नखं वाढवायला अनेकांना आवडतं. म्हणजे नखं वाढवून त्यांना छान नेलपॉलिश लावणे अनेकांचे नित्यनेमाचे काम असते. पण इतकी मेहनत करुन वाढवलेली सुंदर नखं जेव्हा तुटतात. तेव्हा अगदी नकोसे होते. स्वत:वर रागही येत असतो आणि रडूही कोसळत असते. तुमच्यासोबतही असे कधी झाले आहे का? किंवा तुम्ही आता नखं वाढवण्याचा विचार करत आहात का? तर मग तुम्हाला तुमची नखं नक्कीच तुटलेली आवडणार नाहीत. नाही का? मग आता पाहुया काय आहेत नखं न तुटण्याचे घरगुती उपाय
लिंबू (Lemon)
लिंबामध्ये असलेले ब्लिचिंग एजंट तुमच्या नखांसाठी चांगले असतात. नख स्वच्छ करण्यासोबतच तुमची नखं टणक करण्याचे काम लिंबू करत असते. त्यामुळे आठवड्यातून तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही तुमचे हात लिंबाच्या पाण्यात बुडवून ठेवा. किंवा सहजच एखादी लिंबाची फोड तुम्ही तुमच्या नखांवर चोळा. तुम्हाला तुमची नखं टणक दिसतील.
एका भांड्यात गरम कोमट पाणी घेऊन तुम्हाला लिंबू पिळायचा आहे. त्यात तुम्हाला तुमचा हात साधारण 2 मिनिटं बुडवून ठेवायचा आहे.तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.
तुमच्याकडे असायलाच हवेत नेलपेंटचे हे 10 शेड्स
अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
तुमच्या किचनमधीलअॅपल सायडर हे देखील तुमच्या नखांसाठी चांगले आहे. अॅपल सायडर व्हिनेगरमधील आर्यन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम तुमच्या नखांना टणक बनवते. ज्यावेळी तुम्ही मेनिक्युअर करता त्यावेळी क्युटिकल मागे केले जाते. त्यावेळी तुम्हाला तुमच्या नखांना अॅपल सायडर व्हिनेगर लावा.तुम्हाला तुमची नखं टणक झालेली दिसतील.
नारळाचे तेल(Coconut Oil)
नारळाचे तेल हे देखील तुमच्या शरीरासाठी चांगले असते. हा प्रयोग तुम्ही रोज करुन पाहू शकता. कारण खोबरेल तेलामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या नखांना खोबरेल तेल लावायलाच हवे.
सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपताना तुम्ही खोबरेल तेल तुमच्या नखांना चोळा. साधारण एक मिनटभर मसाज करा आणि तुमचे काम झाले.काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या नखांमध्ये फरक जाणवेल. तुमची नख तुम्हाला पूर्वी पेक्षा अधिक टणक आणि चांगली दिसतील.
नखं वाढवण्यासाठी करा हे घरगुती उपाय
व्हिटॅमिन E (Vitamin E)
व्हिटॅमिन E तुमच्या नखांना हायड्रेड आणि मॉश्चरायझ ठेवते. व्हिटॅमिन E सहज उपलब्ध असते. बाजारात याच्या कॅप्सुल्स मिळतात. कॅप्सुल्समधील तेल काढून तुम्हाला ते तुमच्या नखांना लावायचे आहे. हे तेल तुमच्या नखांना तर टणक ठेवतेच. पण तुमच्या नखांमध्ये आवश्यक असलेला ओलावाही टिकवून ठेवते.
नखांना तेल लावून तुम्हीत थोडा मसाज करा त्यामुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि तुमची नख टणक होतील.
ग्रीन टी (Green Tea)
वजन कमी करण्यासोबतच हर्बल टीचे आहेत हे फायदे
ग्रीन टी सोक देखील तुमच्या नखांसाठी चांगले असते. ग्रीन टी मधील असलेले पोषक तत्वे तुमच्या नखांचे आरोग्य चांगले करु शकतात. आता तुम्हाला काय करायचे आहे?
एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ग्रीन टीची पाने टाका. त्यात शक्य असल्यास तुम्ही मीठ ही घालू शकता. मीठ देखील तुमच्या नखांना टणक करते.
या पाण्यात हात 10 मिनिटं हात बुडवून ठेवा. हात स्वच्छ पुसून त्याला शिआ बटर किंवा तेल लावा.
आठवड्यातून दोनदा तरी हा प्रयोग करुन पाहा.
(सौजन्य-Shutterstock)
देखील वाचा –
अॅक्रेलिक नखं काढल्यानंतर नखांची काळजी कशी घ्यावी