प्रत्येक नववधूच्या शॉपिंग लिस्टमध्ये असायला हव्यात या 11 बोल्ड, हॉट आणि सेक्सी लाँजरी - Lingerie For Women in Marathi

प्रत्येक नववधूच्या शॉपिंग लिस्टमध्ये असायला हव्यात या 11 बोल्ड, हॉट आणि सेक्सी लाँजरी - Lingerie For Women in Marathi

सध्या मे महिना चालू आहे आणि लग्नाचा सीझनदेखील. होणाऱ्या नववधूची एक मोठी शॉपिंग लिस्ट तर नक्कीच असते. नवं घर, नवं वातावरण या सगळ्याचा विचार करून नववधूला आपली शॉपिंग लिस्ट अर्थात काय काय खरेदी करायचं आहे याची यादीच तयार करावी लागते. साडी, मेकअप बॉक्स, दागिने इत्यादी या गोष्टींची यादी आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाँजरीची यादी. बऱ्याचदा लग्नाची तयारी करत असताना खरेदीसाठी आपल्याबरोबर आपली आई, बहीण, काकू अथवा मावशी एकत्र असतात. अशावेळी तुम्हाला आपल्या आवडीची अथवा आपल्या होणाऱ्या नवऱ्याला नक्की काय आवडेल त्या पद्धतीची लाँजरी घ्यायची लाज वाटते. कारण कितीही झालं तरीही अजून आपल्याकडे तेवढं मोकळं वातावरण दिसून येत नाही. पण एकटं जाऊन या गोष्टी खरेदी करायच्या झाल्या तर त्याची पूर्ण माहितीही नसते. मग अशावेळी नक्की काय करणार? मग अशावेळी नेहमीच्या परंपरेप्रमाणेच तीच टू पीस अथवा 6 पीस लाँजरीची खरेदी केली जाते. पण आता बऱ्याच नववधूंनी या समस्येवर एक उपाय शोधून काढला आहे आणि तो उपाय म्हणजे ऑनलाईन शॉपिंग.


क्लोव्हिया, झिवामे आणि प्रिटी सिक्रेटसारख्या अशा अनेक ऑनलाईन वेबसाईट्सश आहेत, ज्या योग्य किमतीमध्ये तुमच्या आवडीच्या आणि तुमच्या मनाप्रमाणे लाँजरी तुमच्यापर्यंत पोहचवतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हवे तसे रंग आणि हव्या त्या प्रकारच्या लाँजरी तुम्ही विकत घेऊ शकता. कितीही हॉट आणि सेक्सी असणाऱ्या लाँजरी तुम्ही अगदी खासगीरित्या खरेदी करू शकता आणि लग्नानंतर या हॉट आणि सेक्सी लाँजरी घालून तुमच्या आणि तुमच्या नवऱ्याच्या फँटसीप्रमाणे आपल्या सेक्स लाईफचा आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला याठिकाणी काही हॉट आणि सेक्सी नाईट ड्रेस आणि लाँजरीबद्दल सांगणार आहोत. या तुम्हाला नक्की आवडतील असं आम्हाला वाटत आहे. शिवाय या तुम्हाला परवडण्यासारख्या आहेत आणि तुम्ही या घालून नक्कीच आपल्या फँटसीप्रमाणे मजा करू शकता.


सेक्सी ब्लॅक (Sexy Black)


काहीतरी नॉटी ट्राय करा (Try Something Naughty)


हॅलोवीन लुक (Halloween Look)


वाइल्ड लुक (Wild Look)


लग्नानंतर नवऱ्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही खास (Romantic Birthday Gift for Husband in Marathi)


पहिल्या रात्रीसाठी खास नाईटीज (Nighty for First Night in Marathi)


लग्नानंतर प्रत्येक नववधू ही सर्वात जास्त पाहुण्यांनी घेरलेली तुम्हाला दिसते. पण जसा लग्नाचा दिवस संपून रात्र वाढू लागते तेव्हा प्रत्येक मुलीच्या आणि अगदी मुलाच्याही मनामध्ये या रात्रीविषयी विचार चालू असतात. आतापर्यंत चित्रपटांमध्ये पाहिलेली अथवा आपल्या मित्रमैत्रिणींकडून ऐकलेली ती रात्र आता आपल्या आयुष्यात आलेली असते. इंग्रजीमध्ये या रात्रीला गोल्डन नाईट म्हटलं जातं. प्रत्येक लग्न झालेल्या नव्या जोडप्याला या रात्रीची सर्वात जास्त ओढ असते. या रात्रीच आपल्या नवऱ्याला खूप बोल्ड, हॉट आणि सेक्सी लाँजरी घालून मुली अधिक आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करत असतात. नवऱ्याला आपल्या बायकोशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार येऊ नये असंच प्रत्येक बायकोला वाटत असतं आणि त्यामुळेच अशा हॉट आणि सेक्सी लाँजरीचा वापर करण्यात येतो. पहिल्या रात्रीसाठी अथवा हनीमूनसाठी अशा कोणत्या लाँजरी वापरायला हव्यात जेणेकरून ही रात्र तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील याची खास माहिती तुमच्यासाठी


ट्रेडिशनल फ्रॉक (Traditional Frauk)


traditional frock
तुमचा स्वभाव थोडा लाजराबुजरा असेल आणि तुम्ही जर पटकन कोणामध्ये मिसळू शकत नसाल तर असा ट्रेडिशनल फ्रॉक तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. अगदी पूर्वपरंपरागत फ्रॉक हा प्रत्येक मुलीची आवड आहे. प्रत्येक नववधूवर तसं तर लाल अथवा मरून रंग उठून दिसतो. पण तुम्हाला हवं असेल तर तुमच्या नवऱ्याच्या आवडता रंगही तुम्ही यावेळी घालू शकता. सॅटिन फॅब्रिकमध्ये असणारी ही लाँजरी अतिशय कमी वर्क असलेली आहे. पण तुमच्या शरीराच्या आकाराच्या स्वरूपात ही बनवण्यात आलेली असते. त्यामुळे तुम्हाला लाजही वाटणार नाही आणि पहिल्या रात्री तुम्ही खूप आकर्षक आणि सुंदरही दिसू शकाल.


सेक्सी ब्लॅक (Sexy Black)


sexy black


तुम्ही लाजऱ्या नसाल आणि थोडाफार बोल्डनेस तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ब्लॅक सेक्सी लाँजरी हा खूपच चांगला पर्याय पहिल्या रात्रीसाठी आहे. काळा रंग तुमच्यावर खूपच शोभून दिसत असतो. विशेषतः गोऱ्या रंगाच्या मुलींनी तर याच रंगाची लाँजरी ट्राय करावी. काळ्या रंगाचा हा डॉल ड्रेस दिसायला जितका बोल्ड आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने हा ड्रेस जास्त सेक्सी आहे. ही पारदर्शक नाईटी तुमची रात्र अधिक सुंदर बनवू शकते. रात्रभर तुम्ही एकमेकांना आनंद देत जागे राहू शकता. या ड्रेसबरोबर मिळणारा मॅचिंग थाँग तुमची गोल्डन नाईट अधिक यादगार बनवेल आणि इतकंच नाही ही रात्र असेल अधिक बोल्ड आणि ब्यूटीफूल. काळा रंग कसा घेऊ असा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही दुसरा रंगही खरेदी करू शकता. पण अशावेळी तुम्हाला सूट होणारा रंग जर काळा असेल तर तुम्ही हाच रंग वापरा कारण नेटच्या या लाँजरीमुळे तुमची ही रात्र होऊ शकते अधिक नॉटी....


काहीतरी नॉटी ट्राय करा (Try Some Nude)


nude


न्यूड लाँजरीबाबत तुम्ही कधी ऐकलं आहे का? असेल तर तुमचं याबाबत नक्की काय मत आहे. पहिल्यांदा नक्कीच तुम्हाला कदाचित थोडं विचित्र वाटू शकतं. पण विचार करा ही न्यूड लाँजरी तुम्ही तुमच्या नवऱ्यासमोर घालून गेलात तर तो तुम्हाला अजिबात सोडणार नाही. खरं ना? न्यूड लाँजरी दिसायला अतिशय सेक्सी असते. तसंच समोरच्या बघणाऱ्या माणसाला ही लाँजरी एक न्यूड टच देते. ही खरेदी करताना तुमच्या स्किन टोनकडे विशेष लक्ष द्या. ज्याप्रमाणे तुमचा स्किन टोन आहे त्याचप्रमाणे ही लाँजरी तुम्ही ट्राय करा. कारण तसं नाही केलं तर तुमच्या या न्यूड लाँजरीची जादू नक्कीच काम करणार नाही. त्यामुळे न्यूड लाँजरी खरेदी करत असताना आपला नक्की स्किन टोन काय आहे हे एकदा आवर्जून नक्की पाहा.


वाईल्ड लुक (Wild Look)


wild look


वाईल्ड सेक्सबाबत आपण सर्वांनी ऐकलंही असतं आणि कितीही मान्य केलं नाही तरी आपण याचा विचारही केलेला असतो. असं जर असेल तर थोडा वाईल्ड लुक केला तर तुमचं त्यावर काय मत असेल? तुम्ही जर बोल्ड असाल आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याची आवड व्यवस्थित माहीत असेल तर हा लुक ट्राय करायला काहीच हरकत नाही.  तुमचा लुक थोडा वाईल्ड करत ही पहिली रात्र वाईल्ड करा. तुम्हाला जर पहिल्याच रात्रीत वाईल्ड व्हावं वाटत असेल तर हा वाईल्ड लुक तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुमचा हा वाईल्ड लुक पाहून तुमचा नवरा नक्कीच स्वतःला थांबवू शकणार नाही. मुलांना अशी सेक्सी लाँजरी खूपच आवडते. त्यामुळे तुम्हालाही असं काही ट्राय करायचं असेल तर नक्की करा.


हॅलोवीन लुक (Halloween Look)


halloween look


तुम्ही तुमची रात्र नॉटी करू इच्छित असाल किंवा आपल्या जोडीदाराला तुम्हाला एखादं हॉट सरप्राईज द्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचा हॅलोवीन लुक करू शकता. हा लुक नॉटी तर आहेच पण खूपच बोल्ड आहे. अशा प्रकारची लाँजरी खरेदी करून तुम्ही तुमची पहिली रात्र कायमस्वरूपी लक्षात राहणारी ठरवू शकता. हा ड्रेस अतिशय कमी वर्कने तयार करण्यात येतो. तसंच एकमेकांना जोडण्यासाठी यामध्ये पारदर्शक पट्टीदेखील बनवण्यात आली आहे, ज्यामुळे याला पूर्णतः हॅलोवीन लुक येतो.


लग्नानंतर नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त काही खास (Romantic Birthday Gift for Husband in Marathi)


लग्नानंतर नवऱ्याच्या पहिल्या वाढदिवसाला नेहमीच बायकोला काहीतरी खास करावं वाटतं. तुम्हाला फक्त गिफ्ट देऊनच नाही तर इतर त्याच्यासाठी काहीतरी खास करून सरप्राईज करायचं असेल तर लाँजरीचं खास सेक्सी गिफ्ट त्याला द्या. तुम्ही एखादी सेक्सी लाँजरी घालून आपल्या नवऱ्याबरोबर ट्विस्ट अँड टर्न्ससारखे बोल्ड आणि सेक्सी गेम्सदेखील खेळू शकता. अशावेळी कोणती लाँजरी वापरायला हवी ते पण जाणून घेऊया -


1. वन पीस बेबी डॉल फ्रॉक (One Piece Baby Doll Frock)


baby doll frock


गुलाबी रंगाचा हा बेबी डॉल फ्रॉक दिसायली जितका नॉटी आणि सेक्सी दिसत आहे तितकाच हा वजनाला अतिशय हलका आहे. आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही अशा तऱ्हेची लाँजरी घालून समोर आलात तर हे त्याच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट असेल. त्याच्या जन्मदिवसाचं हे गिफ्ट नक्कीच त्याला तुमच्या पहिल्या रात्रीची आठवण करून देईल. त्यामुळे वस्तू गिफ्ट देण्यापेक्षा असं सरप्राईज देणं जास्त चांगलं.


2. काहीतरी नॉटी (Try Something Naughty)


black naughty


असा कोणताही नवरा नाही, ज्याला आपली पत्नी नॉटी ड्रेसमध्ये आवडणार नाही. पण अर्थात ते फक्त बेडरूममध्ये. हा ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेस त्याच्या वाढदिवसासाठी एक सुंदर गिफ्ट ठरू शकतो. काळ्या रंगाचं हेच वैशिष्ट्य आहे की, हा रंग कोणत्याही स्किन टोनवर चांगला वाटतो. त्यामुळे हा खरेदी करत असताना तु्म्हाला तुमच्या स्किन टोनविषयी जास्त विचार करण्याची गरज नाही. शिवाय तुम्हाला तुमच्या नवऱ्याला मस्त सरप्राईजदेखील देता येईल.


3. थाँग अँड ब्रा थाँग (Thong and Bra Thong)


thong and bra thong


थाँगबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, तर आता जाणून घेऊया ब्रा थाँगबद्दल. या प्रकारची ब्रा ही अतिशय नॉटी आणि सेन्शुअस असते. पँटी थाँगप्रमाणेच यामध्येही सेक्सी लुक देण्यासाठी स्ट्राईप्सचा वापर करण्यात येतो. हे स्ट्राईप्स तुमच्या छातीच्या एकदम जवळपास असतात. शिवाय या प्रकारच्या थाँगमध्ये छातीच्या खालीही जागा मोकळी असते अर्थात छातीवर कोणत्याही प्रकारचं कापड तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे ही ब्रा अतिशय जास्त सेन्शुअस आणि सेक्सी दिसते. या लाँजरीमध्ये तुम्हाला पाहिल्यावर अर्थातच तुमचा नवरा तुम्हाला त्याच्यापासून दूर करणार नाही.


4. फर्स्ट अॅनिव्हर्सरी (First Anniversary)


लग्नानंतर केवळ एक वर्षांनीच वाढदिवस साजरा करायला हवं असं नाही. तुम्हाला हवं तेव्हा अगदी साखरपुड्याचा किंवा लग्नाचा एक महिना किंवा तुम्ही भेटल्याचा एक महिना कोणतीही अॅनिव्हर्सरी साजरी करू शकता. फक्त  तुमचा दिवस मात्र खास असायला हवा. मुलांना सहसा या तारखा लक्षात राहात नाही. त्यामुळे त्याचा फायदा उचलून तुम्ही त्या दिवशी त्यांच्यासाठी सेक्सी लाँजरीचं एक खास सरप्राईज गिफ्ट तयार ठेऊ शकता. तुमचा नवरा ऑफिसमधून घरी येण्यापूर्वी तुम्ही तयार राहा आणि अशा खास क्षणी तुम्ही अशी नॉटी लाँजरी नक्कीच ट्राय करू शकता.  


5. काफ्तान टॉप अँड पायजमा (Kaftan Top and Payjama)


kaftan and payjama


कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे घातल्यानंतर तुम्ही जर तुमच्या नवऱ्यासमोर आलात तर ते तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होऊन बघत बसतील. बोल्ड, सेक्सी आणि वाईल्ड अवतरातील तुम्ही तुमच्या नवऱ्याला नक्कीच आवडाल. हे घालून तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर कँडल लाईट डिनर घरात प्लॅन करा. त्यांची नजर तुमच्यापासून दूर जाणार नाही. तुम्हाला असं बघून तुमचा नवरा तुमच्या नक्कीच अधिक जवळ येईल.


6. सरप्राईजचा मूड (For Surprise Mood)


तुम्हाला जर असं वाटत असेल की, सरप्राईज फक्त तुमच्या नवऱ्याने द्यायला हवं तर असं अजिबात नाही. तुम्हीदेखील त्यांना सरप्राईज देऊ शकता. सरप्राईज प्रत्येकालाच आवडतात. नवं लग्न झालं असेल तर तुम्ही आपल्या नवऱ्याला आता सरप्राईज नक्कीच द्यायला हवं. त्यासाठी अर्थातच तुम्हाला हिरा अथवा सोन्याची गरज नाही. त्यासाठी एका नॉटी आणि सेक्सी लाँजरीची गरज आहे. बऱ्याचदा पुरुष हे चांगलं खाणं आणि तुम्हाला असं सेक्सी ड्रेसमध्ये पाहूनच खूष होतात. त्यामुळे असं सरप्राईज त्यांना नक्की द्या.


असा असू शकतो सरप्राईज ड्रेस (Surprise Dress)


surprise


हा फोटो बघून तुम्हाला वाटेल यात काय सेक्सी आहे. पण या सरप्राईज ड्रेसमध्ये तुम्ही तुमच्या रात्रीसाठी खूप गोष्टी लपवून ठेऊ शकता आणि तुमची रात्र अधिक नॉटी बनवू शकता. तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचं असेल तर अशी लाँंग नाईटी घालून त्यांच्यासमोर जा आणि थोडा सस्पेंन्स नक्कीच ठेवा. पण जेव्हा या नाईटीचं बटण उघडेल तेव्हा ते त्यांच्यासाठी खास सरप्राईज असेल.


फोटो सौजन्य -  Clovia, Zivame, Pretty Secrets


हेदेखील वाचा - 


‘40’ हॉट आणि सेक्सी हनीमून ड्रेस


किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची


कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या