ADVERTISEMENT
home / Family
पत्र प्रिय अहो आईंना…..

पत्र प्रिय अहो आईंना…..

आजपर्यंत तुम्ही सासू- सुनेच्या नात्याबद्दल अनेक लेख वाचले असतील कारण प्रत्येक सासू-सुनेचं नातं हे काहीसं आंबटगोड असतं. प्रत्येकीचा आपल्या सासूबद्दलच्या भावना आणि अनुभव हे वेगवेगळे असतात. पण सगळ्यांनाच सासूबद्दल एक तक्रार मात्र सेम असते. ते म्हणजे सासूकडून त्यांना कधी आईसारखं प्रेम मिळत नाही किंवा सासू त्यांना आपल्या मुलीची जागा देऊ शकत नाही. पण मुलगा असो वा मुलगी असो कोणतीही आई आपल्या मुलाची जागा दुसऱ्या व्यक्तीला लगेच देऊ शकत नाही. कारण आपलं मुलं हे प्रत्येक आईसाठी खास असतं. त्यामुळे प्रत्येक सासू आपल्या सुनेला मुलगी समजू शकत नाही पण कधी कधी तिच्या वागण्यातून तिचं सुनेबद्दलचं प्रेम व्यक्त होतंच. बरेचदा सासू आपल्या सुनेचं कौतुक तिच्या तोंडावर करत नाही. पण तिच्यामागे मात्र अनेकदा सासू सूनेचं कौतुक करत असते. कधी कधी सासू तिच्या अगदी मनाप्रमाणे वागते तर कधी सून सासूच्या मनाप्रमाणे वागते. पण हे प्रत्येकवेळी हे शक्य नसतं. त्यामुळेच कधीतरी छोटे मोठे खटके उडतात.

एक मात्र खरं की अनेकदा आपण आपल्या ‘प्रिय अहो आई’ म्हणजेच सासूबाईंना बऱ्याच गोष्टींसाठी क्रेडीट द्यायचं विसरून जातो. अशाच एका सूनेने आपल्या सासूबाईंना न मिळणाऱ्या क्रेडीटबद्दल लिहीलेलं हे पत्र.

mother-in-law-1

प्रिय अहो आई,

ADVERTISEMENT

लग्न होण्याआधी मला वाटलं नव्हतं की, मी माझ्या सासूबाईंना ‘आई’ असं म्हणेन. पण आईऐवजी तुम्हाला दुसऱ्या कोणत्या नावाने हाक मारणंही मला पटलंच नाही. आज पत्राद्वारे मला तुम्हाला अनेक गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं आहे. पण सर्वात आधी थँक्यू…. मला तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. हा वेळ जो माझ्या नव्या आयुष्यात मला अॅडजेस्ट करण्यासाठी तुम्ही दिलात. अगदी लहानपणापासून लग्न होईपर्यंत एका घरात वाढल्यावर अचानक लग्नानंतर नव्या माणसांसोबत नव्या घरात अॅडजेस्ट करताना फारच कठीण जातं. अनेक गोष्टी पटत नाहीत, आवडत नाहीत. पण तुम्ही नेहमी मला समजून घेतलंत (अजूनही समजून घेत आहात). तुम्ही प्रत्येकवेळी मला दिलेली साथ ही खूपच मौल्यवान आहे. ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.    

‘मदर्स डे’ला प्रत्येकजण आपल्या आईबद्दल कविता करतो. आईला शुभेच्छा देऊन प्रेम व्यक्त करतो. पण या वर्षी मला तुम्हाला अनेक गोष्टींसाठी धन्यवाद करायचं आहे. तसंच तुमच्या मुलाला एक चांगला आणि समजूतदार व्यक्ती म्हणून वाढवल्याबद्दल खूप खूप थँक्यू. माझा जोडीदार हा खूपच चांगला पती आणि मित्र आहे. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या पुरूषाने कसं असावं याचं तो उत्तम उदाहरण आहे आणि याचं सगळं क्रेडीट तुम्हाला जातं.

थँक्यू आई….तुमच्या मुलाला तुम्ही बेसिक स्वयंपाक आणि घरातील इतर काम शिकवल्याबद्दल. जो माझ्या पाळीच्या दिवसात मला समजून घेतो आणि या विषयावर माझ्याशी खुलेपणाने बोलतोही. थँक्यू अशा मुलाला वाढवल्याबद्दल जो समजतो की, घर हे फक्त एका व्यक्तीने नाहीतर दोघांनीही समान भार उचलून चालवायचं असतं. मग ते बाहेरचं काम असो वा घरचं काम असो. तो मला प्रत्येकवेळी आपणहून मदत करतो. थँक्यू त्याला टीपिकल मुलांप्रमाणे न वाढवल्याबद्दल.  

थँक्यू आई त्याला स्त्रियांचा मान कसा राखावा हे शिकवल्याबद्दल, त्यांना समजून घेण्याबद्दल आणि त्यांच्याशी कसं बोलावं हे शिकवल्याबद्दल. आपल्या जोडीदाराला फक्त एखाद्या दिवशी फुलं आणि चॉकलेट्स देऊन खूष करायचं नसतं तर प्रत्येक दिवशी समान वागणूक द्यायची असते हे त्याच्या मनावर बिंबवल्याबद्दल थँक्यू आई.

ADVERTISEMENT

थँक्यू आई मला नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल. मी ऑफिसहून थकून आल्यावर माझ्याकडून काम करण्याची अपेक्षा न करता मलाही तुमच्या मुलांसमान वागवल्याबद्दल. कारण तुम्ही मला समजून घेतलं नसतं आणि सहकार्य केलं नसतं तर मला आज माझ्या करिअरमध्ये इतकी उंची गाठता आलीच नसती.

थँक्यू आई, मला लोकांकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आणि त्यांच्या चुकांना बाजूला सारून त्यांच्या प्रेम करण्याची शिकवण दिल्याबद्दल.  

मला तुम्ही खूप आवडता…

मला सासूबाई खूप आवडतात जेव्हा त्या स्वतःच ताट पाहून माझं ताट घेतलं की नाही याबद्दल विचारतात.

जेव्हा मला बरं नसतं तेव्हा त्या आराम करण्याची सक्ती करतात.

ADVERTISEMENT

जेव्हा माझ्या सासूबाई स्वतःहून मला बाहेर जाताना हवे ते कपडे घालण्याची परवानगी देतात.   

एखाद्या पार्टीमध्ये जेव्हा आपल्या सूनेच्या सुंदरतेवर सासूलाही गर्व वाटतो आणि तेव्हा मैत्रिणींनी त्यांच्या सूनांच्या तक्रारी केल्यावर तुमची सासू मात्र तुमचं गुणगान करते.

सून आणि मुलाचं प्रेम बघून जेव्हा सासूला आनंद होतो तेव्हा ती सासूबाई खूपच आवडू लागतात.

महत्त्वाचं म्हणजे थँक्यू सो मच आई मला तुमच्या आयुष्याचा भाग आणि एक पाऊल मागे घेऊन आपलं हे सहजीवन शक्य केल्याबद्दल. मला माहित्येय माझ्याप्रमाणेच तुमच्यासाठी हे सोपं नव्हतं. पण तुम्ही ते इतक्या सहजतेने आणि प्रेमाने केलंत. माझीही ईच्छा आहे की, मलाही मुलगा व्हावा आणि मीही तुमच्याप्रमाणेच त्याला वाढवावं. मलाही तुमच्याप्रमाणे त्याला प्रत्येक गोष्ट शिकवता यावी आणि त्याला एक चांगला व्यक्ती म्हणून घडवता यावं.

ADVERTISEMENT

खूप प्रेम,

तुमची सून.

एकच गोड सल्ला आहे की, भलेही एकमेंकीवर प्रेम करू नका पण आपल्या जोडीदाराची आई (सासूबाई) आणि आपल्या मुलाची जोडीदार (सून) म्हणून एकमेंकीचा आदर नक्की ठेवा. कारण घरात चांगलं आणि प्रेमळ वातावरण राहण्यासाठी सासूसुनेमध्ये आदर आणि सन्मान असणं खूप महत्त्वाचं आहे. काहीही असो…मदर्स डे ला सेलिब्रेशन नक्की करा. 

फोटो सौजन्य – Instagram

ADVERTISEMENT

हेही वाचा 

आई, आज तू हवी होतीस

आई तुला Thanks म्हणायचं राहूनच जातं…

म्हणून यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट

ADVERTISEMENT
10 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT