निरनिराळ्या फेस शेपसाठी ट्राय करा 'या' मेकअप टीप्स

निरनिराळ्या फेस शेपसाठी ट्राय करा 'या' मेकअप टीप्स

मेकअप करण्याची आवड प्रत्येकीलाच असते. मात्र मेकअप करणं ही एक कला आहे. त्यामुळे प्रत्येकीला चांगलाच मेकअप करता येईलच असे नाही. मेकअप करण्यासाठी खास कौशल्य अवगत असणं गरजेचं आहे. प्रोफेशनल मेकअप कोर्सेस आणि मोठमोठ्या मेकअप आर्टिस्ट यामुळे या क्षेत्राला एक ग्लॅमर प्राप्त झालं आहे. एखादया खास प्रसंगी सुंदर दिसण्यासाठी अथवा  प्रोफेशनल मेकअपसाठी मेकअप आर्टिस्टची मदत घेणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्हाला दररोज निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी सतत मेकअप करावा लागत असेल तर ही कला तुम्ही स्वतःच अवगत करणं फार आवश्यक आहे. काही सोप्या आणि साध्या मेकअप टीप्समुळे तुम्ही दररोज निरनिराळा लुक ट्राय करू शकता. तुमच्या चेहऱ्याचा आकार, तुमचा स्किन टोन कसा आहे हे ओळखून तुम्ही तुमचा मेकओव्हर नक्कीच करू शकता. यासाठी मेकअप बाबत ही सविस्तर माहिती जरूर वाचा.


तुमच्या चेहऱ्याच्या शेपनुसार करा मेकअप (Makeup Tips for Different Face Shapes)


निसर्गाने प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार निरनिराळा निर्माण केला आहे. म्हणून मेकअप करताना तुमच्या चेहऱ्याचा शेप लक्षात घेऊनच मेकअप करा. फेस शेपनुसार मेकअप केल्यामुळे तुमचा लुक आणखी खुलून येतो. 


गोल चेहरा (Round Shaped Face)


round shape


गोल चेहरा दिसायला छान असला तरी तो आकाराने इतर फेसशेपपेक्षा मोठा दिसतो. म्हणूनच अशा शेपच्या चेहऱ्याच्या महिलांनी त्यांच्या डोळ्यांच्या मेकअपवर अधिक भर देणं गरजेचं आहे. शिवाय अशा चेहऱ्याच्या महिलांनी स्लिम लुक दिसेल असा मेकअप करावा. स्लिम लुकसाठी चेहऱ्यावर कंन्टुरिंग करताना योग्य कंसिलरचा वापर करा. डोळ्यांवर डार्क शेडची आयलायनर, आयशॅडो वापरा. ब्लश करताना गालावर आडवे स्ट्रोक द्या. ज्यामुळे तुमचे चीकबोन्स वर दिसतील आणि तुम्ही स्लिम दिसाल.


चौकोनी चेहरा (Square Shaped Face)


Square Shaped Face%29


चौकोनी चेहऱ्यावर मेकअप करताना कंन्टुरिंग करण्यासाठी मॅट शिमर वापरा. हे शेड तुमच्या नैसर्गिक शेडपेक्षा कमीतकमी एक दोन शेड डार्क असावेत. शिवाय चेहऱ्याचे एंगल कव्हर करण्यासाठी डोळ्यांच्या मेकअपवर विशेष भर द्या.


डायमंड फेस शेप (Diamond Shaped Face)


Diamond Shaped Face


डायमंड फेस शेपमध्ये चिकबोन्स रूंद असतात आणि जॉ लाईन आणि कपाळ अरूंद असतं. कंटुरिंगच्या मदतीने चेहरा मेकअपने बॅलेंस करताना ब्लशर चिकबोन्सवर न लावता चिकबोन्सच्या खाली लावा. ब्लशर निवडताना पिंक अथवा हलक्या रंगाचे  न निवडता डार्क पिंक रंगाचं निवडा. लिपस्टिक देखील फार ग्लॉसी न वापरता मॅट लिपस्टिक वापरा.


ओव्हल शेप  (Oval Shaped Face)


Oval Shaped Face


ओव्हल शेप चेहऱ्यावर चांगला मेकअप केला तर तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून येईल. शिवाय ओव्हल शेप चेहऱ्यावर कंटुरिंगची गरज नसते. जर तुम्हाला तुमचे चिकबोन्स हायलाईट करायचे असतील तर डार्क शेडचं ब्रॉंझर वापरा. डोळ्यांना आकर्षित करण्यासाठी आयब्रोजनां नैसर्गिक आकार देण्याचा प्रयत्न करा.


वाचा: वधू मेकअप


हार्ट फेस शेप (Heart Shaped Face)


Heart Shaped Face


हार्ट शेप च्या चेहऱ्याचे कपाळ इतर शेपपेक्षा मोठं आणि लांब असतं. अशा चेहऱ्याच्या मुलींनी मेकअप करताना कपाळ, नाकाचा शेंडा आणि चिकबोन्सला नैसर्गिक शेडपेक्षा एक दोन शेड डार्क शेडने उभारी द्यायला हवी. डोळ्यांना नेहमी डार्क आयलायनर लाववं. शिवाय डोळ्यांवर फार मेकअप करू नये कारण ज्यामुळे तुमचे डोळे बारीक दिसतील.


गव्हाळ त्वचेसाठी मेकअप


जर तुमच्या त्वचेचा रंग गव्हाळ असेल तर त्याला डस्की कॉप्लेक्शन मेकअप करावा. अशा त्वचेला उजळ रंगसंगतीचा मेकअप करण्यापेक्षा तुमच्या चेहऱ्याचे  फिचर्स आणखी उठून दिसतील याची काळजी घ्या. मेकअपसाठी प्रायमर खरेदी करताना ते तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळतं जुळतं घ्या. तुम्ही चेहऱ्यावर पिवळ्या रंगाच्या फाऊंडेशनचा बेस लावू शकता. डोळ्यांवर मजेंटा,ब्लू , नियॉन  आणि ग्रीन कलरची आयशॅडो वापरू नका. कारण त्यामुळे तुमचा मेकअप आणखी डार्क दिसेल. मात्र ब्राॅंझ आणि ब्राऊन कलरच्या ब्लशरने तुमचा लुक खुलून येईल. लिपस्टिक लावतानादेखील हलक्या रंगाच्या आणि नियॉन शेडच्या लिपस्टिक लावणं टाळा.


उजळ त्वचेसाठी मेकअप


जर तुमचा चेहरा उजळ असेल तर त्यावर जास्त मेकअपचे  थर लावल्यास तुमचा लुक चांगला दिसणार नाही. यासाठी तुमच्या रंगसंगतीच्या एक शेड डार्क शेडचं फाऊंडेशन लावा. चेहऱ्यावर फार कंटुरिंग करू नका. त्याऐवजी एखाद्या हलक्या ब्रॉंझ कलरच्या ब्लशरचा वापर करा. कंसिलरदेखील तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळतं जुळतंच वापरा. जर चेहऱ्यावर फार डाग असतील तर ते लपविण्यासाठी एक शेड ब्राईट कंसिलर वापरा. कॉम्पॅक्टदेखील एक शेड डार्कच घ्या. तुमच्या चेहऱ्यावर दररोज वापरण्यासाठी न्यूड ब्राऊन  आणि स्किन कलर लिपस्टिक उठून दिसेल. जर तुम्हाला एखाद्या खास कार्यक्रमासाठी लाल रंगाची लिपस्टिक वापरायची असेल तर डोळ्यांवर ब्राऊन, लाल, मरून अथवा गोल्ड आयशॅडोजचा वापर करा. ज्यामुळे तुमचा लुक सुंदर दिसू लागेल.


नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या


मेकअपसाठी लागणारं साहित्य (Makeup Products)


मेकअप करण्याआधी तुम्हाला काही बेसिक फेस मेकअप प्रॉडक्टसची माहिती असालाच हवी. मेकअपसाठी लागणारं साहित्य तुम्हाला कोणत्याही ब्युटी सेंटरवर अथवा ऑनलाईन विकत घेता येऊ शकतं. मात्र या सर्व उत्पादनांमधून तुमच्यासाठी योग्य उत्पादन कोणतं याची तुम्हाला निवड करता यायला हवी. म्हणूनच टेलीव्हिजनवरील जाहिरात आणि सेल्समनचा आग्रह याला बळी पडू नका. बाजारात अनेक कंपन्यांचे अनेक प्रॉडक्टस उपलब्ध असतात. तुमच्या आवडत्या ब्रॅंडची निवड करा आणि तुमच्या त्वचेनुसार उत्पादन निवडा. यासाठी या काही फेस मेकअप प्रॉडक्टविषयी जरूर जाणून घ्या.


फांऊडेशन (Foundation)


Makeup Products Expiry Date- Foundation for marathi


मेकअप करताना सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे चेहऱ्यावर फाऊंडेशन लावणं. कारण फाऊंडेशन हे मेकअपचा बेस असतं. भारतीयांची त्वचा नॉर्मल, कोरडी, तेलकट, कॉम्बिनेशन, संवेदनशील  अशा प्रकारची आणि सावळ्या अथवा गव्हाळ रंगसंगतीची असते. त्यामुळे तुमच्या त्वचा प्रकारानुसार फाऊंडेशन निवडलं तरच तुमचा मेकअप चांगला दिसेल. फाऊंडेशनची निवड करताना त्याची एक स्किन टेस्ट घ्या. यासाठी मान आणि गालावर फाऊंडेशन थोडंसं लावा. फाऊंडेशन ब्रश अथवा बोटांच्या मदतीने ते तुमच्या त्वचेवर चांगलं ब्लेंड करा. पाच मिनीटांनी जर ते तुमच्या त्वचेच्या रंगाशी जुळून आलं तर त्या फाऊंडेशनची निवड करा. फाऊंडेशन योग्य रंगसंगतीचं नसेल तर तुमचा चेहरा पॅची दिसू लागेल यासाठी फाऊंडेशन निवडताना ही काळजी जरूर घ्या.


फाऊंडेशन लावताना


फाऊंडेशन लावताना ते चेहऱ्याच्या मध्यभागापासून लावण्यास सुरुवात करा. ज्यामुळे तुम्हाला अगदी नॅचरल लुक मिळेल. तसंच जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त फाऊंडेशन लावता तेव्हा ते व्यवस्थित ब्लेंड न झाल्याने एखाद्या मास्कसारखा चेहरा वाटू लागतो. असा विचित्र लुक नको असेल तर चेहऱ्याच्या मध्यभागापासून फाऊंडेशन लावण्यास सुरुवात करा आणि ते व्यवस्थित ब्लेंड करा.


कंसिलर (Concealer)


concealer 1


मेकअप करताना कंसिलरचा वापर चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या आणि चट्टे लपविण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि त्याचे डागदेखील यामुळे झाकता येतात. डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळं कंसिलर लावल्यामुळे दिसत नाहीत. कसिलरदेखील तुमच्या त्वचेच्या टोनचं निवडा ज्यामुळे तुमच्या चेहरा पॅची दिसणार नाही.


फाऊंडेशन आणि कंसिलर लावताना 


मेकअपवर वातावरणाचा लवकर परिणाम होत असतो. त्यामुळे मेकअप लगेच आक्सिडाईज होतो. जेव्हा तुमचा मेकअप हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो लगेच सुकण्यास सुरुवात होते. तुम्ही निवडलेली शेड कदाचित नंतर गडद होऊ शकते. यासाठी कोणतेही मेकअप उत्पादन खरेदी करण्यापूर्वी आधी ते लावून तर बघाच शिवाय ते लावल्यावर पाच ते दहा मिनीटे वाट बघा. जेव्हा मेकअपसाठी तुम्ही महागडी उत्पादने खरेदी करता तेव्हा या टीप्सचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.


आयलायनर(Eyeliner)


Makeup Products Expiry Date- Eyeliner for marathi


डोळ्यांच्या मेकअपमुळे तुमचे डोळे अधिक आकर्षक दिसू लागतात. जर तुम्हाला विविध प्रकारचे लुक ट्राय करायचे असतील तर आयलायनर स्टाईलने लावा. लिक्वीड अथवा ड्राय फॉर्ममध्ये आयलायनर उपलब्ध असतं. तसंच विविध रंगांमध्ये तुम्ही आयलायनर लावू शकता. काळा, निळा, हिरवा, लाल अशा विविध रंगातील आयलायनरमुळे तुमच्या चेहऱ्याचा लुकच बदलु शकतो.


लिपस्टिक (Eyeliner)


Makeup Products Expiry Date- Lipstick for marathi


लिपस्टिक हे असं एक सौंदर्यउत्पादन आहे जे प्रत्येकीच्या बॅगमध्ये असतेच. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा  लिपस्टिक लावल्यामुळे जसं तुम्ही सुंदर दिसू शकता तसंच चुकीच्या शेडमुळे तुमचा लुक बिघडूदेखील शकतो. यासाठी लिपस्टिक निवडताना विशेष काळजी घ्या. बाजारात विविध प्रकारच्या आणि विविध रंगाच्या लिपस्टिक उपलब्ध असतात. लिपस्टिक विकत घेण्यापूर्वी हातावर टेस्टरने लिपस्टिकच्या रंगाची टेस्ट जरूर करा. तुमच्या कलर टोननुसार लिपस्टिकची निवड करा. शिवाय तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे वापरत आहात त्यावर तुम्ही कोणत्या रंगाची लिपस्टिक तुम्हाला सुट करेल हे अवलंबून असते. जर तुम्ही गव्हाळ रंगाच्या असाल तर लाल,मरून, चॉकलेटी शेड तुम्हाला सूट करतात. उजळ रंगसंगतीच्या चेहऱ्यावर हलक्या गुलाबी, ऑरेंज अथवा नियॉन रंगाच्या लिपस्टिक शेड सूट करतात.


तुमच्या कन्सिलरचा तुम्ही लिप प्रायमरसारखा वापर करू शकतालिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही ओठांवर थोडंस कन्सिलर लावा. ज्यामुळे हे कन्सिलर एखाद्या लिप प्रायमरसारखं काम करेल. जर तुमचे ओठ काळसर दिसत असतील तर त्यावर एक शेड उजळ कन्सीलर लावून त्यावर लिपस्टिक लावल्याने तुम्हाला एक चांगला इफेक्ट मिळेल.


तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का


मेकअप करताना या चुका टाळा (Makeup Mistakes To Avoid)  • मेकअप करताना फाऊंडेशन चुकीचे निवडू नका. कारण फाऊंडेशन मेकअपचा बेस असतो. जर ते चुकीच्या रंगाचे असेल तर तुमचा मेकअपच बिघडू शकतो. फाऊंडेशन तुमच्या त्वचेत मिसळलं तरच तुम्हाला नैसर्गिक लुक मिळतो.

  • आयशॅडो आणि लिपस्टिक एकाच रंगाची निवडू नका. कारण त्यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो. यासाठी जर तुम्ही डार्क रंगाची लिपस्टिक निवडणार असाल तर डोळ्यांचा मेकअप लाईट शेडचा करा आणि डार्क आयशॅडो लावणार असाल तर लिपस्टिक न्यूड कलरची अथवा पिच कलरची लावा.

  • ओठांवर डायरेक्ट लिपस्टिक लावू नका. कारण त्यामुळे तुमचे ओठ फआर कोरडे दिसतात. यासाठी ओठांना आधी व्हॅसलिन लावा मग लिपलायनरने ओठांना शेप द्या आणि लिपस्टिक लावा.


मेकअप करताना मनात पडणारे प्रश्न FAQs


bridal makeup 4


सीसी क्रीम, फाऊंडेशन आणि कंसिलर यात काय फरक आहे?


या तिन्ही उत्पादनांचं काम निरनिराळं आहे. सीसी क्रीम स्किन करेक्शनसाठी वापरलं जातं. तुम्ही दररोज या क्रीमचा वापर करून नंतर हलका मेकअप करू शकता. फाऊंडेशन एखाद्या खास मेकअपसाठी बेस म्हणून लावण्यात येतं तर कंसिलरचा वापर मेकअप करताना चेहऱ्यावरील डाग, पिंपल आणि सुरकुत्या लपविण्यासाठी केला जातो.


आयलायनर किती प्रकारे लावता येतं ?


आयलायन  अनेक स्टाईल्सने लावता  येतं. कॅट आयलायनर, विंग्ज आयलायनर, ग्लिटरी आयलायनर, स्मोकी आयलायनर अशा विविध प्रकारे तुम्ही आयलायनर लावू शकता.


कोणत्या प्रसंगी कोणत्या प्रकारची  लिपस्टिक लावावी?


कोणत्या प्रसंगी कोणती लिपस्टिक लावावी हे समजणं फार गरजेचं आहे. कारण त्याचा तुमच्या लुकवर फार परिणाम होत असतो. समजा तुम्ही कॉलेजला जात असाल तर हलक्या पिंक रंगाची लिपस्टिक लावा. मात्र जर तुम्ही एखाद्या ऑफिस मिटींगसाठी जाणार असाल तर तुम्ही एखादी मॅट अथवा ग्लॉसी रंगाची लिपस्टिक लावायला हवी. एखाद्या खास प्रसंगी अथवा कार्यक्रमाला जाताना चेरी  कलरची लिपस्टिक लावा. न्यूड लिपस्टिक तुम्ही कुठेही जाण्यासाठी नक्कीच वापरू शकता.


मेकअप विषयी अधिक जाणून घेण्यासाठी POPxo चा हा व्हिडीओ जरूर पहा.

Subscribe to POPxoTV

फोटोसौजन्य -  इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका - घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही


असा करा न्यूड मेकअप - How To Do Nude Makeup (Step-by-step)