5 मे 2019चं राशीफळ,वृश्चिक राशीने घ्यावी आरोग्याची काळजी

 5 मे 2019चं राशीफळ,वृश्चिक राशीने घ्यावी आरोग्याची काळजी

मेष- बजेट गडबडण्याची शक्यता


आज तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणी तरी फसवू शकतं किंवा तुमच्याकडून कोणतेतरी महत्वाचे कागदपत्र गहाळ होऊ शकते. खर्च जास्त होईल. बजेटमध्ये गडबड होण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळीकडून फायदा होण्याची शक्यता आहे. भांडणांपासून लांब राहा. आरोग्याच्या कुरबुरीमुळे नाराज राहू नका.


 कुंभ -पदोन्नतिची शक्यता


आज तुम्हाला मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांवर शरसंधान साधण्यात यशस्वी व्हाल. धार्मिक कामांमध्ये तुम्हाला अधिक रुचि निर्माण होईल. खर्च नियंत्रणात ठेवा. कामाच्या ठिकाणी पदोन्नति होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामात मन  लागून राहील.


मीन - आर्थिकस्थिती चांगली राहील


विद्यार्थीवर्गाच्या सगळ्या समस्या दूर होतील. वेळेवर काम करण्याची सवय लावून घ्या. यश मिळेल. नोकरीमध्ये सन्मान वाढेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नात्यात आलेला कटुपणा दूर होईल. वाहन चालवताना काळजी घ्या


 वृषभ - आरोग्य सुधारेल


प्रदिर्घ आजारानंतर तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणारा अनुकूल असा काळ आहे. आहाराकडे अधिक लक्ष द्या. नव्या योजना मनात येतील. घेण्यादेण्याचे व्यवहार करताना सावधान. संतती सुख मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामामध्ये व्यग्र राहाल.तुमच्या मान सन्मानात वाढ होईल.


मिथुन - नातेसंबंधात गैरसमज होण्याची शक्यता


कुटुंबातील ताणतणाव आणि व्यवसायातील अडचणींचा सामना करावा लागेल. नातेसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. धनलाभाचे संकेत आहेत. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील. कोणत्यातरी संस्थेतर्फे तुमचा सन्मान केला जाईल ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.


कर्क - अडकलेली कामे पूर्ण होतील


आज तुम्हाला आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. ज्याचा उपयोग तुम्हाला नवीन कामासाठी होऊ शकेल. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात नवे पार्टनर मिळतील. नातेवाईकांसोबत केलेली यात्रा सुखद आणि फायद्याची असेल. महत्वाची कामे पूर्ण करा आळशीपणा करु नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते.


सिंह - नात्यात कटुता येण्याची शक्यता


पार्टनरच्या  प्रकृती अस्वास्थामुळे तुम्ही चितींत राहाल. विनाकारण कोणत्याही भांडणात पडू नका. नवे काम किंवा प्रवास टाळा. नोकरीमध्ये आनंदवार्ता मिळण्याची शक्यता. नात्यात आलेली कटुता दूर होईल. अडकलेली काम पूर्ण होतील. समाजात सन्मान मिळेल.


 कन्या - कौटुंबिक कलह मिटतील


कौंटुबिक कलह मिटल्यामुळे समाधान मिळेल. जोडीदाराशी भेट होईल. नवे प्रेम संबंध सुरु होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या. अचानक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमचे मन अशांत राहील. व्यवसायात वृद्धी होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता


तूळ-  वाद टाळा


तुम्ही एखाद्या कामासाठी खूप कष्ट करुनही तुम्हाला यश मिळणे आज कठीण आहे. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. हे वाद टाळा. तुमचे सहकारी तुमच्या योजना उलथवून टाकण्याचा प्रयत्न कतील. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन ठरेल. तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवा. भांडणापासून दूर राहा


वृश्चिक - हवामानाचा आरोग्यावर होईल परिणाम


अडकलेला पैसा वसूल करण्यात आज तुम्ही यशस्वी राहाल. प्रॉपर्टीवर तुम्हाला हक्क मिळू शकतो. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. भांडणापासून सावध राहा. हवामानाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. कुटुंबात मंगलकार्य ठरु शकते. व्यापारात वृद्धि होईल.


धनु -आर्थिक लाभ होण्याची शक्यता


तुमच्या चालढकलवृत्तीमुळे तुम्ही चांगल्या संधी गमावू शकता. करिअर आणि आरोग्याची चिंता सतावेल. खासगी संबंध मजबूत होतील. संतती सुख मिळण्याची शक्यता आहे.मित्रांसोबत आखलेली टूर सुखद आणि फायद्याची ठरणार आहे. स्थावर मालमत्ता आणि सन्मान वाढणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता


मकर - विरोधकांपासून सावध राहा


डोकेदुखीमुळे तुम्ही चिंतीत आणि बेचैन राहाल. आज तुमची सतत चिडचिड होईल. मानसिक तणावापासून स्वत:ला दूर ठेवा. कामाच्या बाबतीत यश मिळेल. मान- सन्मान वाढेल. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज


हे ही वाचा


2019 वर्ष कसे जाणार धनु राशीसाठी वाचा वार्षिक राशीफळ


 


 12 राशींपैकी या राशी असतात जास्त बलशाली


तुमचा जन्म आहे फेब्रुवारीचा मग तुम्ही हे वाचायलाच हवे