ADVERTISEMENT
home / मनोरंजन
चीनमध्ये हृतिक ठरला ‘दा शुई’, चीनच्या प्रेक्षकांना आवडला काबिल

चीनमध्ये हृतिक ठरला ‘दा शुई’, चीनच्या प्रेक्षकांना आवडला काबिल

बॉलीवूडस्टार हृतिक रोशनचा ‘काबिल’ (Kabil) हा चित्रपट भारतामध्ये तुफान चालला होता. नुकताच हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला आहे. इथल्या प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूपच आवडला आहे. या चित्रपटाला चिनी प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचं कौतुक तर होतच आहे. पण त्याचबरोबर हृतिकचंही खूप कौतुक होत आहे. हृतिकचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला आहे की, चीनमधील सिनो लँड येथील त्याच्या चाहत्यांनी त्याला ‘दा शुई’ अर्थात अतिशय देखणा पुरुष असं नाव दिलं आहे. यापूर्वीदेखील हृतिकला त्याच्या लुकमुळे ‘धूम 2’ नंतर ‘ग्रीक गॉड’ असं नाव दिलं होतं. याशिवाय जगातील देखण्या पुरुषांच्या यादीत हृतिकचा सातवा क्रमांक लागतो. भारतीय प्रेक्षकांमध्ये ‘ग्रीक गॉड’ म्हणून प्रसिद्ध असलेला हृतिक आता चिनी प्रेक्षकांमध्ये ‘दा शुई’ या नावाने प्रसिद्ध होत आहे.

kaabil

चीनमध्ये भारतीय चित्रपटांची रेलचेल

गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपटांची रेलचेल दिसून येत आहे. यापूर्वी चीनमध्ये प्रदर्शित झालेले ‘दंगल’, ‘सुलतान’, ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांनीही तुफान यश मिळवलं आहे. इतकंच नाही तर काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या आयुषमान खुराणा आणि तब्बूच्या ‘अंधाधून’ या चित्रपटाने चीनमध्ये 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता या चित्रपटामध्ये हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटाचं नावही समाविष्ट झालं आहे. भारतामध्येही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हृतिक रोशन फार कमी चित्रपटांमध्ये काम करतो. पण ज्या चित्रपटांमध्ये काम करतो त्या चित्रपटाची कथा आणि त्याचा अभिनय अप्रतिम असतो. त्यामुळेच त्याचे चित्रपट बघण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात.

हृतिकचा ‘सुपर 30’ होणार जुलैमध्ये प्रदर्शित

super 30

ADVERTISEMENT

हृतिक रोशन काबिलनंतर ‘सुपर 30’ जुलै महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पुन्हा एकदा हृतिक आणि कंगनामधील बाचाबाची प्रेक्षकांच्या समोर आली होती. पण यावेळीदेखील हृतिकने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. या चित्रपटामध्ये हृतिक आयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित भूमिका साकारत असून यातून मराठी अभिनेत्री मृणाल ठाकूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. चिनी प्रेक्षकांना हृतिकचा अभिनयदेखील खूप आवडला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे इतर चित्रपटांप्रमाणेच आता हृतिकचा काबिलदेखील चीनमध्ये किती कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.

‘कहो ना प्यार है’ पासून करिअरची सुरुवात

हृतिक रोशनने आपल्या करिअरची सुरुवात ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटापासून केली आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. पण त्याचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुझानबरोबर लग्न झाल्यावर घेतलेला घटस्फोट असो अथवा कंगनाबरोबरील त्याची मैत्री असो हृतिक नेहमीच चर्चेत राहिला आहे. कंगनाबरोबर तर अजूनही मधूनमधून हल्लाबोल चालू असतात. कंगनाची बहीण रंगोली हृतिकला नेहमीच ट्विट करून टोमणे मारत असते. पण हृतिक यावर कधीही प्रतिक्रिया देत नाही. ‘सुपर 30’ चित्रपटाच्या बाबतीतही हृतिकने सावध पवित्रा घेत अतिशय सौम्य शब्दात बाजू मांडत प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. ‘मेंटल है क्या’ या कंगना आणि राजकुमारच्या चित्रपटाबरोबर ‘सुपर 30’ चित्रपटाची तारीख क्लॅश होत असल्यामुळे हृतिकने आपल्या निर्मात्यांना विनंती करत ही तारीख पुढे ढकलली आहे.

फोटो सौजन्य – Instagram 

 

ADVERTISEMENT
30 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT