ADVERTISEMENT
home / Recipes
उन्हाळ्यात घरीच तयार करा हे होममेड आईस्क्रिमचे ’10’ प्रकार

उन्हाळ्यात घरीच तयार करा हे होममेड आईस्क्रिमचे ’10’ प्रकार

उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रिम न खाता राहणं जवळजवळ अशक्य  आहे. कारण बाहेर तापलेल्या वातावरणात थंडगार आईस्क्रिम नुसतं पाहिलं तरी बरं वाटू लागतं. खरंतर आईस्क्रिम हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही ऋतूत आवडीने खाल्ला जातो. लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रिम. मात्र आजकाल बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रिममध्ये अनेक अपथ्य कारक पदार्थ मिसळले जातात. शिवाय आईस्क्रिम जास्त दिवस टिकावं यासाठी त्यावर विविध प्रक्रियादेखील केल्या जातात. त्यामुळे लहान मुलांना आईस्क्रिम खायला देण्याची भिती वाटू लागते. शिवाय बाजारातील आईस्क्रिम फार दिवसांचं असल्यामुळे त्यात बर्फ तयार होतो  ज्यामुळे त्या आईस्क्रिमची चव कमी होते. यावर उपाय म्हणून आजकाल अनेक गृहिणी घरीच आईस्क्रिम तयार करतात. मात्र कधी कधी घरी केलेल्या आईस्क्रिम बाजारातील आईस्क्रिमप्रमाणे घट्ट, मऊ आणि चविष्ठ तयार होत नाही. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा काही होममेड आईसक्रीमच्या रेसिपी शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्ही घरीच बाजारात विकत मिळत असलेल्या आईस्क्रिमप्रमाणे घरीच आईस्क्रिम तयार करू शकता.

1.व्हॅनिला आईस्क्रिम

ice cream 1

साहित्य – फुल क्रीम दूध, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम, वॅनिला इसेन्स

मिक्सरच्या भांड्यात फुल क्रीम दूध आणि मिल्क पावडर मिक्स करा. एका भांड्यात फ्रेश क्रीम घेऊन ती बिटरच्या मदतीने बीट करा. त्यात हळूहळू मिक्स केलेलं दूध मिसळा. मिश्रणात व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब टाका आणि सात ते आठ तासांसाठी मिश्रण फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.

ADVERTISEMENT

तयार व्हॅनिला आईस्क्रिमचा एक स्कूप आईसक्रीम बाऊलमध्ये टाका वरून चॉकलेट सिरप टाकून थंडगार आईस्क्रिम  सर्व्ह करा.

2.स्टॉबेरी आईस्क्रिम

ice cream 4

साहित्य – स्टॉबेरी, फुल क्रीम दूध, साखर अथवा कंडेन्स मिल्क अथवा दूधाची पावडर , वेलची पावडर

स्टॉबेरी आईस्क्रिम तयार करण्यासाठी स्टॉबेरी स्वच्छ धुवून त्या कोरड्या करून ठेवा. स्टॉबेरीचे बारीक तुकडे करा. एका गॅसवर फुल क्रीम दूध अगदी घट्ट होईपर्यंत आटवून घ्या. दूधाचे प्रमाण आटून अर्धे झाल्यावर त्यात साखर अथवा कंडेन्स मिल्क आणि वेलची पावडर टाकून थोडं उकळून घ्या. भांडे गॅसवरून खाली उतरवून ठेवा. दूध थंड झाल्यावर ते आईसक्रीमच्या भांड्यात ठेवून फ्रीजरमध्ये सात ते आठ तास ठेवा. सात ते आठ तासांनी आईसक्रीम बाहेर काढून पुन्हा ब्लेंडर च्या मदतीने पुन्हा एकदा मिश्रण मिक्स् करा. स्टॉबेरीचे तुकडे आणि स्टॉबेरी पल्प त्यात टाकून चांगले एकत्र करा. हे मिश्रण पुन्हा आईस्क्रिमच्या भांड्यात ठेवून फ्रीजरमध्ये चार तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवा . थंडगार स्टॉबेरी आईस्क्रिम खाण्यासाठी तयार रहा.

ADVERTISEMENT

3. चॉकलेट आईस्क्रिम

ice cream 1

साहित्य – फुल क्रीम दूध , कस्टर्ड पावडर, कोको पावडर, कंडेन्स मिल्क, साखर, वॅनिला इसेन्स, चेरी आणि सुकामेवा

चॉकलेट आईस्क्रिम तयार करण्यासाठी  भांड्यात दूध घ्या आणि त्यात दोन चमचे कोको पावडर, कस्टर्ड पावडर आणि  साखर मिसळा. हे मिश्रण मंद आचेवर गरम करा आणि पुन्हा सामान्य तापमानावर थंड करा. थंड झालेल्या मिश्रणात कंडेन्स मिल्क आणि वॅनिला इसेंस टाका. ब्लेंडरच्या मदतीने मिश्रण एकत्र करून सात ते आठ तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. वरून सुकामेवा आणि चेरीने सजवून थंडगार आईसक्रीम सर्व्ह करा.

4. सिझनल मॅंगो आईस्क्रिम

ice cream 3

ADVERTISEMENT

साहित्य – आंबा, फ्रेश क्रिम, साखर, कंडेन्स मिल्क आणि वॅनिला इसेन्स

आंब्याचं आईस्क्रिम तयार करण्यासाठी सर्वात आधी आंब्याची साले काढून त्याचा ताजा पल्प काढून ठेवा. आंब्याचा सिझन नसेल तर तुम्ही साठवून ठेवलेला मॅंगो पल्प वापरू शकता. एका भांड्यात वेलची पावडर , वॅनिला इसेन्स, कंडेन्स मिल्क आणि फ्रेश क्रीम घ्या  आणि ब्लेंडरच्या मदतीने हे मिश्रण चांगलं एकजीव करा. आईस्क्रिमच्या भांड्यात काढून ते फ्रीजरमध्ये सात ते आठ सेट करा. तुम्ही ताज्या आंब्याच्या फोडी आणि सुकामेवा याच्या मदतीने हे आईस्क्रिम सर्व्ह करू शकता.

5. सदाबहार पान आईस्क्रिम

ice cream 5

फ्रेश क्रीम, फुल क्रीम दूध, मिल्क पावडर, पान, गुलकंद

ADVERTISEMENT

एका मिक्सरच्या भांड्यात दूध आणि मिल्क पावडर एकत्र करून घ्या. एका भांड्यात फ्रेश क्रीम घेऊन त्यात हळूहळू मिक्सरमधील दूध मिसळत बीटरने बीट करत रहा. मिश्रण एकजीव झाल्यावर ते आईस्क्रिमच्या भांड्यात काढून सात ते आठ तासांसाठी सेट करा. सेट झाल्यावर त्यामध्ये चार ते पाच विड्याची पाने आणि गुलकंद यांचे मिक्सरमध्ये वाटलेलं मिश्रण मिक्स करा. आईसक्रीमचा बेस आणि पानाचे मिश्रण एकजीव करून पुन्हा चार ते पाच तास सेट करा. थंडगार पान बहार आईसक्रीम तुमच्यासाठी तयार आहे. या आईस्क्रिमला सर्व्ह करताना वरून चेरी, रंगीत बडीसोप आणि गुलकंद टाकण्यास विसरू नका.

7.पेरू – मिरची आईस्क्रिम

ice cream 6

एका मिक्सरच्या भांड्यात दूध आणि मिल्क पावडर एकत्र करून घ्या. एका भांड्यात फ्रेश क्रीम घेऊन त्यात हळूहळू मिक्सरमधील दूध मिसळत बीटरने बीट करत रहा. मिश्रण एकजीव झाल्यावर ते आईस्क्रिमच्या भांड्यात काढून सात ते आठ तासांसाठी सेट करा. सेट झाल्यावर त्यात पिकलेल्या पेरूचा बिया काढून तयार केलेला पल्प मिसळा. पुन्हा एकदा व्यवस्थित बीट करून हे मिश्रण आईस्क्रिमच्या भांड्यात फ्रीजरमध्ये चार ते पाच तास सेट करा. थंडगार पेरू आईस्क्रिमवर तिखट, मीठ  आणि चाट मसाला पेरून आईसक्रीमचा आनंद घ्या.

8. ओरीओ आईस्क्रिम

एका भांड्याच फ्रेश क्रिम घ्या त्यात कंडेन्स मिल्क मिसळून चांगलं एकजीव करा. ओरिओ बिस्किटचे तुकडे त्यात टाका वरून चॉकलेट सिरप मिसळा. चमच्याच्या मदतीने मिश्रण एकत्र करा आणि सात ते आठ तास फ्रिजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. तुमचं ओरिओ आईस्क्रिम खाण्यासाठी तयार आहे. हे आईस्क्रिम लहान मुलांना फार आवडतं. शिवाय ते पटकन तयार होतं. हे आईस्क्रिम तयार करण्यासाठी POPxo चा व्हिडीओ जरूर पहा.

ADVERTISEMENT

9. मटका कुल्फी

ice cream

साहित्य- दूध, मिल्क पावडर, साखर , मावा, मावा इसेन्स

एक लिटर दूध आटवून त्याचे अर्धा लीटर दूध करा. मंद गॅसवर ठेवून त्यात साखर मिल्क पावडर आणि कॉर्न पावडर मिक्स करा. गॅस बंद करा थंड झाल्यावर त्यात मावा इसेन्स  आणि ताजा मावा टाकून सेट करा. कुल्फी सेट करण्यासाठी कमीत कमी चोविस तास लागतात. त्यामुळे ज्या दिवशी कुल्फी खायची असेल त्याच्या आधी एक दिवस कुल्फी करण्याचा बेत आखा. कुल्फी तुम्ही कुल्फीसाठी मिळणाऱ्या कुल्फी मोल्ड अथवा छोट्या छोट्या मातीच्या मटक्यांमध्ये सेट करू शकता. कुल्फी सेट करताना मडकं वरून अॅल्युमिनीयम फॉईलने बंद करा. थंडगार कुल्फीवर किसलेल्या बदाम- पिस्ताचे काप टाकून सर्व्ह करा.

10. फालूदा

ice cream 7

ADVERTISEMENT

फालूदा आणि आईस्क्रिम हे एक अतुट नातं आहे. शिवाय घरात तयार होममेड आईसक्रीम असेल तर फालुद्याचा बेत व्हायलाच पाहिजे. होममेड आईस्क्रिमचा आनंद घ्यायचा असेल तर फालुद्याची ही रेसिपी जरूर ट्राय करा.

साहित्य – सब्जा, शेवया, दूध, साखर, रोज सिरप, सुकामेवा, गुलाबपाकळ्या आणि होममेड स्ट्रॉबेरी आईस्क्रिम

सब्जाच्या बिया अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. गाळून भिजलेल्या बियांमधील पाणी बाहेर काढा. दूधात साखर मिसळून ते गॅसवर गरम करत ठेवा. दूध थंड झाल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी गरम करून उकळ आल्यावर त्यात शेवया टाका. पाच ते दहा मिनीटे शेवया शिजू द्या. शिजलेल्या शेवया  एका चाळणीत गाळून थंड पाण्याने धूवन काढा. ज्यामुळे त्या एकमेंकांना चिकटणार नाहीत. सर्व्ह करताना एका ग्लासात दोन चमचे भिजवलेला सब्जा टाका. त्यावर फालुदा शेवया टाका. त्यावर एक चमचा रोज सिरप टाका. एक कप थंडगार दूध वरून टाका. दूध आणि ग्लासातील मिश्रणावर थंडगार होममेड स्ट्रॉबेरी आईस्क्रिम टाकून गुलाबपाकळ्या  आणि सुकामेव्याने सजवून सर्व्ह करा.

FAQs

मस्तानी कशी तयार करावी ?

ice cream 9

ADVERTISEMENT

पुणे शहरातील एक लोकप्रिय थंडगार पदार्थ म्हणजे मस्तानी. मात्र जर तुमच्या घरी होममेड आईसक्रीम असेल तर तुम्ही घरीच मस्तानी तयार करू शकता. सध्या आंब्यांचा सिझन सुरू आहे तर आपण मॅंगो मस्तानी कशी करतात हे पाहू या.

साहित्य – पिकलेल्या आंब्याचा पल्प, मॅंगो आईस्क्रिम, थंड दूध, साखर, सुकामेव्याचे काप, टूटीफ्रुटी, चेरी, आंब्याच्या फोडी

एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा पल्प, दूध आणि साखर चांगली एक जीव करून घ्या. या  मिश्रणात दोन स्कुप आईसक्रीम टाका आणि पुन्हा मिक्स करा. एका ग्लासात हे मिश्रण टाका त्यावर मॅंगो  आईसक्रीमचा एक स्कूप आणि सुकामेवा, टूटीफ्रुटी, चेरी, आंब्याच्या फोडी टाकून सर्व्ह करा.

आम्ही तुम्हाला निरनिराळ्या प्रकारे होममेड आईस्क्रिम कसं तयार करायचं याच्या काही रेसिपीज शेअर केल्या आहेत. तुम्ही तुमच्या कौशल्याने यात आणि निरनिराळे प्रकार तयार करू शकता. सिझनल फळांचा पल्प टाकून, आलं-मिरची, गुलाबजाम, पुरणपोळी, पाणीपुरी असं विविध प्रकारचं आईस्क्रिम तुम्ही घरीच तयार करू शकता. उन्हाळ्यात घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आईस्क्रिम फ्रिजमध्ये तयारच ठेवा. होममेड आईस्क्रिम आठ ते दहा दिवस फ्रिजमध्ये टिकू शकतं. कोणतंही आईस्क्रिम तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही आईस्क्रिम बनवताना कंडेन्स मिल्कचा वापर कराल तेव्हा त्या आईस्क्रिममध्ये साखर कमी प्रमाणात वापरा. कारण कंडेन्स मिल्कमध्ये साखर असते. तुम्ही जर या दोन्ही गोष्टींचा वापर केला तर आईसक्रीम फार गोड होऊ शकतं. मुलांसाठी होममेड  आईस्क्रिम हे एक बेस्ट पर्याय ठरतं. कारण यामुळे त्यांची आवड जपता येते शिवाय त्यांना विकतच्या आईस्क्रिमपासून दूर ठेवता येतं. तेव्हा या आईस्क्रिम रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा

दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

होममेड थंडाई’ कशी तयार कराल

तुमच्यासाठी कच्च्या कैरीच्या स्वादिष्ट रेसिपीज

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

 

 

07 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT