ADVERTISEMENT
home / Sex Advice
Sexनंतर तुमच्या Relationshipमध्ये होतात बदल

Sexनंतर तुमच्या Relationshipमध्ये होतात बदल

Relationship दृढ करणाऱ्या गोष्टी आपण आधीही पाहिल्या आहेत. कोणतेही नाते फुलण्यासाठी त्या फारच महत्वाच्या असतात. पण प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. तुम्ही एकमेकांवर प्रेम करता ही सांगणारी गोष्ट असते sex. याचा चुकीचा अर्थ अजिबात काढू नका. कारण नात्यात प्रेम म्हटले की सेक्स आलेच. लग्न झाले असो किंवा नसो अनेकदा sex झाल्यानंतर नात्यांमध्ये अनेक बदल येतात. काही बदल हे चांगले असतात तर काही बदल वाईट.. तुम्हालाही असेच काहीसे वाटते का? तर मग नक्की वाचा

नाते दृढ करणाऱ्या या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात

  •  विश्वास वाढतो

confidence in love

नात्यात विश्वास हा अत्यंत महत्वाचा असतो. पण नाते जेव्हा पुढे जाते म्हणजे तुम्ही एकमेकांच्या फार जवळ येतात. त्यावेळी एकमेकांच्या शरीरावर विसंबून राहायलाही तुम्हाला आवडू लागते. सेक्सनंतर तुमच्या नात्याला बळकटी मिळते. कारण तुम्ही एकमेकांवर अवलंबून आहात अशी भावना तुमच्या मनात निर्माण होते. आपले प्रेम खरे आहे आणि ते आपलेच आहे हा विश्वास तुम्हाला तुमच्या नात्यात निर्माण होतो. मग त्यामुळे तुमच्या मनात वाईट विचारांचे येणे जरा कमी होते.

ADVERTISEMENT

Sex ही अशी खासगी गोष्ट आहे जी आपण फक्त आपल्या व्यक्तीसोबत करतो. अशा व्यक्तीसोबत जिच्यावर आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे स्वाभाविकच प्रेमाचे हे खास क्षण एकत्र घालवल्यानंतर एकमेकांवरील आपला विश्वास वाढतो

  • एकमेकांमध्ये गुंततो जीव

couple in love

Sex नंतर तुमचा जीव अगदी एकमेकांमध्ये गुंतून जातो. तुम्हाला तुमच्या Relationship पलीकडे काहीच गोष्टी महत्वाच्या वाटत नाही. एकमेकांमध्ये इतका जीव गुंततो की, त्यापलीकडे विश्वच नाही असे वाटू लागते. त्यामुळे तुमच्यामधील बोलणे वाढते. पुढे काय करायचे काय नाही करायचे याविषयची तुम्ही बोलू लागता. तुमच्या नात्याचे भवितव्य काय याचा विचार तुम्ही करु लागता.

एकमेकांमध्ये जीव प्रेमात तर गुंतत असतो. पण तुम्ही यापेक्षा एक पायरी वर चढता आता तुमचे मनच नाही तर शरीरही एकमेकांच्या ताब्यात असते. त्यामुळे आता तुमच्या मनासोबत तुमचे तनही तुमच्या जोडीदारामध्ये गुंतते .   

ADVERTISEMENT
  • एकमेकांबद्दल ओढ होते अधिक

couple in love

इतरवेळी आठवडा भेटले नाही तरी चालेल म्हणणारे sex नंतर मात्र एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आपल्या जोडीदाराला भेटण्याची प्रत्येक संधी ते शोधत असतात. एकमेकांसोबत घालवलेला काळ त्यांना आठवून त्या आठवणीत रममाण व्हायचे असते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी ओढ निर्माण होते.

उदा. एखादे जोडपे एकमेकांना महिन्याने भेटायचे त्यांच्यातल्या भेटीगाठी वाढतात. एकमेकांना सोडून कुठेही जायची त्यांना इच्छा होत नाही. एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवावा असे त्यांना वाटते.

  • दुरावा होत नाही सहन

cant live without you

ADVERTISEMENT

प्रेमात कधीच कोणाला दुरावा आलेला आवडत नाही. पण Sex नंतर तर दुरावा आलेला अजिबात आवडत नाही. एकमेकांपासून कधीच दूर जाऊ नये असे सतत वाटत राहते. कामाच्या ठिकाणीही तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विचार करत बसता. तो कुठेही बाहेर जाणार असे कळले तर तुम्हाला अगदी नकोसे होते. कारण त्याच्यापासून लांब राहणेच तुम्हाला नकोसे असते.

अनेकदा असे होते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या खूप जवळ असाल. त्याच्यासोबत तुम्ही जास्त वेळ घालवत असाल किंवा तुमचे शारिरीक नाते असेल तर त्याच्या नसण्याने तुम्हाला फार फरक पडतो.

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे तर आताच करा ब्रेकअप

  • जीवनात येतो आनंदच आनंद

happiness in love

ADVERTISEMENT

जर तुमच्या नात्यात काही गुंतागुंत असेल तर ती  Sex मुळेही संपू शकते. म्हणजे कधीकधी नात्यात कोणी सुरुवात करायची असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही एकमेकांच्या जवळ आल्यानंतर तुमचे एकमेकांसंदर्भातील समज-गैरसमज दूर होतात. तुमचे आयुष्य अधिक सुखकर होते. एकमेकांविषयीच्या अढी दूर होतात.

