9 मे राशीफळ, मिथुन राशीची अडकलेली कामे होतील पूर्ण

 9 मे राशीफळ, मिथुन राशीची अडकलेली कामे होतील पूर्ण

मेष: वरिष्ठांचा त्रास होण्याची शक्यता


स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थी वर्गाने दुर्लक्ष करु नये. त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने तुम्ही तुमचे काम करा. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा योग आहे. अचानक धनलाभ संभवतो.


कुंभ: जीभेवर साखर ठेवा


तुमच्या दुर्लक्षित करण्याच्या स्वभावामुळे तुम्ही चांगल्या संधी गमावू शकता. विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार त्यांच्यावर हावी होऊ देऊ नका. कौटुंबिक जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सावध राहा.कोणाशी काही बोलताना सावध राहा.आनंदात वाढ होईल. प्रियजंनाची भेट सुखद असेल.


मीन: आर्थिक लाभ होण्याची शक्यता


व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे. काही नवे पार्टनर मिळतील. आर्थिक लाभ होईल. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे तुम्हाला नोकरीमध्ये चांगले पद मिळेल. विद्यार्थ्यांचा चांगला काळ सुरु आहे. आवश्यक कामे पहिल्यांदा पूर्ण करा. आत्मविश्वास वाढेल. प्रेमात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते.


वृषभ: मेहनत करा कठीण काहीच नाही


आत तुम्ही कंबर किंवा पायाच्या दुखण्यामुळे हैराण राहाल. नोकरीमध्ये जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल.मेहनत कराल तर कोणतेही कठीण काम आरामात पूर्ण होईल. कौटुंबिक कलह मिटण्याची शक्यता आहे.महत्वाचे काम पूर्ण करा आळशीपणा करु नका.


 मिथुन: अडकलेली कामं पूर्ण होतील


परिचयातील व्यक्तिंमुळे तुमचे कठीण काम आज पूर्ण होईल. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही आनंदी असाल. जोडीदारासोबत कोणाच्या तरी मंगलकार्याला जाण्याचा योग आहे. राजकारणातील व्यक्तींवर जबाबदाऱ्या वाढणार आहे. त्यामुळे कामाचा उत्साह द्विगुणित होईल. बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. अडकलेली कामं पूर्ण होतील.


कर्क: वरिष्ठांची भेट ठरेल फायद्याची


अभ्यासासोबत काही सामाजिक कार्य  केले तर विद्यार्थी वर्गाला त्याचा फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांची भेट फायद्याची ठरु शकते. व्यापारात काही तरी नवीन करण्याची गरज आहे. त्याचा भविष्यात फायदा होईल. मित्रपरिवारासोबत परदेश यात्रा आखली जाऊ शकते. रचनात्मक कामात प्रगती होईल.


सिंह: आर्थिक नुकसान होण्याची शक्यता


आज तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारातील चढ- उतारामुळे तुमचा त्रास वाढू शकतो. विद्यार्थ्यांच्या सगळ्या समस्या सुटतील.जोडीदाराची भावना समजून घ्या. आरोग्यासंदर्भात तक्रारीची शक्यता.


कन्या: नव्या ओळखीचा होईल फायदा


जुन्या आजारामध्ये सुधारणा आल्यामुळे तुम्हाला समााधानी वाटेल. कुठून तरी चांगला समाधानकारक बदल होत असल्याची बातमी कळेल. नव्या ओळखींचा व्यापारासाठी फायगा होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जवळच्या मित्रांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो.


तूळ: रागावर नियंत्रण ठेवा


कौटुंबिक जीवनात काही अडचणी येणार आहेत त्यांचापासून सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा. नातेसंबंधात कटुता येण्याती शक्यता आहे.शांत राहून तुम्ही अडचण सोडवा. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यापारात फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नति मिळण्याची शक्यता आहे.


 वृश्चिक: वडिलोपार्जित संपत्ती मिळ्याचे संकेत


आजचा दिवस तुमचा काही विशेष कामासाठी जाणारा आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. काही खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या योजना तुमच्या मनात येतील. नव्या ओळखीचा फायदा होईल.राहिलेली कामे पूर्ण होतील. वाहन चालवताना सावधान. वैवाहिक आयुष्यात आनंद राहील.


धनु: आरोग्याची काळजी घ्या


आज अपचनामुळे त्रास होईल. खाण्या पिण्याकडे लक्ष द्या. परिचयातील व्यक्तिंच्या सुख-दु:खामुळे तुमचे मन चिंतीत राहील. सहकारी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. काम वेळेवर करण्याची सवय लावून घ्या. समाजात सम्मान वाढेल. व्यवसायात नवा पार्टनर मिळण्याची शक्यता आहे.


 मकर: विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील.


आज तुम्हाला तुमच्या अपत्यांसदर्भात कोणतातरी मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कुटुंबात सुख-शांति राहील.जोडीदारासोबत कोणत्यातरी सामाजिक समारोहाला जाण्याची शक्यता आहे. घेण्यादेण्याचे प्रश्न सुटतील. व्यवसायात यश मिळेल.


हे ही वाचा


वाचा वृश्चिक राशीचे वार्षिक राशीफळ  


जाणून घ्या प्रत्येक राशी कसे व्यक्त करतात प्रेम


जाणून घ्या तुमचा भाग्यशाली क्रमांक कोणता