या 5 पदार्थांच्या अतिसेवनामुळे सुटू शकतं तुमचं पोट

 या 5 पदार्थांच्या अतिसेवनामुळे सुटू शकतं  तुमचं पोट

हल्ली पोट सुटलं नसेल अशा फारच कमी व्यक्ती दिसतात. त्याला कारणीभूत आहे सध्याची लाईफस्टाईल. हवं त्या वेळी वाट्टेल ते खाण्याची सवय अनेकांना इतकी लागली आहे. की, कधीकधी ते तत्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन करत आहेत हे देखील विसरुन जातात. मग पोट कमी करण्यासाठी काय खाऊ आणि काय नको असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही काही असे पदार्थ खाता ज्यामुळे तुमचे पोट सुटू शकते. हे पदार्थ खाल्ले तर काय फरक पडतो असे तुम्हाला वाटत असेल तर हेच काही पदार्थ तुमचे पोट वाढवू शकतात आता हे पदार्थ कोणते ते देखील पाहुया.


बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे आहेत भरपूर फायदे


वडापाव


vadapav


वडापाव हा असा पदार्थ आहे. जो अनेकांना आवडतो. एकदा ते वडापाव खायला लागले की, एकामागोमाग एक दोन-चार वडापाव आरामात खातात. वडापावमध्ये असलेला बटाटा आणि पाव तुमचे पोट वाढवण्यासाठी जबाबदार असतो. आठवड्यातून एक वडापाव चवीपुरता खाणे आणि एकावेळी  2 ते 4 वडापाव खाणे यामध्ये खूप फरक आहे. हा पदार्थ तळलेला असतो. त्यामुळे तुम्हाला तो अधिक त्रास देऊ शकतो. बटाटावड्यातील बटाटा आणि मैदा या दोन्ही गोष्टींच्या अतिसेवनामुळे तुमचे पोट सुटते.


फ्रेंच फ्राईज


french fries


लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे फ्रेंचफ्राईज. मस्त केचअपमध्ये बुडवून खायला अनेकांना आवडतो. कितीही नाही म्हटले तरी हे खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. पण तुम्ही सतत याचे सेवन केले तर त्यामुळे आलेला स्थुलपणा लगेच दिसतो. बटाटा तुमच्या डोक्यात नाही तर अतिसेवनामुळे तुमच्या शरीरभर पसरतो.


नुडल्स


noodles


काहींना इन्स्टंट नुडल्स खायला प्रचंड आवडतात.2 मिनिटात झटपट नुडल्स रेसिपी तयार होतात म्हणून अनेक जण फावल्या वेळेत भूक लागली नसेल तरी असे पदार्थ करुन खातात. हे सगळे इन्स्टंट नुडल्स मैद्यापासून तयार झालेले असतात. मैदा शरीरात चिकटून राहतो आणि तुमचे फॅट वाढवतो. वाढलेले फॅट / चरबी तुम्हाला तुमच्या पोटाभोवती कालांतराने दिसू लागतेच.


मांड्यांवर मांड्या घासण्याचा होतो त्रास तर मग वाचाचशेवपुरी, रगडापेटीस,भेलपुरी


shevpuri


चाटच्या सगळ्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा वापरला जातो. शिवाय मैदाच्या पुऱ्या, शेव असे तळलेले पदार्थ यात घातले जातात. काही जणांना अगदी रोजच चाट खायची सवय असते. लिंबू पिळलेले, मस्त चटकमटतक चटणी घातलेले  हे चाट अनेकांना इतके आवडतात की, विचारता सोय नाही. पण यांच्या नित्यसेवनामुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढू शकते.


आठवड्यातून दोनदा चाट खाण्यास काहीच हरकत नाही. पण ते खाण्याचेही योग्य प्रमाण असावे.


बटर


butter


पावभाजीवर एक्स्ट्रा बटर मागवून खायची अनेकांना सवय असते. बटरमध्ये चळचळलेला पाव आणि पावभाजीवर आलेला बटरचा तवंग अनेक जण बोट चाखून खातात. पण हे बटर तुमच्या पोटासाठी चांगले नाही. कारण त्यामुळे तुमचे पोट सुटू शकते. बटरच्या अतिरिक्त सेवनामुळे तुमचे पोट वाढू शकते. जर तुम्हाला बटरला रिप्लेस करायला काही हवे असेल तर तुम्ही बटरऐवजी तूपाचे सेवन करु शकता. बटरमुळे तुम्हाला पोट साफ होण्यास अडथळा येऊ शकतो. पण तूपामुळे मात्र तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. अनेकांना तूपाचा वाच आवडत नाही. पण नित्य जेवणात  2 चमचे तूप असावे.


परफेक्ट फिगरसाठी करा हा परफेक्ट डाएट


(सौजन्य- Instagram)