जाणून घ्या कोणत्या तऱ्हेच्या नेकलाईनवर कोणता नेकलेस घालावा - Necklace for Different Necklines in Marathi

जाणून घ्या कोणत्या तऱ्हेच्या नेकलाईनवर कोणता नेकलेस घालावा - Necklace for Different Necklines in Marathi

तुम्हीसुद्धा ही गोष्ट मान्य कराल की, कधी-कधी एखाद्या आऊटफिटवर योग्य नेकलेस निवडणं कठीण असतं. तुमचं आऊटफिट वेस्टर्न, पारंपारिक किंवा कसंही असो, त्यावर घातलेला नेकपीस हा तुमच्या लुकचा ग्रेस अनेकपटीने वाढवतो. पण प्रत्येक नेकपीस तुमच्या प्रत्येक ड्रेसवर सूटच करायला हवा असं आवश्यक नाही. नेकपीस विकत घेण्याआधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, तुमच्या ड्रेसची नेकलाईन कशी आहे. कारण वेगवेगळ्या नेकलाईनसोबत वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस सूट करतात.


खरंतर नेकलाईन ही एक अशी गोष्ट आहे, जी तुमचा लुक बिघडवूही शकते आणि बनवूही शकते. एक्सपर्ट्स सांगतात की, जर तुम्हाला सूट होणारा नेकलाईन ड्रेस तुम्ही घातला तर तुम्हाला मिळतो परफेक्ट लुक. योग्य नेकलाईनसोबत योग्य नेकलेस मॅच होणंही तितकंच आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या नेकलाईनसोबत कोणता नेकलेस घालावा ते.


एसिमेट्रीकल नेकलाईन्स (Necklaces For Asymmetrical Necklines)


इल्युजन नेकलाईन (Necklaces For Illusion Neckline)


स्ट्रॅपलेस किंवा ऑफ शोल्डर नेकलाईन (Necklaces For Strapless / Off Shoulder)


स्क्वेयर नेकलाईन (Necklaces For Square Necklines)


एक्सपर्ट नेकलेस टीप्स - Tips For Necklace in Marathi


वेगवेगळ्या नेकलाईनप्रमाणे निवडा नेकलेसेस - Necklace for Different Necklines in Marathi


हॉल्टर नेकलाईन्स (Necklaces For Halter Necklines)


how-to-choose-necklace-for-different-necklines-in-hindi %287%29


हॉल्टर नेकमुळे तुमची मान बारीक वाटते. त्यामुळे अशा प्रकारच्या नेकवर असा नेकपीस कॅरी करा ज्यामुळे तुमचा नेकएरिया भरलेला वाटेल. खरंतर हॉल्टर डिझाईन मूळतः एक उलट्या व्ही नेकलाईनसारखं असतं. अशा तऱ्हेच्या नेकलाईनवर तुम्ही डोरी किंवा चेन आणि मोठ पेडंट घातल्यास चांगलं दिसेल किंवा पफी, फ्लोरल राऊंड स्टाईल नेकपीस, जो तुमच्या क्लीवजेच्या वरचं असावा म्हणजेच नेकलाईनच्या आत असावा.


एसिमेट्रीकल नेकलाईन्स (Necklaces For Asymmetrical Necklines)


how-to-choose-necklace-for-different-necklines-in-hindi %286%29


आजकाल एसिमेट्रीकल नेकलाईन खूपच ट्रेंडमध्ये आहे. या प्रकारच्या नेकलाईनमुळे बॉडीला खूपच स्टाईलिश लुक मिळतो. एसिमेट्रीकल नेकलाईनमध्ये प्रत्येक बाजूने वेगवेगळा आकार दिला जातो. त्यामुळे ती समरूप दिसत नाही. जसं एका बाजूने ऑफ शोल्डर आणि दुसऱ्या बाजूने स्ट्रॅप्स. अशाप्रकारच्या नेकलाईनबाबत एक्सपर्ट सांगतात की, कोणत्याही प्रकारचा नेकलेस किंवा ज्वेलरी घालू नका. जर तुम्ही एखाद्या फंक्शनला जाणार असाल तर अशा नेकलाईनसोबत तुम्ही एसिमेट्रीकल नेकलेस कॅरी करू शकता. आजकाल सिल्व्हर ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही हवं असल्यास एसिमेट्रीकल नेकलाईनवर हेवी सिल्व्हर ज्वेलरी घालू शकता. तर वन शोल्डर नेकलाईनवर लाँंग पेडंट नेकलेसही तुम्हाला देईल गॉर्जियस लुक.  


बोट नेकलाईन्स (Necklaces For Boat Neckline)


Necklaces For Boat Necklines


ही नेकलाईन थोडी रूंद असते आणि तुमच्या खांद्यापर्यंत लांब असते. या नेकलाईनसोबत तुम्ही एखादा लाँग नेकलेस घातल्यास तो एकदम परफेक्ट दिसेल. तुम्ही यावर मल्टीलेयर लाँग नेकलेसही ट्राय करू शकता. तर तुमच्या गळ्याचा मोकळा भाग तुम्हाला जास्त स्टाईलिश आणि कॉन्फिडंट लुक देतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कॉलर्ड नेकपीसही ट्राय करू शकता, जे आजकाला खूपच ट्रेंडमध्ये आहे.


हाय नेकलाईन (Necklaces For High Neckline)


Necklaces For High Neckline


जर तुमचं आऊटफिट हायनेकलाईनचं असेल तर तुम्ही कोणताही विचार न करता हेवी चोकर नेकलेस कॅरी करू शकता.  जो तुमच्या गेटअपला चारचांद लावेल. याशिवाय जर तुमच्याकडे एखादा नेकलेस जो परफेक्ट नेकलाईनजवळ संपत असेल तर तोही तुम्ही घालू शकता.


कॉलर शर्ट / बटन डाऊन नेकलाईन्स (Necklaces For Collar Shirt/ Button Down Necklines)


how-to-choose-necklace-for-different-necklines-in-hindi %2811%29


जास्तकरून लोक कॉलर ड्रेसला फॉर्मल ड्रेस मानतात आणि याच कारणामुळे शर्टसारख्या आऊटफिटवर ज्वेलरी कॅरी करणं टाळतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो आजकाल ब्लाऊज, पार्टीवेअर आऊटफिट्स आणि एवढंच काय वेडींग फंक्शनमध्येही अशा ड्रेसेसमध्ये पीटर पॅन कॉलर नेकलाईनची डिमांड आहे. या नेकलाईनची खासियत म्हणजे या आऊटफिटसोबत तुम्ही अनेक एक्सपेरिमेंट करू शकता. हवं असल्यास तुम्ही कॉलरच्या आत जिथे बटन बंद होते तिथपर्यंत मल्टी लेअरचा नेकलेस घालू शकता आणि पार्टी फंक्शनला जाताना एखादा हेवी कुंदनचा सेटही कॅरी करू शकता. जो तुम्हाला टोटल इंडो वेस्टर्न लुक देईल.


इल्युजन नेकलाईन (Necklaces For Illusion Neckline)


Necklaces For Illusion Neckline


आजकाल इल्युजन नेकलाईन खूपच फॅशनमध्ये आहे. अशा प्रकारच्या नेकलाईन्समध्ये तुम्ही छोटे नेकलेस करा. ज्याची आकृती नेकलाईनशी मिळती जुळती असेल. जितकी लांब तुमची नेकलाईन असेल तितकाच तुमचा नेकलेस असावा. अशाप्रकारे तुमच्या इल्युजन नेकलाईनच्या आऊटफिटवर तुम्हाला परफेक्ट नेकलाईन मॅच मिळेल.  


स्कूप नेकलाईन (Necklaces For Scoop Necklines)


Necklaces For Scoop Necklines


या नेकलाईनवर तुम्ही लांब किंवा खूप छोटा असा नेकपीस घालण्याची गरज नाही. व्ही नेकप्रमाणे तुम्ही यावर असा नेकलेस घाला जो तुमच्या आऊटफिटला सूट होणारा असेल. बीड्स पर्ल्स आणि आजकाला सिल्व्हरमध्ये मिळणारी कॉईन ज्वेलरी तुम्ही यावर ट्राय करू शकता. लक्षात ठेवा की, स्कूप नेकलाईनवर चोकर किंवा कॉलर्ड नेकपीस घालणं टाळा. अशा नेकलाईनवर जर तुम्हाला कर्व्हवाला एखादा नेकलेस मिळाला तर क्या कहने.


स्वीटहार्ट नेकलाईन्स (Necklaces For Sweetheart Necklines)


how-to-choose-necklace-for-different-necklines-in-hindi %285%29


रील लाईफ सोडल्यास असे खूप कमी जण आहेत जे या प्रकारच्या नेकलाईनचा ड्रेस घालतात. कारण या नेकलाईनचा प्रकार लोकांना खूपच अनकंफर्टेबल वाटतो. ज्यांना ही नेकलाईन कॅरी करता येईल त्यांनी यावर नक्षीदार मोती किंवा पेडंटचे नेकपीस घालावे. लक्षात ठेवा की, हा नेकलेस तुमच्या नेकलाईनच्या वर असावा आणि तसंच तुमच्या ड्रेस किंवा टॉपच्या नेकलाईनला ओव्हरलॅपही करू नये. स्ट्रॅपलेस स्वीटहार्ट नेकलाईनवर तुम्ही चोकर किंवा बीड्सने बनवलेला शॉर्ट आणि राऊंड नेकलेस घालू शकता.


