य नीट राहील.


कन्या - आर्थिक नुकसान उचलावं लागेल


आज व्यावसायिक भागीदारी सुरू करण्यासाठी घाई करू नका. आर्थिक निर्णय विचार विनिमय करून घ्या. नुकसान होण्याची शक्यता आहे. सामंजस्याने समस्याचं निरसन करा. खर्चांवर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कार्यांमध्ये आवड वाढेल. प्रभावशाली लोकांशी भेट होईल.


तूळ - आरोग्यात सुधारणा होईल


तुमच्या पार्टनरच्या आरोग्यात आज सुधारणा होईल. कुटुंबात सुखाचं वातावरण असेल. विरोधक माघार घेतील. आर्थिक बाजू चांगली होईल. राजकारणात तुमच्या जवाबदाऱ्या वाढतील. रचनात्मक कार्यांमध्ये प्रगती होईल. विदेश यात्रेवर जाण्याचा कार्यक्रम ठरेल.


वृश्चिक - कौटुंबिक तणाव वाढेल


आज बोलता बोलता तुमच्या कुटुंबातील तणाव वाढेल. घरातील ज्येष्ठ्यांच्या आरोग्याची चिंता वाटेल. कामाच्या निमित्ताने तुम्ही घरापासून दूर राहाल. नव्या जागी आणि नव्या वातावरणात तुम्हाला अॅडजस्ट होणं कठीण जाईल. वाहन चालवताना काळजी घ्या. देवाण-घेवाणीच्या कामात सावधानता बाळगा.


वार्षिक भविष्य कर्क (Cancer)राशी : नववर्षात गतवर्षाच्या संघर्षाची फळे मिळतील


धनु - वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या


वडिलांच्या तब्येतीसंबंधी तुमची काळजी वाढेल. धैर्याने काम करा. व्यवसायात तुमचा त्रास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. एखाद्या संस्थेकडून तुमचा सन्मान करण्यात येईल. प्रतिष्ठा आणि संपत्तीत वाढ होईल. रखडलेली काम जलदगतीने पूर्ण होतील.


मकर- मित्रांकडून भेटवस्तू मिळतील


आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती कायदेशीररित्या मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून महागड्या भेटवस्तू मिळतील. संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. व्यावसायिक यात्रा तुम्हाला फायदेशीर ठरेल. पार्टनरसोबत तुमचं नातेसंबंध सुधारतील.


हेही वाचा -


12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली