ब्रा ही प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त वस्तू असते. पण बऱ्याचदा दुकानदाराकडे जाऊन ब्रा विकत घेण्यासाठी बऱ्याचशा महिला लाजतात. कधी लाजेने तर कधी घाईघाईत अथवा नीट विचार न करता आपल्या बूब्स (Boobs) साठी योग्य आकाराची (Size) ब्रा कोणती याचा विचारही नीट करत नाही. जे विकत घेतलं तेच आपल्यासाठी योग्य आहे असा विचार करून लवकरात लवकर दुकानातून बाहेर पडायची घाई महिलांना असते. एका रिसर्चनुसार साधारण 10 पैकी 8 महिला चुकीच्या आकाराच्या ब्रा चा वापर करतात. त्यामुळे तुमच्या स्तनांचा आकार बिघडतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य आकाराच्या ब्रा आणि त्याचे कप साईज योग्य असायला हवेत हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे आम्ही तुम्हाला तुम्ही तुमची योग्य आकाराची ब्रा कशी निवडावी हे सांगत आहोत. असं केल्यास, तुम्हाला पुढच्या वेळी ब्रा खरेदी करताना आपल्या स्तनांच्या योग्य आकाराबाबत जास्त विचार करावा लागणार नाही.
ब्रा चा आकार मोजण्याची योग्य पद्धत
ब्रा ची बँड साईज कशी बघावी
योग्य आकाराची ब्रा वापरण्याचे फायदे
आत्मविश्वास वाढवते
ब्रा शॉपिंग टीप्स
महिलांनी वापरण्याची ब्रा ही ब्लाऊजप्रमाणेच असते पण त्यापेक्षा आकाराने लहान असते. हे एक अंडरगारमेंट आहे जे स्तनांना झाकण्यासाठीच नाही तर स्तनांना सपोर्ट करण्यासाठी वापरण्यात येतं. वास्तविक स्तनांमध्ये कूपर लिगामेंट (Cooper Ligament) असतात जे जास्त मजबूत नसतात. जर ब्रा घातली नाही तर हे लिगामेंट सैल पडायला सुरुवात होते आणि स्तन लटकू लागतात. याशिवाय तुमच्या स्तनांमध्ये त्रास व्हायला सुरुवात होते. ब्रा आपल्या स्तनांना सपोर्ट देते आणि बऱ्याच त्रासांपासून सुटकाही देते.
ब्रा विभिन्न आकार आणि प्रकारामध्ये मिळते. ब्रा घालण्याची विविध उद्दिष्ट असतात आणि ती या वेगवेगळ्या ब्रा मुळे पूर्ण होतात. तसंच विविध प्रकारचे ब्रेस्ट शेपदेखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या स्तनांच्या आकार आणि तुम्ही घालणाऱ्या ड्रेसप्रमाणे या ब्रा ची निवड तुम्ही करू शकता.
उंच गळ्यातील ब्रेलेट बद्दल देखील वाचा
ज्या महिलांची छाती थोडी जड असते त्या महिलांसाठी ही ब्रा बनवण्यात आली आहे. ही ब्रा बाजारामध्ये पॅडेड अथवा नॉन पॅडेड या दोन्ही स्वरूपात मिळते.
अशा तऱ्हेची ब्रा तुमच्या स्तनांना पूर्ण कव्हर करत नाही तर तुमच्या स्तनांना वरच्या बाजूला लिफ्ट करते, त्यामुळे तुमचे स्तन थोडे वर, उभारलेले आणि सेक्सी दिसतात.
ही ब्रा सिंगल ब्रा प्रमाणे नसते. तर या ब्रा चे कप बनियन अथवा स्पगेटीवर लावलेले असतात. आजकाल जास्त महिला अशी ब्रा टॉपच्या आता घालतात.
अशा तऱ्हेची ब्रा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. याचा वापर जास्त केला जातो. या ब्रा चे स्ट्रेप्स काढता येतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पारदर्शक, लेसवाल्या स्ट्रेप्स लाऊनदेखील या ब्रा वापरू शकता.
या तऱ्हेचे ब्रा तुमच्या छातीला पूर्ण कव्हरेज देते. मोठे स्तन असणाऱ्या महिलांसाठी ही ब्रा अप्रतिम पर्याय आहे. ही ब्रा जास्त सपोर्टिव्ह आहे.
ही ब्रा विशेषतः स्तनपान करणाऱ्या आईंसाठी बनवण्यात आली आहे. अतिरिक्त सहायता आणि त्यांच्याद्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या सवलतीशिवाय, या ब्रा मध्ये फ्लॅप अथवा ओपनिंग लेसदेखील असते जी स्तनपान करणाऱ्या आईसाठी अतिशय सोयीस्कर असते. याचं कापड अगदी मुलायम असतं. जेणेकरून गरोदरपणानंतर स्तनांच्या आकारामध्ये येणाऱ्या बदलावर याच्यामुळे कोणत्याही अयोग्य परिणाम होऊ नये.
ही ब्रा विशेषतः खेळाडू महिलांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. जिम आणि व्यायाम करताना या ब्रा चा उपयोग करणं योग्य आहे.
अशा तऱ्हेची ब्रा साधारण ब्रा पेक्षा वेगळी दिसते. वास्तविक अशी ब्रा तुमच्या फिगरला सुडौल दाखवण्याचं काम करते. ही ब्रा तुमच्या छातीला वरच्या भागावर उचलून दाखवून क्लीव्हेज दाखवायचं काम करते. ज्या महिलांच्या स्तनांचा आकार लहान आहे त्यांच्यासाठी ही ब्रा उत्कृष्ट आहे.
ही ब्रा देखील पुश - अप ब्रा प्रमाणेच असते. फक्त या ब्रा मध्ये एक कट असतो जेणेकरून तुमचे क्लिव्हेज योग्य प्रकारे दिसू शकतील. ही ब्रा जास्तवेळा कट ड्रेस असल्यास वापरली जाते.
याच्या नावाप्रमाणेच याचा वापर आहे. ज्या महिलांचे स्तन लहान आहेत त्यांनी ही ब्रा वापरावी. दोन कप असणारी ही ब्रा स्तनांच्या वर चिकटवून वापरता येते.
एखाद्या आजारी माणसासाठी ज्याप्रमाणे औषध गरजेचं आहे त्याप्रमाणेच योग्य आकाराची ब्रा घालणं प्रत्येक महिलेसाठी गरजेचं आहे. तुम्ही योग्य आकाराची ब्रा न घातल्यास, तुमचा लुक खराब होतोच पण तुमच्या आरोग्यावरही त्याचा अयोग्य परिणाम होत असतो. भारतामध्ये 100 पैकी 80 टक्के महिला या चुकीच्या आकाराच्या ब्रा वापरतात. आपल्या ब्रा चा नक्की आकार कोणता हे जाणून घेण्यापूर्वी 32B, 28C, 34A या आकारांचा नक्की अर्थ काय हे जाणून घ्यायला हवं. आम्ही तुम्हाला सांगू शकतो की, 28, 30, 32, 34 हे तुमच्या स्तनांच्या खालच्या हाडांच्या खालचा आकार आहे ज्याला बँड साईज म्हटलं जातं. तर A,B,C,D हा स्तनांचा आकार आहे. ज्याला कप साईज असं म्हटलं जातं. यामध्ये A छोटा आणि D मोठा हा मोठा आकार समजला जातो.
आपली बँड साईज मोजण्यासाठी एक मेजरिंग टेप घ्या आणि आपल्या ब्रा च्या त्या भागाला रॅप करा जिथे ब्रा - कप संपतो, अर्थात ब्रा चा खालचा भाग. लक्षात ठेवा की, ही मेजरिंग टेप योग्य असायला हवी. याचा मागचा भाग अजिबाद दुमडलेला नसावा. टेपवर तुम्हाला जो क्रमांक दाखवत असेल त्यामध्ये अजून 1 क्रमांक जोडा हीच तुमची योग्य बँड साईज आहे. तुम्हाला एखादा विषम क्रमांक आला. उदा. 29, 31 इत्यादि, तर त्यापुढे येणाऱ्या सम संख्येला तुमची बँड साईज समजा. उदा. जर तुमचं माप 29 असेल तर तुमची बँड साईज 29+1=30 असेल. पाहा हा चार्ट -
ही टेप तुम्ही तुमच्या स्तनांच्या चारही बाजूला नापावी. जिथे जास्त आकार असेल तिथे व्यवस्थित टेप लावली आहे की नाही हे पाहून घ्यावं. या ठिकाणी जी संख्या येते ती जर पूर्णांकामध्ये असेल तर तुम्ही त्याचं पुढचं पूर्ण क्रमांक असलेलं माप बघावं. हाच तुमच्या स्तनांचा योग्य आकार आहे. उदा. याचं माप 34.5 असेल तर तुमच्या स्तनांचा आकार हा 35 आहे. ब्रा चं माप घेत असताना हे लक्षात ठेवा की, सामान्य दिवसातच तुम्ही हे माप घ्या. तुमची मासिक पाळी चालू असताना हे माप घेऊ नका. तसंच माप घेत असताना तुम्ही होरिझोंटली थोडं वाका म्हणजे हे माप योग्य मिळेल. तुम्ही अगदी सरळ उभे राहिल्यास, हे माप योग्य मिळणार नाही हे लक्षात घ्या.
आपल्या ब्रा चा बँड साईज मोजल्यानंतर आता तुम्ही तीच मेजरिंग टेप घ्या आणि ब्रा ची कप साईज मोजा. कप साईज मोजण्यासाठी पहिल्यांदा टेप आपल्या स्तनांवर ठेवा आणि मग चारही बाजूने योग्य माप घ्या. यावेळी लक्षात ठेवा की, टेप जास्त घट्ट करून माप घेऊ नका. टेप सरळ पकडा आणि स्तन जिथे वर आलेली दिसतील तिथंल माप घ्या. आपल्या कपचा आकार जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्तनांचा आकार आणि बँड साईज वेगवेगळी करावी लागेल. उदा. तुमच्या स्तनांचा आकार 32 असेल आणि बँड साईज 31 असेल तरत दोघांमधील तफावत 1 इंच असेल तर तुमच्या कपचा आकार हा A आहे. याचप्रमाणे जर हे अंतर 2 इंच असेल तर तुमची साईज B आहे, 3 इंच असेल तर तुमची साईज C आहे आणि जर हेच अंतर 4 इंच असेल तर तुमच्या कपाचा आकार हा D आहे. तुमची कप साईज अर्थात कपाचा आकार जाणून घेण्यासाठी हा चार्ट पाहा -
तुम्ही योग्य आकाराची ब्रा घातल असाल तर यामुळे तुम्हाला खूपच आराम मिळतो. तुम्ही अगदी सहजतेने कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकता. तसंच तुम्हाला यामुळे घामाचाही कोणताही त्रास होत नाही.
महिलांवर करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की, ज्या महिला ब्रा घालतात त्या ब्रा न घालणाऱ्या महिलांपेक्षा अधिक आत्मविश्वासी असतात. कारण ब्रा घातल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारची लाज अथवा भीती बाळगत नाही. त्यामुळे तुम्हाला अधिक आत्मविश्वास असल्याचं जाणवतं.
वास्तविक महिलांचे स्तन हे चरबीयुक्त असतात. ज्यामध्ये मांसपेशी नसतात. त्यामुळे ब्रा घातल्यामुळे स्तनांना योग्य सपोर्ट मिळतो. तसंच ब्रा घातल्यामुळे स्तनांच्या खालची त्वचा खेचली जात नाही आणि सैलही पडत नाही.
बऱ्याचशा महिलांचा म्हणणं असतं की, ब्रा त्यांच्या स्तनांना योग्य आकार देतात ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक लुकला परफेक्ट लुक येतो आणि त्या आकर्षक दिसतात. त्याशिवाय तुम्ही योग्य आकाराची ब्रा घातल्यास तुमचे स्तन अधिक सुडौल आणि आकर्षक दिसतात.
योग्य ब्रा घालण्याचा हाच फायदा आहे की, तुमचं शरीर योग्य पोस्चरमध्ये राहातं. कारण तुमचं शरीरा निरोगी राहण्यासाठी शरीर योग्य पोस्चरमध्ये असणंदेखील गरजेचं आहे. शरीराचं खराब पोस्चर हे अनेक रोगांसाठी निमंत्रण आहे. त्यामुळे मुलींना किशोरावस्थेच्या सुरुवातीलाच ब्रा घालण्याचा योग्य सल्ला देण्यात येतो.
तुम्ही जर ब्रा ची खरेदी करण्यासाठी जात असाल तर या टीप्स नक्की फॉलो करा -
काही लोकांच्या म्हणण्यानुसार रात्री ब्रा घालून झोपल्यास, शरीराला कोणतंही नुकसान होत नाही तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार रात्री ब्रा घालून झोपू नये. आता अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की, रात्री ब्रा घालून झोपणं योग्य की अयोग्य? तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर देतो. हे अर्थात तुमच्यावर आहे. तुम्हाला झोपताना ब्रा घालून झोपणं त्रासदायक आहे असं वाटत नसेल तर तुम्ही तसंही झोपू शकता. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रात्री टाईट ब्रा घालून झोपू नये. त्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होतं. यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही असतो. तरीही तुम्हाला रात्री ब्रा घालायचीच असेल तर अतिशय सैलसर ब्रा घाला आणि मग झोपा. तज्ज्ञांच्या मते ज्या महिलांचे स्तन खूपच मोठे असतात त्यांनी रात्री ब्रा घालूनच झोपावं त्यामुळे त्यांचे स्तन सैल पडत नाहीत.
तेव्हा आता जेव्हा तुम्ही ब्रा ची खरेदी करायला जाणार असाल तेव्हा तुमच्या ब्रा चा योग्य आकार मोजा. जेणेकरून तुम्हाला योग्य फिटिंग मिळेल आणि तुमची फिगरही उत्कृष्ट दिसेल.
फोटो सौजन्य - Shutterstock, Instagram
हेदेखील वाचा -
How to Choose a Bra in Hindi
कौन सी लेडीज ब्रा है बेस्ट
किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची
कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या
स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर तुम्हाला हे माहीत हवं