स्ट्रॅपलेस किंवा ऑफ शोल्डर नेकलाईन (Necklaces For Strapless / Off Shoulder)


Necklaces For Strapless Off Shoulder


जर तुम्ही स्ट्रॅपलेस किंवा ऑफ शो्ल्डर ड्रेस कॅरी करणार असाल तर यावर तुम्ही चोकर किंवा शॉर्ट राऊंड नेकलेस ट्राय करू शकता. ज्यामुळे तुमची मान ही दिसेल सुंदर आणि तुमच्या ड्रेसला मिळेल परफेक्ट लुक.  


व्ही नेकलाईन्स (Necklaces For V Necklines)


Necklaces For V Necklines


या नेकलाईनचा प्रकार हॉल्टर नेकसारखाच आहे. ही नेकलाईन बहुतेक सगळ्यांनाच आवडते. ही नेकलाईन प्रत्येक बॉडी टाईपवर चांगली दिसेल. या नेकलाईनवर तुम्ही लांब पेडंट पीस, मल्टीलेयरचा नेकलेस किंवा सिंगल टोनवाल पेडंट घातल्यास चांगल दिसेल. जर तुम्हाला लोकांच्या नजरा तुमच्याकडेच वळाव्यात असं वाटत असल्यास या नेकलाईनवर तुम्ही एखादा गडद रंगाच्या नेकपीसची निवड करू शकता. लक्षात ठेवा की, तुमचा नेकपीस जास्त लांब किंवा छोटा नसावा.  


टर्टल नेकलाईन (Necklaces For Turtle Necklines)


Necklaces For Turtle Necklines


टर्टल नेकलाईन तुमच्या पूर्ण गळ्याला झाकते. यामुळे या प्रकारातलं आऊटफिट आकर्षक दिसावं म्हणून तुम्ही लाँग नेकपीस ट्राय करू शकता. या नेकलाईनवर तुम्ही बीडेड लेयर्सची ज्वेलरी घातल्यास छान दिसेल. या नेकलाईनची खासियत म्हणजे या नेकलाईनवर प्रत्येक प्रकारचा नेकलेस सूट करतो. पण यावर चोकर आणि छोटा नेकपीस घालू नका.


स्क्वेयर नेकलाईन (Necklaces For Square Necklines)


Necklaces For Square Necklines


या नेकलाईनवर तुम्ही गोल, बीड्स आणि चोकर नेकपीस घालू शकता. एक्सपर्ट सांगतात की, जर तुम्ही चौकोनी गळ्याचं आऊटफिट घालणार असाल तर त्यावर अँग्युलर पेडंट खूपच चांगल दिसेल. पण लक्षात ठेवा की, या प्रकारच्या नेकलाईनवर कॉलर बोनपर्यंत येणारा नेकलेस ट्राय करा. जास्त मोठा नेकपीस घातल्यास तुमचा लुक खराब होईल.


क्वीन ऐनी (Necklaces For Queen Anne Necklines)


Necklaces For Queen Anne Necklines


क्वीन ऐनी नेकलाईन क्वीन एलिजाबेथच्या आऊटफिटसारखी नेकलाईन असते. यामध्ये पाठच्या बाजूला कॉलर असते.  क्वीन ऐनी नेकलाईनवर तुम्ही मोत्यांचा छोटासा गोल हार घालू शकता किंवा छोट्या पेडंटचा हारही घालू शकता.


डीप नेकलाईन्स (Necklaces For Deep Neckline)


Necklaces For Deep Neckline


डीप नेकलाइनवर नेहमी लाईट वेट स्टोन नेकलेसचं कॅरी करावे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नेकचा डीपनेस लपवण्यासाठी लेयर्ड नेकलेसीह घालू शकता.


प्लन्ज नेकलाईन (Necklaces For Plunge Necklines)


Necklaces For Plunge necklines


ही नेकलाईन तुम्हाला देते हॉट आणि सेक्सी लुक. प्लन्जिंग नेकलाईनची खासियत ही आहे की, तुम्ही यावर बऱ्याच एक्सपेरिमेंट करू शकता. तुम्ही यावर छोटासा मोत्यांचा हार घालू शकता. लांब बीड्सचा हार किंवा दोन-तीन हारही एकत्र घालू शकता.