अनेकदा फिजीकली जवळ आल्यानंतर आयुष्याचे पुढील निर्णय घेण्याची तयारी अनेक जण दर्शवतात त्यामुळे होत असं की, तुमच्या नात्याला एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता असते.

Sex ही अशी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल खरंतरं तुम्हाला काहीच चुकीचं वाटता कामा नये कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण काहींच्या मनात Sex नंतर नकारात्मक विचार यायला सुरुवात होते. असे नकारात्मक विचार Relationship वर नकारात्मक परिणाम करतात. नाते टिकण्याचे सोडून ते नाते तुटायला त्यामुळे सुरुवात होते. काहींनी सेक्सनंतर येणारे नकारात्मक विचार आमच्याशी शेअर केले ते काय आहेत ते देखील जाणून घेऊया

तो /ती मला फसवणार तर नाही ना?

मी माझ्या जोडीदारासोबत संमतीने Sex केलं. पण त्यानंतर तो माझ्याशी नीट वागणार नाही अशी भीती वाटू लागली. त्याचा माझ्यामधील इंटरेस्ट आता कमी होईल. त्याला आता काही तरी नवे हवे असे वाटू लागेल. आमचे नाते संपुष्टात येईल.

ADVERTISEMENT

मुळात तुम्ही कोणावर प्रेम करता आणि सेक्स करता ही व्यक्ती तुम्हाला ओळखता यायला हवी. तुमचा जोडीदार हा तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रसंगी साथ देणारा असतो. समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत .मुली आहेत त्यांच्यासोबत  sex केल्यानंतर त्यांची व्हर्जिनिटी लुझ होते. त्यांना काही किंमत राहात नाही,असे आपणच आपले ठरवतो. आता अशा काही घटना घडल्या असतील जेथे मुलांनी मुलीला सोडून दिलं असेल किंवा मुलीने मुलाला डिच केले असेल. पण प्रत्येक व्यक्ती ही सारखी नसते. त्यामुळे सगळ्यांना एकाच तराजूत तोलण्याची चुकी करु नका.

 माझ्या प्रतीचा आदर होईल कमी

sex केल्यानंतर माझ्या प्रतीचा आदर कमी होईल अशी मला भीती वाटते. ही गोष्ट अशी आहे की, त्याला समाजाने बंधने घालून दिलेली आहेत. ती अमूकवेळीच व्हायला हवी असे आवर्जून सांगितले जाते. जर मी sex लग्नाआधी केले तर त्याचा समोरच्या व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होईल ती व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल असे विचार मनात सतत घोळू लागतात.

नात्यात होतायत गैरसमज? मग हे नक्की वाचा

Sex आणि आदर यांचा काहीच संबंध नाही. उगाचच समाजाच्या चौकटीत राहून याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही कोणावर शारीरिक सुखासाठी जबरदस्ती करत नाही तो पर्यंत सगळ्या गोष्टी या नात्यात चालतात. लग्नानंतर शरीर हे sex साठी असते असा विचार करणे अगदीच चुकीचे आहे. एखाद्याची इच्छा नसताना केलेल्या  sex मधूनही तुमचा अनादर होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या प्रेमालाही गालबोट लागू शकते. त्यामुळे हा विचार मनातून सगळ्यात आधी काढू टाका.

ADVERTISEMENT

मला तिला गमवायचं नाही

Sex कोणाला करायला आवडत नाही. पण  मी जे काय करतोय ते माझ्या जोडीदाराला पटले नाही तर ती मला सोडूनही जाऊ शकते. माझ्याबद्दल तिच्या मनात नकोनको ते विचार येऊ शकतात. मी ज्यावेळी माझ्या प्रेयसीसोबत sex केले. त्यानंतर ती माझ्यापासून दुरावली असे वाटू लागले. पण मला तिला गमवायचं नाही. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे.

सगळ्यात आधी तुमच्या मनातील काही विचारांनी तुमच्या मनात इतके घर केले आहे की तुम्हाला सगळ्याच गोष्टी चुकीच्या वाटत आहेत. तुमची प्रेयसी तुमच्यापासून दुरावली असे तुम्हाला वाटत असेल तर तिच्याशी बोला. भविष्याविषयी बोला. तुमचे तिच्यावर असलेले प्रेम तिला पटवून द्या. ती तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही.

आताच sex  केले तर आयुष्यभर काय करायचे

काही गोष्टी योग्यवेळी व्हाव्यात अशा नेहमी वाटतात. त्यातलीच ही गोष्ट आहे. Sex हे नेहमी योग्यवेळी व्हायला हवे नाहीतर उर्वरीत आयुष्यात करायचे काय?

हे अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात असतील तर तुम्ही फारच वाईट विचार करणारे आहात. नक्कीच योग्य वेळी योग्य गोष्टी व्हायला हव्यात. पण त्याचा  प्रत्येकवेळी संबंध तुम्ही सेक्सशी लावू शकत नाही किंवा तुम्ही लावायलाही नको.

ADVERTISEMENT

Sex ही प्रेम व्यक्त करण्याची वेगळी भावना आहे. त्याचा प्रत्येकवेळी वाईट अर्थ काढू नका.

(सौजन्य- shutterstock,GIPHY)

21 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT