बिझी लाईफस्टाईलमध्ये केसगळतीची प्रमुख कारणं Main Reasons for Hairfall

बिझी लाईफस्टाईलमध्ये केसगळतीची प्रमुख कारणं Main Reasons for Hairfall

केस हे तुमच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचं आकर्षण आहे. एखाद्या व्यक्तीचे सुंदर केस हे त्या व्यक्तीची कधीकधी ओळखही बनते. आपल्या सौंदर्यात भर पाडण्याचं काम हे आपले केस करत असतात. साधारणतः एका व्यक्तीचे दिवसभरात कमीतकमी 80 केस तुटतात असं म्हटलं जातं. पण हेच प्रमाण जर वाढलं तर ते चिंतेचं कारण बनू शकतं. आजकाल शहरी भागात केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खासकरून महिलांमध्ये केसगळतीची समस्या वाढल्याचं चित्र आहे, त्याची प्रमुख कारण खालीलप्रमाणे -


1.  तणाव


ezgif.com-resize %2811%29


आजकाल शहरी भागातील महिलांच्या समस्येत अनेकपटीने वाढ झाली आहे. त्यांच्यावर फक्त घर सांभाळण्याची नाहीतर करिअरचीही जवाबदारी असते. चांगल्या करिअरसोबत घरही चांगलं ठेवण्याच्या अतिरिक्त दबावामुळे महिलांमध्ये तणावाच प्रमाण वाढलं आहे. याच तणावामुळे शरीरामध्ये एंड्रोजनची मात्रा वाढते, ज्यामुळे केसात कोंडा निर्माण होतो. डँड्रफ आणि शँपूच्या सतत वापरामुळे केसगळतीची समस्या वेगाने होते. तणाव कमी झाल्यास फक्त केसगळतीच नाहीतर चांगलं जीवन जगण्यासही मदत होते. त्यामुळे योग, ध्यान आणि तुमच्या जवाबदाऱ्यांचा ताण घेणं तुम्ही कमी केल्यास केसगळती थांबू शकते.


2. अनियमित खाणंपिणं


health-facts-pizaa


धावपळीच्या आयुष्यात तुम्ही इतक्या बिझी असता की, त्यामुळे दिवसेंदिवस अनहेल्दी फूड प्रोडक्ट्स खायचं प्रमाण वाढलं आहे. आपले केस निरोगी आमि सुंदर राहण्यासाठी योग्य प्रमाणात आर्यन, प्रोटीन आणि व्हिटॅमीनचं सेवन आवश्यक आहे. जे आपल्याला अनहेल्दी फूड प्रोडक्ट्समधून मिळू शकत नाही. जर तुम्हाला काळे आणि घनदाट लांब केस हवे असतील तर हेल्दी आणि नैसर्गिक फूड खाणं आवश्यक आहे. त्यामुळे जंक फूड टाळा.


नॉन व्हेजिटेरियन्सनी अंड, मासे, खेकडे यासारखे केसांसाठी उपयुक्त पदार्थ आहारात सामील केले पाहिजेत. अंड्यात आर्यन, झिंक, सल्फर आणि सेलेनिअमचं चांगल प्रमाण असतं तर माश्यांमध्ये ओमेगा -3 हे चरबीयुक्त आम्ल असतं तर खेकडा हा  झिंक आणि व्हिटॅमीन बी -12 चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे सर्व पौष्टीक आहार तुमच्या केसांना चमकदार आणि सिल्की ठेवतात तसंच चांगला लुकही मिळतो.


तर व्हेजिटेरियन्सनी आपल्या आहारात प्रून्स (आलुबुखारा किंवा सुकवलेली बोरं ) आणि बीटचा आपल्या आहारात विशेषतः समावेश केला पाहिजे. तसंच व्हिटॅमीन सी युक्त फळांचाही आहारात समावेश केला पाहिजे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात आर्यन असते. यामधून कोलेजनची निर्मिती होते आणि केस मजबूत आणि लांब होतात.


3. व्यायामाची कमतरता


exercise


शारीरिक व्यायामासाठी आपल्यापैकी अनेकांना वेळच देता येत नाही. शारीरिक व्यायामाने ना फक्त शरीर मजबूत होतं तर केसही मजबूत होतात. नियमितपणे एक्सरसाईज करणाऱ्या महिलांचे केस नेहमीच सुंदर आणि मजबूत असतात. सामान्यपणे व्यायाम केल्यावर आपल्या शरीरात नवीन सेल्सची निर्मिती होते. नियमित व्यायाम केल्याने चांगली झोप आणि कोशिका निर्माण याशिवाय केसही चमकदार होतात. व्यायामामुळे केसांतील रोमछिद्रांना ऑक्सीजन मिळतो. ज्यामुळे रक्ताभिसरण वाढून ऑक्सीजन केसांपर्यत पोचतो. केसांना जेवढा ऑक्सीजन मिळेल तेवढे केस निरोगी आणि मजबूत होतात.


प्रत्येक व्यक्तीचे केस आणि त्यांची क्वालिटी वेगवेगळी असते. त्यामुळे तु्म्ही केसांच्या समस्यांसंबंधी हेअर एक्सपर्टचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. एक बॅलेंस लाईफस्टाइल फॉलो करण्यामुळे तुमचा लुकच नाही तर ओव्हर ऑल हेल्थही सुधारते.


(डॉ विनोद सोनावणे, एम डी - हेअर ट्रांसप्लांट सर्जन, ट्रिचोलॉजीमध्ये पीजी डिप्लोमा आणि ब्लूम हेअर ट्रांसप्लांट यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित)