ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Waxing केल्यावर टाळा ‘या’ 7 गोष्टी!! – Post Waxing Care in Marathi

Waxing केल्यावर टाळा ‘या’ 7 गोष्टी!! – Post Waxing Care in Marathi

आपला आवडता स्लिव्हलेस टॉप अथवा शॉर्ट स्कर्ट अथवा वनपिस घालण्यासाठी तुम्हाला नक्की काय लागतं? असा प्रश्न विचारल्यावर प्रत्येक महिलेचं पहिलं उत्तर येईल ते म्हणजे वॅक्सिंग (Waxing). आपले हात पाय आणि चेहरा साफ आणि सुंदर दिसावा हे प्रत्येकालाच वाटत असतं. पण हातापायावर आपल्याला नको असले तरीही येणारे केस हे सर्व करण्यापासून तुम्हाला थांबवत आहेत का? त्यावर नक्कीच वॅक्सिंग हा चांगला उपाय आहे. पण वॅक्सिंग चांगलं राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळायला हव्यात हे तुम्हाला माहीत आहे? आपल्या संवेदनशील त्वचेवर गरम वॅक्सिंग आणि वॅक्सिंग स्ट्रीप्सने बराच परिणाम होत असतो. बऱ्याचदा वॅक्सिंग केल्यानंतर अशा काही गोष्टी नकळत केल्या जातात ज्यामुळे तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो. पण या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपणच आपल्याला नकळत त्रास देत असतो. केवळ वॅक्सिंग करून किती दिवस अथवा वेळ झालाय हेच लक्षात ठेवायची गरज नाही तर, वॅक्सिंग केल्यानंतर अजून अशा 7 गोष्टी टाळण्याची गरज आहे, त्या आपण जाणून घेऊया –

वॅक्सिंग केल्यावर अशी घ्या त्वचेची काळजी – Post Waxing Care in Marathi

मॉईस्चराईजर (Moisturizer) चा रोज वापर करा

moisure

वॅक्सिंग केल्यानंतर रोज मॉईस्चराईजर आपल्या त्वचेवर लावा जेणेकरून तुमच्या त्वचेवर रॅशेस अथवा पिंपल्स येणार नाहीत. तसंच कोरफडीच्या पानांचा जास्तीत जास्त वापर करता येईल याचा प्रयत्न करा.

जास्त व्यायाम करू नका (Do not Exercise)

वॅक्सिंग केल्यानंतर 1-2 दिवस कोणताही व्यायाम करू नका. कारण वॅक्सिंग केल्यानंतर तुमच्या हातापायांचे पोअर्स उघडे राहतात आणि त्यामुळे व्यायाम केल्यास, या पोअर्समधून घामाद्वारे घाण जाण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याचाही धोका उद्भवतो.

ADVERTISEMENT

शॉवरचा वापर करा (Use Shower)

shower

आंघोळीसाठी काही दिवस शॉवर वापरा आणि चांगले शॉवर जेल आणि कोमट पाण्याने अंघोळ करा. वॅक्सिंग केल्यावर शरीरावर जास्त पाणी घालत राहिल्यास, त्वचेवर त्याचा चांगला परिणाम येत नाही आणि वॅक्सिंगचा परिणाम जास्त दिवस राहात नाही.

गरम पाणी घेणं टाळा (Avoid Hot Water)

दिवसभरात जेव्हा कधी हात पाय धुवाल तेव्हा थंड पाण्याचाच वापर करा. गरम पाणी वापरू नका. अन्यथा वॅक्स करण्यात आलेल्या त्वचेवर रॅश येतात अथवा याठिकाणी पिंपल्स येण्याचा धोका वाढतो.

उन्हात हात पाय झाकून घ्या

save from sun

ADVERTISEMENT

वॅक्सिंग केल्यानंतर हात आणि पाय काही दिवस झाकून ठेवा. उन्हाच्या त्रासदायक किरणांमुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्स येतात आणि शिवाय वॅक्सिंग केलेली त्वचा काळी पडण्याचाही धोका असतो.

बॉडी स्क्रब वापरू नका (Say no to Body Scrub)

वॅक्सिंग केल्यानंतर एकदम लगेच बॉडी स्क्रबचा वापर करू नका. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते. स्क्रबऐवजी तुम्ही बेबी सोप अर्थात लहान मुलांचा आंघोळीचा साबण वापरा. पुढचे किमान 3-4 दिवस तरी हाच साबण वापरा.

घट्ट कपडे घालू नका (Not to Wear Tight Clothes)

tight cloths

वॅक्सिंग केल्यानंतर घट्ट कपडे घालणं टाळा. घट्ट कपडे घातल्यामुळे तुमच्या त्वचेवर लालसरपणा येतो आणि शिवाय अंगाला खाजही येते.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य –  Shutterstock

हेदेखील वाचा – 

घरी वॅक्सिंग करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

बिकिनी वॅक्ससंदर्भात A To Z माहिती जी प्रत्येक महिलेला माहीत हवी

ADVERTISEMENT

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या

04 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT