पोट आणि पाठीवरच्या केसांपासून सुटका मिळवा 6 पद्धतीने

पोट आणि पाठीवरच्या केसांपासून सुटका मिळवा 6 पद्धतीने

तुम्ही तुमच्या पोट आणि पाठीवरच्या अर्थात लोअर बॅकवरील केसांपासून त्रस्त असलात तर तुम्ही या जगात एकट्याच अशा नाही हे मुळात लक्षात घ्या. या जागांवर केस येणं हे अतिशय नैसर्गिक आहे. तुम्हाला जेव्हा सेक्सी साडी अथवा काही फॅशनेबल ड्रेस घालायचा असतो तेव्हा हे केस त्यामध्ये अडचण ठरतात. पण यासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण हे नैसर्गिक असलं तरीही यामध्ये वाईट काहीच नाही आणि मुळात या गोष्टींवर आपल्याकडे उपचारही आहेत. आम्ही तुमच्यासाठी काही अप्रतिम उपाय घेऊन आलो आहोत. तुम्ही तुम्हाला हे नको असलेले केस काढून सुटका मिळवू शकता. पण त्यासाठी तुम्ही हे उपाय नीट करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय करणं काहीच कठीण नाही. अगदी सहजतेने तुम्ही हे उपाय फॉलो करू शकता.


1. जादुई हेअर रिमूव्हल क्रिम (Hair Removal Cream)


hair removal cream


शरीराच्या संवेदनशील भागामध्ये अर्थात पोट आणि पाठीसाठी हेअर रिमूव्हल क्रिम हा चांगला पर्याय आहे. शिवाय हे क्रिम महागदेखील नसतं. पण हे क्रिम आपल्या त्वचेसाठी योग्य आहे की, नाही याची पडताळणी करून पाहण्यासाठी आधी हातावर अथवा पायावर या क्रिमचा एक पॅच लाऊन पाहा. यामुळे तुम्हाला क्रिम त्वचेवर कसा परिणाम करतं हे तुम्ही पाहा. तुम्हाला जर कोणतीही अडचण नसेल तर तुम्ही बिनधास्त याचा उपयोग करू शकता. ही पद्धत कमी वेळ तर घेतेच शिवाय याचा परिणाम इतर पद्धतीच्या तुलनेत (उदा. शेव्हिंग) जास्त वेळ राहातो.


2. कमालीचं रेझर (Razor)


razor


ही पद्धत सर्वांच्या बजेटमधील आहे. तुम्ही जेव्हा रेझरने तुमचं पोट आणि लोअर बॅक शेव्ह कराल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, तुमच्या त्वचा कोरडी असू देऊ नका. तुमच्या केसांवर पाणी घालून ही त्वचा वा हा भाग ओलसर आणि सॉफ्ट करून घ्या तसंच काही मिनिट्स हा भाग असाच ओलसर राहू द्या. त्यानंतर या जागी शेव्हिंग क्रिम लावा आणि मग केसांच्या वाढीच्या दिशेने शेव्ह करा. याचं वैशिष्ट्य असं आहे की, ही पद्धत तुम्ही घरच्या घरी आरामात वापरू शकता. शिवाय हे करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. लोअर बॅक अर्थात पाठीवर शेव्ह करत असताना तुम्हाला स्वतःला ते करता येणार नाही त्यामुळे तुम्ही कोणाची तरी मदत घ्यावी असा आमचा सल्ला असेल. असं केल्यामुळे कोणताही भाग कट होण्याची भीती राहात नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेडिज रेझरचाच वापर करा. Layered blades आणि moisturizing स्ट्रिपसह येणाऱ्या रेझरचाच वापर करा. त्यामुळे तुम्हाला चांगलं आणि स्मूथ शेव्ह करता येतं.


3. परिणामकारक ब्लीच (Bleach)


bleach


तुमच्या पोटावर आणि पाठीवर अगदी कमी केस असतील (fine hair) तर त्यांना काढण्याची अजिबातच गरज नाही. त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ब्लिचींग क्रिम लावा आणि साधारण 10-15 मिनिट्स तसंच ठेवा. कमी केसांसाठी ही अतिशय कमी त्रासदायक आणि योग्य पद्धत आहे. हे तुम्ही घरच्या घरी अथवा तुमच्या जवळच्या पार्लरमधूनही करून घेऊ शकता. अर्थात हे तुमच्यावर अवलंबून आहे.


4. वॅक्सिंग चांगला पर्याय (Waxing)


wax


हा उपाय परिणामकारक तर आहेच पण त्याचबरोबर अगदी सटीक आणि लवकर आटपणारा पर्याय आहे. यामध्ये थोडासा त्रास होतो. पण चांगल्या परिणामासाठी इतकं तर तुम्ही नक्कीच करू शकता. पोट आणि पाठीची त्वचा ही अतिशय संवेदनशील असते. त्यासाठी वॅक्स केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बर्फाचे तुकडे फिरवा. त्यामुळे रॅश अथवा सूज येणार नाही. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही हे पार्लरमधून करू शकता अथवा घरच्या घरी तुम्ही वॅक्सिंगच्या स्ट्रिप्सही वापरू शकता.


5. Electrolysis बद्दल काही माहीत आहे का?


Electrolysis


Electrolysis चा परिणाम हा कायमस्वरूपी असतो. पण ही पद्धत करण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि थोडी महाग पद्धत आहे. यामध्ये तुमच्या त्वचेमध्ये electric current पास केला जातो, जो केसांमधील follicles संपुष्टात आणतो आणि त्यामुळे केस येणं बंद होतं. याच्या खूपशा सेशन्सनंतर तुमच्या त्वचेवर केस राहात नाहीत आमि तुमची त्वचा एकदम स्मूथ होते. पण हे करण्याचा निर्णय घेण्याआधी नीट विचार करा आणि तुम्ही तुमच्या  dermatologist (स्किनच्या डॉक्टर) शी व्यवस्थित सल्लामसलत करा.


6. लेझर (Leaser)


leaser


Electrolysis प्रमाणेच हीदेखील थोडी महाग पद्धत आहे. या पद्धतीलाही बराच वेळ लागतो. पण याचा परिणाम बऱ्याच कालावधीपर्यंत राहातो. तसंच तुम्हाला नरम, मुलायम आणि केसांपासून मुक्त त्वचेची हमी नक्कीच मिळते. यामध्ये लेझर डिव्हाईस घेऊन त्यातून pulsed लाईट सोडण्यात येतो जो हेअर follicles संपुष्टात (destroy) आणतो. सुरक्षित उपचारासाठी कोणत्याही व्यावसायिक (professional) कॉस्मेटिक dermatologist चा सल्ला घ्या आणि मग ही पद्धत ट्राय करा.


फोटो सौजन्य - Shutterstock


हेदेखील वाचा - 


अप्पर लीपवरील केस काढताय, मग तुम्ही अशी घ्यायला हवी काळजी


#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय


अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या