केसगळती टाळण्यासाठी करा हे '10' घरगुती उपाय

केसगळती टाळण्यासाठी करा हे '10' घरगुती उपाय

Hairfall ची समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे. ही समस्या जरी कॉमन असली तरी ज्यांचे केस खरोखर गळतात, त्यांच्यासाठी हे खूपच गंभीर असतं. ज्यामुळे अनेकींना खूप टेन्शनही येतं. आता असा प्रश्न आहे की, टेन्शनमुळे केसगळती होते की केसगळतीमुळे टेन्शन. असो. केसगळती म्हणजेच हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी नॅचरल रेमेडीजसारखा चांगला उपाय नाही आणि मुख्य म्हणजे याचा काही साईडईफेक्टही नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला केसांसाठी खास नॅचरल रेमेडीज सांगणार आहोत. ज्यांचा वापर केल्यास तुमचा हेअरफॉलही थांबेल आणि केसांची वाढही चांगली होईल.


1. कांद्याचा रस


कांद्याच्या रसात भरपूर प्रमाणात सल्फर असंत जे केसांच्या टीश्यूजमधील कॉलेजनची निर्मिती वाढवतात. परिणामी, तुमचे केस लवकर वाढतात आणि नवीन केसांच्या वाढीसही मदत होते.


2. ग्रीन टी


Control hairfall4


अनेकींना हे माहीत नसेल की, ग्रीन टी फक्त वजन आटोक्यात ठेवण्यासाठीच नाहीतर केस वाढण्यासाठीही उपयुक्त आहे. ग्रीन टीमध्ये असलेल्या अँटी ऑक्सीडंट्समुळे हेअरफॉल आटोक्यात राहतो आणि हेअर ग्रोथही चांगली होते.


जर तुम्हालाही ग्रीन टी विकत घ्यायची असल्यास Tetley Green Tea, Lemon and Honey घ्या. याची किंमत फक्त 160 एवढी आहे.


3. जिऱ्याच्या बिया


जिऱ्याच्या बिया वाटून केसांना लावल्यास केसांची वाढ तर चांगली होतेच पण त्यासोबतच यातील व्हिटॅमीन्समुळे केसांचं पोषणही चांगल होतं. ज्यामुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतात.


तुमचेही केस गळतायत? ‘या’ गोष्टी खाल तर थांबेल तुमची केसगळती


4. आवळा आणि नारळाचं तेल


Control Hairfall1


नारळाच्या तेलात आवळा वाटून मिक्स करून केसांना लावणं हा खूपच चांगला उपाय आहे. या उपायाने तुमचा हेअरफॉलही तर थांबेलच पण तुमचे वेळेआधी केसही पांढरे होणार नाहीत.   


नारळाचं तेल घ्यायचं असल्यास Pure and Sure Organic Coconut Oil हे घ्या. याची किंमत फक्त 275 आहे.


5. मेंदी आणि मोहरीचं तेल


मोहरीचं तेल मेंदीच्या पानांसकट उकळून घेतल्यास केसांची वाढीसाठी ते खूपच फायदेशीर ठरतं. 250 मिली मोहरीच्या तेलात 60 ग्रॅम मेंदीची पान घालून उकळून घ्या. हे तेल थंड करून गाळून घ्या आणि स्टोर करा. हे तेल आठवड्यातून दोनदा केसांना लावून मालिश केल्यास तुमचे गळणं थांवेल. तसंच काही दिवसानंतर केसांवरील या तेलाचा जादूई परिणामही दिसेल.


मोहरीचं तेल घ्यायचं असल्यास तुम्ही Svayam Natural Mustard Hair Oil With Methidaana And Karipatta घ्या. याची किंमत फक्त 415 रुपये आहे.


6. कोथिंबीर


Control hairfall 5


चांगल्या परिणांमासाठी हिरव्यागार कोथिंबीरीचा रस काढून स्कॅल्पला लावावा. कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमीन ए आणि अनेक पोषक तत्त्वांची चांगली मात्रा असते. ज्यामुळे केसांची वाढही चांगली होते.


7. काळे चणे आणि मेथी


तुमच्या केस चांगले राहण्यासाठी तुम्ही ते उकडलेले चणे आणि मेथीच्या पेस्टने ही नियमितपण धुवू शकता. यामुळे केसांची वाढ जलद होईल आणि केस घनदाट होतील.


8. कॅस्टर ऑईल


Control hairfall3


केसांवर एखाद्या जादूप्रमाणे काम करतं कॅस्टर म्हणजेच एरंडेल तेल. या तेलाने रेग्युलर मसाज केल्यास केसांची ग्रोथ चांगली होते. तसंच केसांची चमक, मजबूती आणि थिकनेसही चांगला होतो. याशिवाय केसांच्या अन्य समस्यांवरही हे तेल खूपच गुणकारी आहे. एरंडेल तेलाने किमान 15 दिवसांतून एकदा तरी मसाज करा आणि मग परिणाम बघा.  


9. आर्निका


आर्निका कोणत्याही फॉर्ममध्ये दिवसातून दोनवेळा केसांना लावावं. आर्निकाचं क्रीम किंवा ऑइंमेंट प्रकारातही मिळतं किंवा होमिओपॅथी औषध आर्निका टिंचर तुम्ही कोमट पाण्यात मिसळून केसांना लावू शकता. यामुळे स्कॅल्पच रक्ताभिसरण चांगलं होतं आणि परिणामी केसांची वाढही चांगली होते.


तुम्ही Allens Arnica Plus Triofer - Triple Action Hair Vitalizer ही घेऊ शकता. याची किंमत आहे फक्त 208 रुपये


10. कोरफड


Control Hairfall2


रात्री झोपण्याआधी कोरफड जेल स्कॅल्पला लावा. तुम्ही रोज दोन चमचे कोरफड ज्यूसही पिऊ शकता. यामुळे केसांची ग्रोथ वाढते आणि केसांची गळतीही थांबते.