मिठी मारणे ही प्रेम व्यक्त करण्याची एक साधी पद्धत आहे. मिठी मारल्यामुळे एखाद्याचा राग पटकन शांत होऊ शकतो. मिठीतून प्रेम आणि विश्वासाची भावना दृढ होते. मिठी मारल्यामुळे एकमेकांमध्ये चांगले बॉंडिंग निर्माण होते. मिठीमुळे समोरच्या व्यक्तीला सुरक्षित आणि प्रेमाची भावना वाटू शकते. मिठी फक्त प्रियकर आणि प्रेयसीच एकमेकांना मारतात असं नाही. आई आणि मुलं, नवरा-बायको, मित्र-मैत्रिणी आणि भावंडाना कडकडून मिठी मारून तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. कधीकधी शब्दात ज्या भावना व्यक्त करता येत नाहीत त्या एका मिठीत व्यक्त करणं सोपं जाऊ शकतं. एवढंच नाही तर मिठी मारल्याचे अनेक आरोग्य फायदेदेखील असतात. मिठी मारण्याचे हे आरोग्यफायदे जरूर वाचा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला दिवसभरात एकदातरी कडकडून मिठी मारा.
एका संशोधनानुसार एकमेकांना मिठी मारल्याने रक्तप्रवाह सुधारतो असं सिद्ध झालं आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल अशा लोकांनी कुटुंबिय अथवा जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने त्याचा रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्यामुळे त्यांची हायपरटेंशनची समस्या दूर होऊ शकते.
अती रक्तदाब अथवा कामाचा ताण यामुळे ह्रदयावर ताण येतो. हळूहळू याचा परिणाम तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यावर पडू लागतो. म्हणूनच जर तुम्हाला निरोगी आणि स्वस्थ आयुष्य हवे असेल तर तुमच्या पार्टनरला आणि मुलांना जवळ घ्या. तुमच्यासोबत तुमची प्रिय माणसं आहेत ही भावना तुम्हाला निरोगी जीवन देण्यासाठी समर्थ ठरू शकते.
नियमित प्रिय व्यक्तींना मिठी मारल्यामुळे तुमच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण होते. काही क्षणांसाठी तुम्ही तुमच्या मनातील चिंता काळजी पासून दूर जाता. ज्याचा परिणाम तुम्हाला रिलॅक्स आणि आरामदायक वाटते. सुरक्षित वातावरणामुळे मनात निर्माण झालेले चिंतेचे काहूर कमी होते. जर कामाच्या ठिकाणी असलेला ताण-तणाव तुम्हाला सतावत असेल तर घरी गेल्यावर जोडीदार अथवा मुलांनी मारलेल्या प्रेमळ मिठीमुळे तुम्हाला फ्रेश वाटू लागते.
जर तुम्हाला वारंवार राग येत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. जर तुमच्या पार्टनरला अथवा मुलांना पटकन राग येत असेल तर त्यांच्यावर चिडण्यापेक्षा त्यांना घट्ट मिठी मारा. मिठीमध्ये एखाद्याचा राग निवळण्याची ताकद असते. कारण मिठीमुळे तुम्ही तुमच्याजवळील चांगला भावना समोरच्याव्यक्तीमध्ये परवर्तित करत असता.
कधीकधी एखाद्या अनाहूत भितीमुळे एकटेपणा जाणवू शकतो. बऱ्यादचा मुले अथवा वयस्कर लोकांना ही समस्या जाणवण्याची शक्यता असते. अशा वेळी मुलंं अथवा वयस्कर आईवडीलांना तुमच्याकडून फक्त मिळालेली एक मिठी जादूचे काम करू शकते. तुमच्याकडून दिवसभरात मिळालेली एक जादूची झप्पी त्यांच्यामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मदत करते.
एका संशोधनानुसार जी माणसं सतत प्रिय व्यक्तींना मिठी मारतात त्यांचं मन नेहमी प्रसन्न राहतं. प्रसन्न मनाचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. मन आणि शरीर उत्तम असेल तर तुम्ही आजारपणांपासून नक्कीच दूर राहता. जास्तीत जास्त आजार हे तुमच्या नकारात्मक विचारसरणी आणि दुःखी मनातून निर्माण होत असतात. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी झप्पी द्या आणि खूश रहा.
आनंदी जीवन जगण्यासाठी या '10' गोष्टी अवश्य करा
मानसिक ताणाला दूर ठेवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय (How to Relieve Mental Pressure in Marathi)
यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार (How To Be Positive In Marathi)
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक