ADVERTISEMENT
home / सौंदर्य
तुमच्या Beauty Sleep साठी गरजेच्या आहेत ‘या’ 7 गोष्टी – Night Skin Care Routine In Marathi

तुमच्या Beauty Sleep साठी गरजेच्या आहेत ‘या’ 7 गोष्टी – Night Skin Care Routine In Marathi

तुम्ही रात्री किती व्यवस्थित झोप घेतली आहे यावर तुम्ही सकाळी कसे दिसता हे अवलंबून असतं. तुम्हाला जर चांगली झोप हवी असेल तर, काही चांगल्या सवयीदेखील तुम्ही स्वतःला लाऊन घ्यायला हव्यात. संपूर्ण दिवस तुम्ही घर आणि ऑफिस हे सगळं सावरून आवरून प्रचंड थकता आणि तेव्हा तुम्हाला फक्त कधी एकदा जाऊन बेडवर झोपतो असं वाटत असतं. पण झोपण्यापूर्वी तुम्हाला आपल्या आयुष्यात काही महत्त्वाच्या सवयी लाऊन घ्यायला हव्यात. यामुळे तुमचं आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी चांगल्या मिळतात. तसंत जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसं तुमच्या त्वचेवरही चांगलं नियंत्रण ठेवता येतं.

हेल्दी त्वचेसाठी नक्की फॉलो करा या टिप्स – Daily Skin Care Routine In Marathi

मेकअप काढूनच झोपा

make up

तुम्ही कितीही रात्री उशीरा कोणत्याही पार्टीवरून थकून घरी आलात तरीही झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचा मेकअप काढायलाच हवा. तुमची त्वचा रात्री स्वतःला व्यवस्थित करण्याचं काम करत असते. चेहरा आणि विशेषतः डोळ्यांच्या नाजूक त्वचेवर लावलेला मेकअप त्वचेला खराब करण्याचं काम करत असतं. मेकअपमुळे त्वचेला श्वास घ्यायलाही त्रास होतो आणि त्यामुळे त्वचेवरील चमकदारपणा कमी होतो. तसंच मेकअप न उतरवल्यास, तुम्हाला चेहऱ्यावर पोअर-क्लोगिंगची अडचण उद्भवू शकतं. यामुळे तुम्हाला पिंपल्सचाही त्रास होऊ शकतो. मेकअप काढण्यासाठी क्लिंन्झर, बेबी ऑईल अथवा कोल्ड क्रिम या तीनही वस्तूंचा तुम्ही वापर करू शकता.

POPxo Recommandation – Garnier Micellar Water Bi Phase Makeup Remover With Cotton Pad, 125ml Rs. 225

ADVERTISEMENT

त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स बद्दलही वाचा

टूथ-ब्रश करणं आहे आवश्यक

tooth brush

तुमचा चेहरा चांगला असेल आणि दात खराब असतील तर कसं चालेल? रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं हे केवळ सौंदर्यासाठीच चांगलं नाही तर तुमच्या दातांच्या मजबूतीसाठीही अत्यंत गरजेचं आहे. ही सवय तुम्ही जर लहानपणापासून नाही लावली तर तुमच्यासाठी हे अपायकारक आहे.

POPxo Recommandation – Oral-B Toothbrush Pro Health – Gum Care, Soft, 1 Pc Rs. 75

ADVERTISEMENT

चांगली झोप कशी मिळवावी याबद्दल देखील वाचा

हातापायावर मॉईस्चराईजर लावा

moisture

शरीराच्या अन्य भागासह तुमचे हात आणि पाय मऊ आणि मुलायम तसंच त्याची त्वचा निरोगी राहणं आवश्यक आहे. त्यामुळे या त्वचेला योग्य पोषण मिळायला हवं. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या हातापायांना माईस्चराईजर लावा. असं केल्यामुळे हातापायांच्या त्वचेवर योग्य मऊपणा राहतो. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार तर राहतेच. शिवाय रात्रभर हे मॉईस्चराईजर व्यवस्थित तुमच्या त्वचेवर काम करते आणि त्वचेचं सौंदर्य वाढवते.

POPxo Recommandation – Himalaya Nourishing Face Moisturizing Lotion, 100 ml Rs. 72

ADVERTISEMENT

Also Read About झोपेची उत्तम स्थिती

टोनर लावा

toner

दिवसभराच्या धावपळीत आपली त्वचा ही ऊन आणि प्रदूषणाच्या सतत संपर्कात येत असते. त्यामुळे त्वचेवर अनेक तऱ्हेचे बॅक्टेरिया जमा होतात. टोनर आपल्या त्वचेचं या सर्वांपासून संरक्षण करतं. तसंच त्वचेवरील पीएच बॅलेन्सदेखील योग्यरित्या व्यवस्थित राखण्यास टोनरची मदत होते. तुमची त्वचा तेलकट असेल अथवा तुम्हाला अॅक्ने प्रॉब्लेम असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी टोनर वापरणं हे अत्यंत आवश्यक आहे.

POPxo Recommandation – Zum Face Gentle Facial Toner – 4 fl. oz. Rs. 960

ADVERTISEMENT

डोळ्यांवर लावा आयक्रिम

 eye cream

टोनिंगनंतर डोळ्यांच्या नाजूक त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही नेहमी झोपण्यापूर्वी डोळ्यांवर आयक्रिम लावा. तुमच्या अन्य त्वचेपेक्षा डोळ्यांची त्वचा ही अतिशय नाजूक असते. डोळ्यांच्या आजूबाजूला आणि eyelid ची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा कोमल असते. त्यामुळे याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे काळजी घेण्यासाठी तुम्ही आयक्रिमचा चांगला पर्याय अवलंबू शकता. हे क्रिम तुमच्या डोळ्यांची रात्रभर काळजी घेतं.

POPxo Recommandation – Himalaya Under Eye Cream (15 ml) Rs. 156

वाचा: संवेदनशील त्वचा काळजी उत्पादने

ADVERTISEMENT

केस बांधा

hair

केस सोडून झोपल्यास, तुमचे केस कोरडे होतात आणि लवकर तुटतात. त्यामुळे झोपण्याआधी केसांना नीट बांधून घ्या. पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की, केस अगदी घट्ट बांधायला हवेत.  अगदी हलके केस बांधा आणि मगच झोपा. त्यामुळे तुमचे केस अजिबात तुटत नाहीत. त्यामुळे सैलसर केस बांधून मगच झोपा.

चांगली झोप कशी मिळवायची ते देखील वाचा

सैलसर कपडे घाला

loose cloths

ADVERTISEMENT

तुम्ही दिवसभर कितीही टाईट कपडे घातले तरी चालतील पण रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सैलसर कपडेच घालणं योग्य आहे. तुम्ही रात्री झोपताना योग्य तऱ्हेने श्वास घेता यायला हवा. त्यामुळे सैलसर कपडेच घालवेत. त्याशिवाय अंडरवेअर आणि ब्रा काढून झोपल्यास, तुम्हाला रात्री 95 टक्क्यांपेक्षा अधिक चांगली झोप लागते. तसंच तुम्ही नाईट सूट घालत असल्यास, हे कापड सूती अर्थात कॉटनचं असावं.

POPxo Recommendation – Krystle Coloured Printed Cotton Night Suit for Girls|Boys, Rs. 449

फोटो सौजन्य – shutterstock

हेदेखील वाचा – 

ADVERTISEMENT

शांत झोप येण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

How To Reduce Pimple & Pimples Marks In Marathi

ADVERTISEMENT
28 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT