एका रात्रीत चेहरा उजळवण्यासाठी फॉलो करा Overnight टिप्स (Tips For Glowing Face In Marathi)

एका रात्रीत चेहरा उजळवण्यासाठी फॉलो करा Overnight टिप्स (Tips For Glowing Face In Marathi)

दिवसभर आपली धावपळ चालू असते आणि यामध्ये आपल्याला आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायला जमतंच असं नाही. त्यामुळे बऱ्याचदा चेहऱ्यावर नैसर्गिक गोष्टींचा वापर न करता अनेक महागडी कॉस्मेटिक क्रिम्सचा वापर करण्यावर भर दिला जातो. पण घरगुती असे काही उपचार आहेत, जे तुम्हाला एका रात्रीमध्ये चेहरा उजळवण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमचा चेहरा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसण्यास मदत होते.


1. तांदूळ आणि तिळाची कमाल (Rice And Sesame Seeds)


rice


समप्रमाणात तांदूळ आणि तीळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे वापरण्यासाठी मिक्सरमधून वाटून घ्या. तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करायची सवय असल्यास हा तुमच्यासाठी योग्य उपाय आहे. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहरा आणि संपूर्ण शरीरावर लावा. ही पेस्ट साधारण दोन ते तीन मिनिट्स तशीच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. तीळ तुमच्या त्वचेला चांगलं पोषण (nourish) देतात आणि त्याशिवाय मॉईस्चराईजही करतात, तर तांदूळ तुमच्या शरीरावरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतात.


वाचा - भारतीय त्वचा वेगळी का आहे


2. दूधामध्ये आहे देशी घटक (Milk Contain Indigenous Ingredients)


milk


दूध हा यावरील सर्वात सोपा आणि जुना उपाय आहे. एका रात्रीत तुमची त्वचा तजेलदार बनवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर दूध लावा आणि मसाज करा. तुमची त्वचा ही संपूर्णतः दूध शोषून घेते. रात्रभर दूध लाऊन चेहरा असाच राहू द्या. सकाळी उठून जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ धुवाल तेव्हा तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल.


वाचा : तांदळाचे पीठ म्हणजे काय


3. मुलतानी माती आहे ऑल इन वन (Multani Mitti)


multani mitti


मेकअप असल्यास, तुम्ही चेहऱ्यावरून तो काढून टाका. आता त्यावर मध आणि मुलतानी मातीचा पॅक लावा आणि साधारण 15 मिनिट्स तुमचा चेहरा तसाच ठेवा. जेव्हा हा पॅक सुकेल तेव्हा हातावर थोडंसं पाणी घेऊन हळूहळू हे पॅक 2-3 मिनिट्स चेहऱ्यावर स्क्रब करा. त्यानंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर व्यवस्थित चेहरा पुसून त्यावर नाईट क्रीम लावा. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसून येईल आणि चेहरा अधिक तजेलदार दिसेल.


4. डोळ्यांना विसरू नका (Don't Forget Eyes)


eyes


चेहरा तेव्हाच तजेलदार दिसतो, जेव्हा तुमचे डोळे निस्तेज नसतात. तुमचे डोळे हा चेहऱ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे झोपताना आयमास्क लावायला विसरू नका. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने डोळ्यांवर पाण्याचा हलकासा मारा करा. त्यामुळे तुमचे डोळे तजेलदार आणि स्वच्छ राहतील.


5. चा वापर करून मनासारखी झोप (Sleeping Packs)


sleeping packs


Sleeping packs देखील त्वचेला पोषण करण्याचं काम करतात. तसं तर तुम्ही चांगल्या दर्जाचे स्लिपिंग पॅक बाजारामधून घेऊ शकता. पण घरगुती पॅक जास्त परिणामकारक असतात. त्यासाठी तुम्हाला घरी अर्धा चमचा बदामाचं तेल घेऊन त्यात 3-4 थेंब जोजोबा (jojoba oil) ऑईल घालून मिक्स करायचं आहे. त्यानंतर या तेलाने काही वेळ चेहऱ्यावर मसाज करा आणि रात्रभर तसंच लाऊन ठेवा. सकाळी क्लिंझरने चेहरा साफ करून घ्या. याचा परिणाम तुम्हाला चेहऱ्यावर स्वतःला जाणवेल. तुमची त्वचा यामुळे अतिशय तुकतुकीत दिसेल.


वाचा - सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच तयार करा फेसपॅक


6. टॉमेटो आणि मधाची कमाल (Tomatoes And Honey)


tomato and honey


टॉमेटोचा रस हा त्वचेला टाईट करण्यासाठी खूपच चांगला असतो. एक टॉमेटोच्या रसामध्ये एक चमचा मध घ्या. लक्षात ठेवा की, या दोन्ही गोष्टी ऑर्गेनिक असायला हव्यात. आता ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लाऊन रात्रभर ठेवा. सकाळी चेहरा धुवा. तुमचा चेहरा तजेदलदार आणि चमकदार दिसेल. कदाचित तुम्हाला यामुळे तुमची बेडशीट धुवावी लागेल. पण तुम्हाला जर एका रात्रीत आपला चेहरा सुंदर दिसायला हवा असेल तर त्यासाठी नक्कीच हे तुम्हाला करणं सोयीस्कर आहे.


फोटो सौजन्य - Shutterstock


हेदेखील वाचा - 


भारतीय महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी टीप्स


नितळ त्वचा हवी असेल तर असा करा हळदीचा वापर


ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा


भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी


चेहऱ्यावर ग्लो कसा आणाल