ADVERTISEMENT
home / Care
जाणून घ्या केसांना कधी आणि कसं लावावं ‘हेअर ऑईल’

जाणून घ्या केसांना कधी आणि कसं लावावं ‘हेअर ऑईल’

निरोगी आणि मजबूत केसांसाठी केसांना नियमित तेल लावणं फार गरजेचं आहे. कारण केसांना नेहमी तेलाची मालिश केल्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. त्यामुळे केस लवकर तुटत नाहीत. शिवाय तेलाच्या मसाजमुळे केसांचे योग्य पोषण होते. केसांना पुरेसे पोषण मिळाल्यामुळे ते घनदाट आणि चमकदार होतात. मात्र आजकालच्या धावपळीच्या जगात केसांना तेलाने मालिश करण्यासाठी वेळ काढणं कठीण जातं. शिवाय तेलामुळे केस चिकट होत असल्यामुळे अनेकजणी केसांना तेल लावण्याचा कंटाळा करतात. केसांना तेल न लावल्यामुळे केसांचे अतोनात नुकसान होऊ शकते. शिवाय जर तुमचे केस मजबूत नसतील तर तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करू शकत नाही. यासाठीच तुम्हालादेखील असे घनदाट आणि मजबूत केस हवे असतील तर आठवड्यातून कमीत कमी दोनदा केसांना हेअर ऑईलने मालिश जरूर करा. केसांना तेल लावताना काही गोष्टींची काळजी मात्र घेणं फार गरजेचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी केसांना तेल लावलं तर ते मजबूत होण्याऐवजी कमकुवत होऊ शकतात.

hair oil 1

केसांना तेल कधी लावावे-

वास्तविक तुम्ही केसांना कधीही तेल लावू शकता. मात्र केस सकाळी धुण्याआधी रात्री केसांना तेलाने मालिश करण्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण जर तुम्ही दिवसा केसांवर तेल लावलं आणि घराबाहेर गेला तर चिकटपणामुळे केसांवर बाहेरील धुळ आणि माती बसते. ज्यामुळे केस आणखी खराब होतात. दिवसभर केसांमध्ये घाम आणि चिकटपणा राहील्यामुळे तुम्ही अस्वस्थ होताच शिवाय केसांमध्ये इनफेक्शन, कोंडा होण्याची शक्यतादेखील वाढते. यासाठीच रात्री केसांना तेल लावून ते सकाळी धुणे नेहमीच फायदेशीर ठरते. रात्रभर केसांमधील तेल तुमच्या स्कॅल्पमध्ये मुरते आणि केसांच्या मुळांचे चांगले पोषण होते. यामुळे तुमच्या केसांची त्वचा मॉश्चराईझ होते आणि केस मजबूत होतात. असं म्हणतात रात्री केसांना मालिश केल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. केसांच्या मुळांना हळुवार मसाज केल्यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. मेंदू आणि चेहऱ्याला पुरेसा रक्तपुरवठा झाल्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते. यामुळे सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा फ्रेश दिसतो. मात्र जर तुम्ही एखाद्या सुट्टीच्या दिवशी दिवसा हेअर ऑईल लावणार असाल तर ते लावल्यावर घराबाहेर पडू नका. ज्यामुळे तुमचे नक्कीच खराब होणार नाहीत.

कोणते हेअर ऑईल वापरावे-

नारळाचे तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल यापैकी कोणतेही तेल तुम्ही केसांसाठी वापरू शकता. अथवा या तेलांमध्ये केसांसाठी उपयुक्तऔषधी वनस्पती टाकून स्वतःच घरच्या घरी आयुर्वेदिक तेल तयार करू शकता. हेअर ऑईलची निवड करण्यापूर्वी तुमच्या केसांचा प्रकार आणि पोत या गोष्टींचा विचार जरूर करा. 

ADVERTISEMENT

आमची शिफारस मॅट्रिक्स बाय एफबीबी अल्ट्रा नरीशिंग रीच ऑईल तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता ज्याची किंमत आहे 210 रू. 

हेअर ऑईल लावण्याची योग्य पद्धत –

एका छोट्या वाटीत तुमच्या आवडीचे हेअर ऑईल घ्या. तेल हलके कोमट गरम केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तेल सामान्य तापमानावर आल्यावर बोटांच्या मदतीने अथवा कापसाच्या मदतीने ते केसांच्या मुळांना लावा. बोटांनी हळुवारपणे केसांच्या मुळांना मसाज करा. केसांवर तेल हाताने रगडून लावू नका. कारण त्यामुळे केसांच्या मुळांचे नुकसान होऊ शकते. केसांच्या मुळांप्रमाणेच थोडे तेल केसांच्या टोकापर्यंत लावा. मसाज केल्यामुळे तेल केसांच्या मुळांमध्ये जिरू लागेल. केसांना मालिश केल्यावर केसांवर गरम पाण्यात बुडवून घट्ट पिळलेला टॉवेल गुंडाळून ठेवा. ज्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत तेलाचे पोषण मिळण्यास मदत होईल. अर्धा ते एक तासाने केस थंड पाण्याने अथवा कोमट पाण्याने धुवून टाका. लक्षात ठेवा केस धुण्यासाठी अती गरम पाण्याचा वापर कधीच करू नका. कारण यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते.

hair oil

केसांवर किती प्रमाणात तेल लावावे-

केसांवर खूप तेल लावू नका कारण ते काढून टाकण्यासाठी तुम्हाला भरपूर शॅम्पूचा वापर करावा लागेल. जे तुमच्या केसांसाठी मुळीच हितकारक नाही. चोविस तासांपेक्षा अधिक वेळ केसांवर तेल राहू देऊ नका. कारण यामुळे तुमच्या केसांची त्वचा तेलकट होईल ज्यामुळे तुम्हाला त्वचेचं इनफेक्शन, कोंडा अथवा उवा अशा समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.

ADVERTISEMENT

आमची शिफारस हिमालया हर्बल्स अॅंटी हेअर फॉल हेअर ऑईल तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. ज्याची किंमत आहे 140 रू.

आणखी वाचा  Weight Loss करण्यासाठी नारळाचे तेल आहे उपयुक्त 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम  आणि शटरस्टॉक

 

ADVERTISEMENT

 

 

 

23 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT