ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
टाईट ड्रेस घातल्यानंतर तुमचेही होते असे, तुम्हाला माहीत हव्या योग्य पँटीज

टाईट ड्रेस घातल्यानंतर तुमचेही होते असे, तुम्हाला माहीत हव्या योग्य पँटीज

अनेकदा चुकीच्या पँटी घातल्यानंतर चारचौघात चालताना अनेकांना अवघड जाते. माझ्या पँटीचा आकार मागून दिसत असेल का?किंवा ती विचित्र वाटत नसेल ना असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. पण त्यांना नेमकं कशावर काय घालावं हेच कळत नाही. त्यामुळेच अनेक महिलांनी घातलेल्या कपड्यातून त्यांच्या पँटी अगदीच विचित्र दिसतात. विशेषत: ट्राऊजर आणि टाईट स्कर्ट घालणाऱ्या महिलांना जर या गोष्टी माहीत नसतील तर नक्कीच त्या वाईट दिसतात. तुम्हालाही नेमकं आत काय घालावं हे कळत नसेल तर या खास टिप्स तुमच्यासाठी आहे.

म्हणून महिलांनी नियमित वापरायला हवे पँटी लायनर

 होजिअरी पँटी (Regular Panty)

होजिअरी पँटी तुम्ही सगळ्यावेळी घालू शकता. पण टाईट कपड्यांमध्ये नाही. याचे कारण असे की, त्या तुलनेने थोड्या मोकळ्या ढाकळ्या असतात. जाड असतात त्यामुळे होत असं की, त्यांचा अगदी स्प्ष्ट आकार तुमच्या कपडयातून दिसत राहतो. त्यामुळे पंजाबी ड्रेस किंवा कुडतीच्या आत या पँटी घालायला काहीच हरकत नाही.

सीमलेस पँटी (Seamless Panty)

seamless panty

ADVERTISEMENT

जर तुम्ही टाईट फॉर्मल पँटस किंवा स्कर्ट घालत असाल तर तुमच्यासाठी सीमलेस पँटी हा चांगला पर्याय आहे. शिवाय जम सूट किंवा असे कपडे घालणार असाल तर तुम्हाला सीमलेस पँट हमखास चालू शकते. अर्थात सीमलेस असल्यामुळे त्याला कडा नसतात. त्यामुळे त्या तुमच्या टाईट कपड्यांमधून डोकावण्याचा प्रश्न सहसा येत नाही.

खरेदी करा –Lavos High Rise No Visible Panty Line Hipstrer Brief – Skin -269RS.

Zivame Low rise No visible panty line Bikini Panty- Charcoal -445 Rs.

थाँग (Thong )

thong

ADVERTISEMENT

आता हा प्रकार तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला माहीत हवा. बिकिनीपेक्षाही अधिक बारीक अशी ही पँटी असते.  मागून तुमचा भाग बऱ्यापैकी उघडा असतो. अनेक जण फॉर्मल पँटमध्ये अशा प्रकारच्या पँटी घालणे पसंद करतात. पण जर तुमची त्वचा फारच थुलथुलीत असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या पँटी न घातलेल्या बऱ्या कारण त्या जास्त खराब दिसतात.

तुमचेही इनरवेअर झालेत का एक्सपायर्ड?

बॉय शॉर्टस (Boy shorts)

boy shorts

बॉय शॉर्टस हा प्रकार तुम्हाला होजिअरी आणि लायरा अशा दोन्ही मटेरिअलमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही या बॉयशॉर्टस ए लाईन, ड्रेस किंवा स्कर्टमध्ये घालू शकता. पण जर तुम्हाला मांड्यावर मांड्या घासण्याचा त्रास असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या पँटी घालू नका. तुमच्या मांड्या अधिक घासल्या जातील.

ADVERTISEMENT

खरेदी करा- Zivame Mid Rise Boyshort Panty – Pink- 399 Rs.

Zivame Mid Rise Boyshort Panty – Red- 399 Rs.

लायरा टाईट पँटस (Lyra Pants)

tights %281%29

अनेक जण या स्लॅक्स देखील म्हणतात. मांड्यांना पूर्ण कव्हर करणारे आणि अगदी हलक्या अशा या लायरा टाईट्स असतात. कोणताही वनपीस किंवा शॉर्ट ड्रेसमध्ये तुम्ही या वापरु शकतात. लायरा हा प्रकार अनेकदा सिमलेस असल्यामुळे तुम्ही कोणताही ड्रेस घातला तर त्यातून दिसत नाही. या पँटस फारच कम्फी असतात. त्या सतत वरही येत नाही. तुमच्या त्वचेवर चिकटून राहतात. पण तुम्हाला त्या घातल्यासारख्याही वाटत नाही. यामध्ये प्रामुख्याने पांढरा, स्किन आणि काळा रंग मिळतो.

ADVERTISEMENT

म्हणून येथील त्वचा काळवंडते, जाणून घ्या कारणं

हे ही असू द्या लक्षात

  • काहींना फारच घट्ट पँटी घालण्याची सवय असते. जी अजिबात चांगली नाही. जर तुम्ही बिकिनी किंवा कोणत्याही प्रकारातील पँटी एकदम टाईट घालत असाल तर त्या तुम्हाला नक्कीच चांगल्या दिसत नाही. उलट त्यातून तुमच्या कुल्ह्यांचा आकार अधिकच घाणेरडा दिसतो.
  • अनेकांना रंगीबेरंगी पँटी घेण्याची सवय असते. यामागचे अनेकांचे कारण इतकेच असते की, त्या प्लेन पँटी सारख्या चटकन खराब होत नाही. पण जर तुम्ही पातळ कपडे घातले असतील तर त्यामधून तुमच्या रंगीबेरंगी पँटी अत्यंत वाईट दिसतात.
  • फिक्कट रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्ही लाईट कलरच्या पँटी घाला.
  • जर तुम्हाला लायरा मटेरिअलच्या पँटी चालत नसतील तर तुम्ही होजिअरीचा वापर करु शकता. जर तुम्हाला त्यात सिमलेसचा पर्याय असेल तर अन्यथा एकदा तरी लायरा मटेरिअलटच्या पँटी वापरुन पाहा त्या नक्कीच आरामदायी असतात.

(सौजन्य- Instagram,shutterstock)

29 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT