मधुमेह हा एक लाईफस्टाईल विकार आहे. आजकाल मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मधूमेह या आरोग्य समस्येबाबत चिंतेची गोष्ट अशी याची कोणतीही लक्षणे सुरूवातील दिसून येत नाहीत. त्यामुळे मधुमेह हा एक सायलेंट किलर विकारांपैकी एक आहे. मधुमेह जरी पूर्ण बरा करता येत नसला तरी मधुमेह नियंत्रणात ठेवणं नक्कीच शक्य आहे. यासाठी तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करणं फार गरजेचं आहे. कारण दैनंदिन जीवनात थोडेफार बदल करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता.
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी करा हे उपाय
मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये तुमच्या शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण ज्याला आपण ग्लुकोज असे म्हणतो ते अती प्रमाणात वाढते. वास्तविक ग्लुकोजमुळे शरीराला ऊर्जा मिळते. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातून ग्लुकोज तयार होत असते. मधुमेहामुळे शरीराला स्वादुपिंडात इन्शुलिनचा पूरवठा कमी होतो. ज्यामुळे रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण अनियंत्रीत होऊन वाढू लागते. या आरोग्य स्थितीला मधूमेह अथवा डायबिटीज असे म्हणतात. इन्शुलिन हे एक हॉर्मोन असते जे पचनग्रंथीतून स्त्रवते. या हॉर्मोन्सचे काम खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जेची निर्मिती करणे हे असते. मात्र मधुमेहामुळे इन्शुलिनच्या निर्मितीत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरातील ग्लूकोज प्रमाणापेक्षा अधिक वाढू लागते. रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण अचानक वाढू लागल्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
Also Read Home Remedies For Blood Pressure
काही संशोधनानुसार महिलांपेक्षा पुरूषांमध्ये मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. मधूमेहाचे मुख्य चार प्रकार आहेत.
या प्रकारच्या मधुमेहामध्ये इन्शुलिनची निर्मिती कमी होते अथवा पूर्णपणे बंद होते. हा मधुमेह होण्याचे कमी प्रमाण असले तरी काही केसेसमध्ये हा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. साधारणपणे बारा ते पंचविस या वयातील मुलांना हा मधुमेह झाल्याचे आढळून येते. आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार भारतात 1 ते 2 टक्के टाईप 1 मधुमेहाचे रुग्ण आहेत.
टाईप 2 मधुमेह झालेल्या लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण इतक्या प्रमाणावर वाढते की ते नियंत्रणात आणणे कठीण जाते. या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती करू शकत नाही. हा मधुमेह अशा लोकांना होण्याचा धोका अधिक असतो ज्यांचे बीएमआय 32 पेक्षा अधिक आहे. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि काही वेळा आई-वडीलांना मधुमेह असल्यास टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.
गरोदरपणी होणाऱ्या मधुमेहाला जस्टेशनल डायबिटीज असे म्हणतात. या मधुमेहाच्या प्रकारात गरोदर महिलांच्या शरीरातील रक्ताची पातळी अचानक वाढते. वास्तविक या महिलांना प्रेगन्सी आधी कोणत्याही प्रकारचा मधुमेह झालेला नसतो. तरीही त्यांना गरोदरपणी या मधुमेहाचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थितीत इन्शुलिनच्या मदतीने रक्तातील साखर नियंत्रित केली जाते. बाळंतपणानंतर या महिलांचा मधुमेह पूर्ण बरा देखील होतो.
या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरातील रक्ताची पातळी थोड्याप्रमाणात वाढते मात्र तिचे प्रमाण अधिक नसते. त्यामुळे याचा अर्थ तुम्ही मधुमेही आहात असा मुळीच होत नाही. मात्र याला मधुमेह होण्याचे पूर्वलक्षण असं नक्कीच म्हणता येईल. जीवनशैलीत चांगले बदल आणि संतुलित आहार घेऊन तुम्ही या मधुमेहापासून सुटका करून घेऊ शकता.
मधुमेह झाल्यास त्याचे निदान करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण चाचण्या करणं फार गरजेचं आहे.
ग्लुकोज फास्टिंग टेस्ट म्हणजेच फाल्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज (एफपीजी) टेस्ट करून मधुमेहाचे निदान करता येते. ही टेस्ट सकाळी उपाशीपोटी केली जाते. टेस्ट करण्यापूर्वी न खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे अचूक प्रमाण मिळण्यास मदत होते.
या टेस्टमध्ये तुमच्या शरीरातील रक्तातील ग्लुकोजचे रोज कमी जास्त होणारे प्रमाण तपासले जात नाही. त्याऐवजी मागील तीन महिन्यांमध्ये तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे बदलले प्रमाण शोधले जाते. ही टेस्ट टाईप 2 मधुमेहाचे निदान करण्यासाठी केली जाते.
ही टेस्ट नेहमीच्या चेकअपचा एक भाग आहे. जर तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपचार घेत असाल तर डॉक्टर तुम्हाला नियमित ही टेस्ट करण्यास सांगतात. ही एक साधारण टेस्ट असून ती उपाशीपोटी करण्याची गरज नाही.
आजकाल मधुमेह हा एक जीवनशैली विकार होत चालला आहे. भारतात मधुमेंहींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासाठी आज प्रत्येकाला मधुमेह नियंत्रित कसा करावा हे माहीत असायलाच हवे. जर वेळीच शरीराकडे योग्य लक्ष दिले नाही तर त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावा लागू शकतो. यासाठी वेळीच उपाययोजना करून तुम्ही मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकता.
वाढणारे वजन मधुमेहच नाही अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देते. यासाठी तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. जर तुमचे वजन अती प्रमाणात वाढले तर तुमचे शरीर इन्शुलिन बाबत असंवेदनशील होते. त्यामुळे कमी वजन असणे नेहमीच तुमच्यासाठी फायद्याचे ठरते.
जर तुम्हाला तुमचा मधुमेह नियंत्रणात आणायचा असेल तर चालण्याचा व्यायाम जरूर करा. आजकाल दिवसभर ऑफिसमध्ये कंप्युटर, लॅपटॉपवर काम केल्यामुळे शरीराची हालचाल कमी प्रमाणात होते. त्यामुळे दररोज कमीत कमी अर्धा तास चाला. शिवाय ऑफिसमध्ये दर एक तासाने काहीतरी काम करण्यासाठी उठा. ज्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होईल.
ब्रेड, पास्ता, तांदूळ असे अती स्टार्च असलेले अथवा अती कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन करा. तेल अथवा तूपापासून तयार केलेले पदार्थ कमी खा. त्याऐवजी उकडलेले आणि रोस्ट केलेले पदार्थ आहारात वाढवा. बाहेरचे विकत पदार्थ खाणे टाळा. प्रोसेस्ड फूड अथवा हवाबंद पदार्थ आहारातून पूर्ण वर्ज्य करा. आहारात ताक, मोड आलेली कडधान्य, फळे अथवा उकडलेलं अंड अशा गोष्टीचा समावेश करा. जेवणात सॅलेड जरूर खा. ज्यामुळे शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते जे ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते.
चिंता आणि काळजी हे तुमच्या शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढवणारे महत्वाच्या गोष्टी आहेत. यासाठी ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ताणाचे प्रमाण वाढल्यास तुमच्या शरीरातील कार्टिसोल या हॉर्मोन्सची निर्मितीदेखील वाढते. हे हॉर्मोन तुमच्या शरीरातील इन्सुलिनच्या कार्यात अडथळा आणते. ज्यामुळे तुमची रक्तातील साखर अचानक वाढते. यासाठी नियमित योगासने, नृत्य अशा शारीरिक अॅक्टिव्हिटीज करा ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन निरोगी राहील. मधुमेह टाळण्यासाठी सतत आनंदी रहा.
नियमित हेल्थ चेकअप केल्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण मॉनिटर करण्यास मदत होईल. कारण जर एकदा रक्तातील साखर अती प्रमाणात वाढली तर ती नियंत्रणात आणणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. वाढलेली ग्लुकोजची पातळी तुमच्या इतर शारीरिक क्रियांवर परिणाम करू लागते. यासाठी ग्लुकोजची पातळी नियंत्रणात असणं फार गरजेचं आहे.
जर जेवणापूर्वी तुमच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त असेल तर सावध व्हा आणि त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
योगासनांमुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही नियंत्रित राहते. नियमित योगायने केल्यास तुमचा मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय प्रि डायबेटीक लोकांनी योगासने केल्यास त्यांना भविष्यात मधुमेह होत नाही.
प्राणायमाचे अनेक प्रकार आहे. मात्र मधुमेंहींनी नियमित भ्रामरी आणि कपालभाती हे प्राणायम करावेत. ज्यामुळे तुमच्या शरीराला पूरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. शरीर आणि मन प्रसन्न राहते. ज्यामुळे मधुमेहापासून तुमची सुटका होऊ शकते.
जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करायचे असेल तर हे योगासन जरूर करा.
या आसनामुळे पाठीच्या कण्यासह शरीरातील मागच्या भागातील सर्वच अवयवांना चांगला ताण मिळतो. ज्यामुळे या आसनाचा तुम्हाला फायदा होतो. शरीराला योग्य ताण मिळाल्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत होतात.
या आसनामुळे तुमचा मधुमेह तर नियंत्रित राहतोच शिवाय तो हळूहळू कमी देखील होऊ शकतो. कारण या आसनामुळे तुमचा शरीर आणि मनावरचा ताण कमी होतो.
जर तुम्ही वर्किंग वूमन असाल अथवा तुमची जीवनशैली बैठी असेल तर हे आसन तुमच्यासाठी अगदी वरदान ठरू शकते.
मीठाचा अती वापर शरीरासाठी नक्कीच योग्य नाही. मात्र मीठ खाण्याने मधुमेह होत नाही. मधुमेहींना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण मधुमेह हा एक मेटाबॉलिक आजार आहे. मधुमेह नसेल तर तुम्ही योग्य प्रमाणात मीठ जरूर खाऊ शकता.
मधुमेहींच्या रक्तातील साखर नियंत्रित असेल तर फार कमी प्रमाणात साखरेचे पदार्थ खाण्यास हरकत नाही. मात्र अती प्रमाणात गोड पदार्थ खाणे टाळावे.
निसर्गाने प्रत्येक फळामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात दिलेली आहेत. त्यामुळे निरोगी जीवनासाठी फळांचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. मात्र मधुमेंहींनी अती गोड फळे कमी प्रमाणात खावीत. मधुमेही सफरचंद, पेरू, संत्रे अशी फळं अवश्य खावी.
त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया (Benefits Of Mustard Seeds In Marathi)
पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय (PCOD Problem And Solution in Marathi)
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक