Good news: कपिल शर्मा लवकरच बनणार ‘बाबा’

Good news: कपिल शर्मा लवकरच बनणार ‘बाबा’

कॉमेडी क्वीन भारतीनंतर आता कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच बाबा बनणार असल्याचे कळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्माची बायको गिन्नी शर्मा गरोदर असून तिची प्रकृती चांगली ठणठणीत आहे.  पण अद्याप कपिलने या संदर्भातील कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे अजून तरी या चर्चाच आहे असे म्हणायला हवे. पण कपिलकडे या व्यतिरिक्तही एक Good news आहे. जी खात्रीलायक आहे.


मिस्टर इंडिया येणार परत, मोगॅम्बो होणार परत खूश


कपिल होणार बाबा?


kapil ginni %281%29


शनिवारी पहिल्यांदा कपिल बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पण इतका मोठा आनंद कपिल शर्माने अद्यापही शेअर केलेला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलच्या घरात बाळाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. पापाराझींनी दिलेल्या माहितीनुसार गिन्नी चतरथला त्यांनी तपासणी जातानाही पाहिले आहे. गेल्या 2 वर्षांपासून कपिल शर्माच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येऊन गेले. आता तो स्थिरावला तर आहेच. पण सोबत ही आनंदवार्ताही ऐकायला मिळतेय म्हटल्यावर कपिलचे पुढील आयुष्य अधिक सुखकर असेल,अशी आशा आहे.


लवकरच येणार आहे 'कंचना'चा रिमेक लक्ष्मी बॉम्ब


कपिल आहे नंबर वन


संतती सुखाच्या आनंदवार्तेसोबतच कपिलकडे आणखी एक गुडन्यूज आहे ती म्हणजे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कपिलचे नाव नोंदले गेले आहे. त्यामुळे ज्या कॉमेडीसाठी त्याने इतका स्ट्रगल केला तो सार्थकी लागला असेच म्हणायला हवे. काही महिन्यापूर्वी त्याचा कपिल शर्मा शो पुन्हा सुरु झाला आणि हा हा म्हणता त्याचा शो टीआरपीच्या वरच्या पदाला पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कपिल नंबर वन असेच म्हणायला हवे.


चांगला नव्हता काही काळ


kapil sharma fi


कपिल शर्माने त्याच्या करिअरची सुरुवात तर चांगली केली. त्याचा शो देखील चांगला सुरु होता. पण त्याचे आणि सुनील ग्रोवरचे झालेले. त्यानंतर शोच्या टीआरपीवर झालेला परिणाम. बंद पडलेला शो असे बरेच काही या 2 वर्षात झाले. शो व्यतिरिक्त त्याचे वादग्रस्त ट्विटही त्याच्यासाठी नाहक त्रासदायक ठरले. या सगळ्यानंतर तो पुन्हा कमबॅक करु शकेल अशी आशाही धूसर होत चालली होती.कारण त्याचा कॉमेडी नाईट विथ कपिल हा शो सुरु झाला. पण पुन्हा थांबला. त्यानंतर कपिलही तणावाखाली गेला. त्या काळात तो स्थुल झाला होता. त्याचे अनेक फोटो पापाराझींनीही टिपले होते. त्याची ती अवस्था पाहून त्याचे फॅनही विथरले होते. हा शो परत सुरु होणार की नाही अशी अनेकांना शंका होती.पण कपिलने आता कमबॅक केले आहे आणि त्याच्या शिरपेचात बेस्ट कॉमेडिअनचा तुराही खोवून घेतला आहे.


2008 मध्ये झाला विवाहबद्ध


आराध्या बच्चनचा व्हिडिओ झाला व्हायरल.. पाहा तिचा डान्स व्हिडिओ


kapil ginni


कपिलने 12 डिसेंबर 2008 रोजी त्याची बालमैत्रीण गिन्नी चतरथ हिच्याशी विवाह केला. कपिलचे लग्न हे बी टाऊनसाठी एक सोहळाच होता. एरव्ही आपल्या शोमध्ये सगळ्या सेलब्रिटीजना बोलावणारा कपिल… त्याच्या लग्नसोहळ्यालाही बी टाऊनमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. याच दरम्यान अंबानी यांच्या घरात लग्न असल्यामुळे मान्यवरांची संख्या कमीही असेल पण कपिलचे लग्न धुमधडाक्यात झाले होते.