काउल नेकलाईन (Necklaces For Cowl Necklines)


how-to-choose-necklace-for-different-necklines-in-hindi %289%29


या प्रकारच्या नेकलाईनवर खरंतर कोणत्याच नेकलेसची आवश्यकता नसेत. पण जर तुमची इच्छा असल्यास तुम्ही घालूही शकता. या नेकलाईनवर तुम्ही गोल्ड किंवा डायमंड किंवा लाईट पेडंटची चेन घालू शकता. या प्रकारच्या नेकलाईनवर तुम्ही राउंड सिंपल ईयरिंग्स घातल्यास ही सुंदर दिसतात. यामुळे तुमच्या ड्रेसला सिंपल आणि क्लासी लुक मिळतो.


एक्सपर्ट नेकलेस टीप्स - Tips For Necklace in Marathi


how-to-choose-necklace-for-different-necklines-in-hindi %282%29


प्रसिद्ध फॅशन डिझाईनर अनिता डोंगरे सल्ला देतात की, तुम्ही कोणत्याही प्रकारचा नेकपीस ट्राय करताना सर्वात आधी हे ठरवा की, तुमचा नेकपीस उठून दिसत आहे की नाही. तसंच याकडेही लक्ष द्या की, तुमच्या आऊटफिटच्या रंगावर नेकपीसचा रंग ओव्हरलॅप तर होत नाही ना. डार्कवर लाईट रंगाचा आणि लाईटवर डार्क रंगाचं कॉम्बिनेशन करा. असं आवश्यक नाही की, रेड कलरवर रेड कलरचाच नेकपीस घालावा. आजकाल नेकपीसमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. जी दिसायला हेवी पण वजनाला खूपच लाईट वेट असते. तसंच कलरफुलही असते. हे कलरफुल नेकपीस तुम्ही जवळपास सर्व ड्रेसेसवर ट्राय करू शकता.


नेकलाईन आणि नेकलेसबाबत विचारले जाणारे काही प्रश्न आणि उत्तरे (Necklaces For Different Neckline) FAQS


Necklaces For Different Neckline FAQS


राउंड नेकलाईनसोबत कोणत्या प्रकारचा नेकलेस चांगला दिसेल?


जर तुमच्या ब्लाऊज गळा जास्त डीप नसेल तर म्हणजेच नॉर्मल लांबीचा असेल तर त्यावर चोकर किंवा मीडियम लांबीचा कोणताही नेकलेस घातल्यास चांगला दिसेल. तुम्ही कोणत्याही लांबीचा मोत्यांचा नेकलेसही घालू शकता.


डीप नेकलाईनचं आउटफीटला कंफर्टेबल कसं बनवता येईल?


जर तुम्हाला डीप नेक घालायची सवय नसल्यास ड्रेसवर सेम कलरचा ट्यूब टॉप घालू शकता किंवा त्यावर लेयर्ड नेकपीस घालूनही क्लीवेज हाईड करू शकता.


कमी उंची असणाऱ्यांनी कोणत्या प्रकारचा नेकलाईन्स घातल्या पाहिजेत?


व्ही नेक डिझाईनमुळे  तुमचा गळा लांब वाटतो. गोल गळा आणि बोट नेकसारख्या डिझाईन्स घातल्याने तुमची उंची अजूून लहान वाटते.


प्रत्येकवेळी नेकपीसला मॅचिंग ईयररिंग्जच घातल्या पाहिजेत का?


असं काही गरजेचं नाही की, तुमचा नेकपीस आणि ईयररिंग्ज मॅचिंग असले पाहिजेत. जर तुम्ही साडी, लेहंगा किंवा एखादं मॉर्डन आऊटफीट घालणार असाल तर कोणताही एक प्रकार इग्नोरही करू शकता.


प्रत्येक तऱ्हेच्या नेकलाईनसोबत सूट होणारी कॉमन ज्वेलरी कोणती?


तुमच्या आऊटफीटची नेकलाईन कशीही असली तरी तुम्ही कोणताही आकर्षक लांब नेकलेस घालून सुंदर दिसू शकता. लांब नेकलेस व्ही शेप, राऊंड नेक, बोट शेप या अन्य प्रकारच्या कोणत्याही नेकलाईनसोबत चांगला दिसेल.


हेही वाचा -


मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर


सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी 


साजशृंगार ‘नथी’चा, महाराष्ट्रीयन नथीचा बदलता ट्रेंड