लांबसडक, काळेभोर केस कुणाला नको असतात. मात्र प्रत्येकीचे केस तसे असतीलच असे नाही. केस वाढण्यासाठी महागडी औषधं आणि पार्लरच्या चकरा मारूनही तुमचं लांब केसाचं स्वप्न पूर्ण होत नाही. केस न वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. तुमच्या जीवनशैलीमधील चुकीच्या गोष्टींमध्ये याची काही कारणं दडलेली आहेत. यासाठीच ही कारणं शोधून त्यावर योग्य उपाय करणं गरजेचं आहे.
केसांचा वाढ कमी होण्यामागे असू शकतात ही कारणे –
तुमचा आहार –
तुमचे केस न वाढण्यामागे तुमचा आहार कारणीभूत असू शकतो. तुम्ही जर संतुलित आणि पोषक आहार घेत नसाल तर त्यामुळे तुमच्या केसांची वाढ खुंटू शकतो. केस लांब आणि मजबूत हवे असतील तर आहारात पोषक गोष्टी असतील याची काळजी घ्या. अती प्रमाणात तेलकट, तिखट आणि खारट पदार्थ खाण्यामुळे तुमच्या केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. केसांची वाढ चांगली होण्यासाठी आहारात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, लोह असेल याची काळजी घ्या. अंडी, पालक, दही, बदाम अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.
हेअर स्टाईल –
केसांवर सतत हेअर स्ट्रेटनर अथवा ड्रायर वापरल्यास तुमचे केस वाढत नाहीत. कारण यामुळे तुमच्या केसांना अती प्रमाणात उष्णता मिळते. ज्यामुळे केस कोरडे होतात आणि तुटतात. जर तुम्हाला सतत हेअर स्टाईल करण्याची गरज असेल तर केसांची व्यवस्थित काळजी घ्या. केसांवर हेअर स्टाईल अप्लाय करण्यापूर्वी एखादं चांगलं सिरम केसांवर लावा.
सौंदर्य उत्पादने –
बाजारात मिळणारी सर्वच उत्पादने तुमच्या केसांसाठी योग्य असतील असे नाही. कारण केसांच्या प्रकारानुसार केसांची सौंदर्योत्पादने तयार केली जातात. यासाठीच एखादे नवे उत्पादन वापरण्यापूर्वी त्यात कोणते घटक आहेत आणि ते तुमच्या केसांसाठी योग्य आहे का हे जरूर तपासा. शिवाय कोणतेही उत्पादन अती प्रमाणात वापरू नका. कारण त्यातील केमिकल्स आणि इतर घटकांचा मारा केसांवर झाल्यामुळे तुमच्या केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
आमची शिफारस- Matrix by fbb deep smoothing combo with shampoo, conditioner and serum तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. तुम्हाला ही उत्पादने 595 रू. या सवलतीच्या दरात मिळू शकतात.
चुकीचा ब्रश अथवा कंगवा वापरणे –
केसांच्या वाढीसाठी योग्य प्रकारचा कंगवा अथवा ब्रश गरजेचा आहे. कारण चुकीच्या ब्रश अथवा कंगव्यामुळे केसांच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. तुम्ही कोणत्या प्रकारचा कंगवा वापरत आहात यावरून तुमच्या केसांची वाढ अवलंबून असतो.
आमची शिफारस- वेगाचा हा कोंबसेट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. हा कंगव्यांचा सेट तुम्हाला 499 रू. ला खरेदी करता येऊ शकतो.
केसांना ट्रीम न करणे –
जर तुमचे केस निस्तेज आणि कोरडे झाले असतील तर त्यांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा अशा केसांना कोरडेपणामुळे फाटे फुटतात. ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ कमी होते. जर तुम्हाला केस वाढावे असं वाटत असेल तर तीन महिन्यांनी केसांना ट्रीम करा. ज्यामुळे तुमचे केस नक्कीच वाढतील.
झोपण्याची चुकीची पद्धत –
झोपताना तुम्ही केसांची काय काळजी घेता हे महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने झोपल्यास केस तुटतात आणि त्यांची वाढ कमी होते. यासाठी झोपताना केस सैलसर बांधून ठेवा. अथवा केसांच्या वरच्या दिशेने सैलसर आंबाडा बांधा ज्यामुळे ते तुटणार नाहीत.
केसांना पोषण कमी मिळणे-
केसांना योग्य पोषण मिळालं नाही की ते कोरडे होतात. कोरडे केस लवकर तुटतात. जे लोक केसांना तेल लावत नाहीत त्यांचे केस कोरडे होतात आणि तुटतात. यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोनवेळा केसांना तेल लावा. ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतील.
‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक
केस धुताना करू नका या ‘7’ चुका
प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी
फोटोसौजन्य – इन्टाग्राम आणि शटरस्टॉक