*virgin असाल तर तुम्हाला या गोष्टी जाणून घेण्याची आहे गरज

*virgin असाल तर तुम्हाला या गोष्टी  जाणून घेण्याची आहे गरज

सेक्सची जितकी उत्सुकता असते त्याच्यापेक्षा काकणभर जास्त भिती अनेकांना असते.  पहिलं किस, पहिलं सेक्स कसं असायला हवं याबद्दल अनेकांच्या फँटसी असतात. कसं करायचं, काय करायचं याचे सल्ले, टीप्स तुम्हाला कोणीतरी दिले असतील.तुम्हीही अजून काही केलं नसेल. येत्या काळात करणार असाल. म्हणजे जर तुम्ही सध्याच्या घडीला Virgin असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत करुन घ्यायला हव्यात. म्हणजे तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष सेक्स कराल त्यावेळी तुम्हाला असे का झाले? असा प्रश्न पडणार नाही. हे मुद्दे आम्ही तुम्ही शेअर केलेल्या अनुभवावरुन काढले आहेत.


5 जणांना पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर नेमंक काय वाटलं?


 कोण म्हणत पहिलं सेक्स स्पेशल असायला हवं


virgin sex 5


हा हा  माहीत आहे आम्हाला तुमच्या पहिल्या सेक्सच्या फँटसी… पण त्या फँटसीमध्ये अनेकजण इतका वेळ घालवतात की, ज्यावेळी सेक्स करायचं असतं त्यावेळी ते न करता फँटसीत राहात बसतात. जर तुम्ही Virgin असाल तर मनाशी एक पक्क करा की, तुम्हाला सेक्सचा आनंद घ्यायचा आहे.  स्पेशल फिल समोरच्याला देण्यापेक्षा त्याचा आनंद लुटण्यात मजा आहे. त्यामुळे पहिलं सेक्स स्पेशलपेक्षाही तुम्ही दोघांनी एन्जॉय केला असं असावं.


...आणि माझा पोपट झाला


लग्नानंतर सेक्स करण्याची माझी फँटसी अफाट होती. माझ्या होणाऱ्या बायकोलाही मी तसे बोलून दाखवले होते. हनिमूनसाठी आम्ही एकदम मस्त जागा निवडली होती. असेच हॉटेल निवडले होते. जिथे मला गरजेच्या वस्तू मिळू शकतील. पॉर्नमध्ये वेगवेगळे कपडे घालून जसं पार्टनरला रिझवलं जातं. मला अगदी तसचं करायचं होतं. म्हणूनच मी हंटर,हतकडी,स्टिक असं सगळं सामान ऑनलाईन मागवून घेतलं. बायकोसाठी एक सेक्सी नाईटी देखील घेतली. हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा इतके थकलो होतो की, काही करण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमचं करायचं ठरलं. मी सगळ्या वस्तू बँगमध्ये काढू लागलो. त्यावर माझ्या बायकोला चपापलेला चेहरा पाहून मीच गोंधळून गेलो. तिच्या चेहऱ्यावर ते सगळं पाहून वेगळीच भिती मला दिसली. आता ती काहीच मिनिटात रडेल असे मला वाटले .मी तिला समजावू लागलो. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.ती रात्र तशीच वाया गेली. मला इतकं वाईट वाटलं. पण दुसऱ्या दिवशी ते सगळ मी बॅगमध्ये परत भरुन ठेवलं. कसलीच अपेक्षा नसताना अचानक ती माझ्या जवळ आली आणि त्यानंतर आम्ही जे सेक्स एन्जॉय केलं ते माझ्या फँटसीपेक्षा खूपच चांगल होतं.


सेक्सनंतर रडावसं वाटण अगदीच कॉमन आहे


virgin sex 3


सेक्सनंतर अचानक तुम्हाला रडू कोसळू शकतं. हो हे खरं आहे तुम्हाला जितका आनंद सेक्सनंतर होतो तितकेच तुम्हाला रडावेसेही वाटू शकते. त्यामुळे तुमच्यासोबत असे काही झाले तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुमच्यातील हार्मोनच्या बदलामुळे तुम्हाला असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करु नका. मस्त आराम करा आणि सेक्सच्या त्या चांगल्या आठणीत स्वत:ला झोकून द्या.


...आणि ती अचानक रडू लागली


मी लिव्ह- इन- रिलेशनशीपमध्ये पहिल्यांदाच राहत आहे. या रिलेशनशीप आधी मी कधीही सेक्स केले नव्हते. शिवाय माझ्या पार्टनरनेही कधीच सेक्स केले नव्हते. आम्ही ज्यावेळी सेक्स करायचे ठरवले. म्हणज दोघांच्या परस्पर संमतीने बर का! आमचे विचार अगदीच एकसारखे होते. त्यामुळे आमच्या सेक्स फँटसीही देखील थोड्याफार फरकाने सारख्याच होत्या. आम्ही आमचं पहिलं सेक्स एन्जॉय केलं आम्ही Virginity लूझ केली. पण सेक्स करुन तासभर होत नाही तोच माझी पार्टनर झोपेत अचानक रडू लागली. काय झाले आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता. ती ढसाढसा माझ्यासमोर रडत होती ती का रडत होती हे तिला सुद्धा कळत नव्हते मग काय पहिल्या सेक्सचा रंग माझ्यासमोर अगदी  फिक्का पडला.


 पॉर्न म्हणजे रिअॅलिटी नाही


virgin sex 4


पहिल्यांदा कंडोम वापरुन सेक्स केले तेव्हा वाटले असे 


खूप जणांना सेक्स फँटसीबद्दल विचाराल तर  त्यांना पॉर्नसारखे सेक्स करावेसे वाटते. पण जर तुम्ही पहिल्यांदा सेक्स करणार असाल तर  पॉर्नमध्ये जगू नका. त्या आणि खऱ्या सेक्समध्ये बराच फरक असतो. त्यामुळे रिअॅलिटीमध्ये जगा. प्रत्यक्ष सेक्स करताना पॉर्न समोर सुरु ठेवण्याची चुकी कधीच करु नका. कारण त्यामुळे मूड खराब होण्याची शक्यता जास्त असते.


पॉर्न पाहून त्याने माझा मूड घालवला


मी आणि माझा बॉयफ्रेंड नेहमीच पॉर्न पाहतो.  पण ते पॉर्न पाहून सेक्स करणे मला कधी नकोसे होईल असे कधीच वाटले नव्हते. झाले असे की, मी आणि माझा बॉयफ्रेंड आमच्या आवडत्या पॉर्नस्टारचे व्हिडिओ पाहत होतो. अचानक त्यावेळी अशी काय परिस्थिती उद्भवली की, आम्हाला त्या क्षणी आमची व्हर्जिनिटी लुझ करुया असे वाटले. म्हणून आम्ही फोर प्ले आणि ओरल सेक्सला सुरुवात केली. माझ्या बॉयफ्रेंडनेमध्येच एकदम सेक्सीनचा व्हिडिओ प्ले केला आणि तो माझ्याकडे आला. मला अचानक काय झाले माहीत नाही मला त्यात दाखवलेलं सगळं फेक वाटू लागलं आणि खूप दुखू लागलं. माझं अर्ध लक्ष त्या चित्रविचित्र आवाजाकडे जाऊ लागलं..एकदम किळस वाटू लागली आणि मी माझ्या बॉयफ्रेंडला लांब ढकलून दिलं. त्यावर तो ही इतका फिस्कटला की पुन्हा आम्ही सेक्स पॉर्न लावून करण्याचा प्रयत्न केला नाही.


Virginty loose करण्यासाठी ही आहे का योग्य व्यक्ती


virgin sex 1


One night stand  असं कोणी कितीही म्हणत असलं तरी जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही. त्यासोबत तुम्ही कधीच सेक्स करत नाही. तुमची virginity कोणासोबतही सेक्स करण्यात घालवू नका. तुमच्यावर प्रेम करणारी तुमची काळजी घेणारी व्यक्तीच तुमच्या सेक्ससाठी योग्य असते.


त्या दिवसापासून सोडला नाद


माझ्यासाठी सेक्स म्हणजे शरीराचा आनंद असंच कायम वाटत आलं आहे. त्यामुळे मी त्याकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे नको त्या मार्गाला जाऊन हिरो बनण्याचा प्रयत्नदेखील मी केला. पण ज्यावेळी मला सगळं अगदी उघडउघड मिळतं होतं. पण कोणत्याही इमोशनशिवाय त्यावेळी मात्र मला ते नकोसं वाटलं.  समोरची व्यक्ती माझ्यावर प्रेम करत नाही तर ती केवळ माझ्यावर उपकार करते आहे असे जाणवले, त्यानंतर मी कधीच असा प्रयत्न केला नाही. जिच्यावर प्रेम केले तिच्यासोबतच मी सेक्स केले आणि त्याचा आज मला आनंद आहे .


कधीही करु नका  घाई… घ्या forplay चा आनंद


virgin sex 2


घाईत केलेली काम कधीच चांगली होत नाही. सेक्सच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. तुम्ही घाई करु शकत नाही. तुम्हाला तुमच्या पार्टनरला जास्त वेळ यामध्ये ठेवायचं असेल तर  forplay हा एकच चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे. त्यामुळे जितका वेळ तुम्हाला त्यामध्ये काढता येत असेल तितके चांगले. जर तुम्ही 30 मिनिटांहून अधिक काळ forplay करत असाल तर  तुम्हाला सेक्स दरम्यान जास्त त्रास होत नाही. तुमची व्हजायना ओली होते. त्यामुळे सेक्स दरम्यान लागणारे lubricant तुम्हाला नैसर्गिकपद्धतीने मिळते.


सेक्स करताना पुरुष पाहतात का स्तनांचा आकार


Forplay जणू स्वर्गच


मला सेक्सपेक्षाही जास्त फोरप्लेमध्ये इंटरेस्ट होता.फार आधीपण मला पॉर्न पाहून सेक्स नाही पण फोरप्ले करायची इच्छा व्हायची. त्यामुळे मी पहिल्यांदा सेक्स करताना घाई न करता फोर प्लेला वेळ दिला. त्यामध्ये एक वेगळीच मजा जाणवली. तुम्ही किस करताना एकमेकांना चावता.. शरीराला एक वेगळा स्पर्श करता. जरी तुम्ही एकमेकांना नख लावली तरी त्यात एक वेगळाच रोमान्स जाणवतो.असा रोमान्स की जो संपूच नये असे वाटते.


*आता प्रत्येकाचा virginity loose करण्याचा अनुभव वेगळा असू शकतो आणि विचारही वेगळे असू शकतात. पण पहिल्या सेक्सचा आणि virginity loose करण्याचा आनंद तुम्ही सेलिब्रेट करायला हवा. प्रत्येक गोष्टीत तुमची फँटसी पूर्ण करण्याचा हट्ट करण्यापेक्षा तो क्षण तो आनंद तुमच्या  पार्टनरसोबत अनुभवा त्यातच शहाणपण आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याची भीती वाटणे सोडून द्या. 


(फोटो सौजन्य- Shuttersrtock,GIPHY)