ADVERTISEMENT
home / Diet
जुळ्या बाळांना जन्म देताय, मग ही माहिती जरूर वाचा  (Thing you should know about twin pregnancy)

जुळ्या बाळांना जन्म देताय, मग ही माहिती जरूर वाचा (Thing you should know about twin pregnancy)

आई होणं हा एक सुखद अनुभव असतो. मात्र गरोदरपण ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्यात जर तुम्ही जुळ्यांना जन्म देणार असाल तर तुमची जबाबदारी दुपटीने वाढते. तुमच्या पोटात दोन जीव निर्माण होत आहेत ही भावनाच तुम्हाला ही जबाबदारी पेलवण्याची खरी ताकद देते. जर तुम्ही जुळ्यांना जन्म देणार असाल तर सहाजिकच इतर गरोदर महिलांपेक्षा तुम्हाला आता गरोदरपण आणि आई झाल्यावरही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. काही संशोधनानुसार तिशी ते चाळीसीमध्ये आई होण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलांमध्ये जुळी गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. ऑस्ट्रेलियातील एका संशोधनानुसार शंभरपैकी तीन महिलांना जुळी अथवा तिळी गर्भधारणा होण्याची शक्यता असते. कधी कधी आय.यु.आय अथवा आय.व्हि.एफ अशा गर्भधारणेसाठी केल्या जाणाऱ्या उपचारांमुळेदेखील जुळी आणि तिळी गर्भधारणा होऊ शकते. पण एकापेक्षा अधिक गर्भधारणा असलेल्या महिलांना प्रसूती दरम्यान काही आरोग्यसमस्या होण्याचा धोकादेखील असतो शकतो. यासाठी जुळी गर्भधारणा झाली असेल तर काही गोष्टींच्या बाबत तुम्हाला आधीच माहित असणं फार गरजेचं आहे.

Twin pregnancy 4

जुळी गर्भधारणा कशी होते –

जुळी गर्भधारणा दोन प्रकारे होऊ शकते

1. आयडेंटीकल अथवा Monozygotic Twins – या प्रकारातील जुळी मुले हुबेहुब एकसारखी दिसतात. त्यांच्यामध्ये अगदी नगण्य फरक जाणवतो. कारण या प्रकारामध्ये एक स्त्रीबीज एक शूक्राणू यांचे मिलन होते. मात्र या प्रोसेसमध्ये दोन गर्भांची निर्मिती होते आणि गर्भाशयात जुळी गर्भधारणा होते. अशा जुळ्यांच्या जेनेटीक कम्पोझिशन्स समान असतात. त्यामुळे अशी मुलं एकसारखी दिसतात. त्यांच्या सवयीदेखील बऱ्याचदा एकसारख्या असतात.

2. फ्रॅटर्नल अथवा Dizygotic Twins – या प्रकारामध्ये दोन स्त्रीबीज आणि दोन शूक्राणू फर्टीलाईज होतात. या मिलनातून दोन गर्भ निर्माण होतात. हे दोन्ही गर्भ एकाच वेळी अथवा थोड्याफार फरकाच्या कालावधीने गर्भाशयात रुजतात. यातून जुळी गर्भधारणा होते. अशा जुळ्यांच्या जेनेटीक कम्पोझिशन्स एकमेकांपासून भिन्न असतात. त्यामुळे ते एकमेकांसारखे दिसत नाहीत.

ADVERTISEMENT

जुळी गर्भधारणा होण्यामागची कारणे –

Twin pregnancy 1

आईचे वय-

महिलांचे जसे जसे वय वाढत जाते तस तशी त्यांची आई होण्याची क्षमता कमी होत जाते. अगदी त्याचप्रमाणे उशीरा आई होण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलांमध्ये जुळं अथवा तिळं होण्याची शक्यतादेखील अधिक असते. वय वाढल्यामुळे महिलांच्या हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होतात. या बदलांमुळे कधी कधी अधिक प्रमाणात स्त्रीबीज निर्माण होतात. यामुळे अशा महिलांना जुळं अथवा तिळं होऊ शकतं. करिअरमुळे उशीरा आईपण स्विकारणाऱ्या महिलांना बऱ्याचदा जुळी मुलं होऊ शकतात.

आय.व्हि.एफ. उपचार-

ज्यांना अनेक वर्ष मुलं होत नाहीत अशा कपलला डॉक्टर आय.व्हि.एफ उपचार घेण्याचा सल्ला देतात. या उपचारांमध्ये स्त्रीच्या शरीराबाहेर स्त्रीबीज आणि शूक्रांणूचे मिलन घडवून ते फर्टीलाईज केले जाते. या टेकनिकच्या माध्यमातून निर्माण झालेला गर्भ पुन्हा त्या महिलेच्या गर्भाशयात सोडण्यात येतो. गर्भ गर्भाशयात रुजण्यास यश मिळाले तर ती महिला गरोदर राहू शकते. मात्र अशा प्रकारे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी प्रमाणात  असल्यामुळे, या पद्धतीने गर्भधारणा यशस्वी करण्यासाठी बऱ्याचदा डॉक्टर त्या महिलेच्या गर्भाशयात दोन अथवा तीन गर्भ सोडतात. त्यामुळे या उपचारांमुळे दोन अथवा तिन मुलांना जन्म देण्याची शक्यता अधिक वाढते.

गरोदरपणातही दिसा अधिक स्टायलिश

ADVERTISEMENT

अनुवंशिकता –

जर तुमच्या कुटुंबात पूर्वी जुळ्या मुलांचा जन्म झालेला असेल तर तुम्हाला जुळं होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे जर तुम्ही जुळ्या मुलांपैकी एक असाल तर तुम्हाला देखील जुळी मुलं होऊ शकतात.  त्यामुळे या प्रकारची हिस्ट्री असलेल्या लोकांना जुळी मुलं होऊ शकतात.

अती गर्भनिरोधकं घेणे-

ज्या महिला गर्भधारणा टाळण्यासाठी अती प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांना जुळी मुलं  होऊ शकतात. कारण गोळ्या बंद केल्यावर अशा महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्समध्ये बदल होतात. या बदलांच्या परिणामांमुळे तुम्हाला जुळी गर्भधारणा होऊ शकते.

जुळी गर्भधारणा झाली असल्यास काय काळजी घ्यावी

Twin pregnancy 1 %281%29

जुळ्या मुलांना जन्म देणं सोपं नसलं तरी कठीण मुळीच नाही. त्यामुळे जर तुम्हाला सोनोग्राफी टेस्ट केल्यावर जुळी मुलं होणार आहेत हे समजलं तर मुळीच चिंता करू नका. सुरूवातीपासुन व्यवस्थित काळजी घेतली तर तुमची प्रसूती अगदी नैसर्गिक आणि सुलभ होऊ शकते.यासाठी या गोष्टी जरूर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

नियमित चेकअप करा-

वास्तविक प्रत्येक गरोदर महिलेने तिच्या प्रेगन्सीमध्ये नियमित हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्हाला जुळी गर्भधारणा झाली असेल तर दर महिन्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळांची वाढ आणि विकास कसा होत आहे याची माहिती मिळेल. बाळाचे पोषण हे आईच्या माध्यमातून होत असते.

योग्य आहार घ्या-

pregnancy foods

गरोदरपणात तुम्हाला संतुलित आणि पोषक आहार घेण्याची गरज असते. नियमित चेकअप केल्यामुळे तुमच्या शरीराला कोणत्या प्रकारच्या आहाराची विशेष गरज आहे हे समजू शकते. त्यानुसार तुम्ही तुमच्या आहार आणि विहारामध्ये बदल करू शकता. ज्या मातेला जुळी गर्भधारणा होते तिला प्रोटिन्स, कॅल्शिअम, फॉलिक अॅसिड अशी पोषणमुल्ये अधिक प्रमाणात घेण्याची गरज असते. आता तुमच्या पोटामध्ये दोन जीवांचे पोषण होत आहे हे लक्षात ठेवून पोषक आहार घेण्यास सुरूवात करा. गरोदरपणात मैद्याचे पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पॅक फूड, अती तळलेले आणि मीठाचे पदार्थ मुळीच खाऊ नका. अयोग्य आणि कमी प्रमाणात आहार घेतल्यास अशा महिलांना गरोदरपणात अशक्तपणा अथवा अॅनिमियाचा त्रास होऊ शकतो.

पुरेसा आराम करा-

जर तुम्ही तरूणपणी जुळ्या मुलांना जन्म देत असाल तर इतर गरोदर महिलांप्रमाणे तुमची दैनंदिन कामे तुम्ही नक्कीच करू शकता. मात्र जर तुम्ही आई होण्याचा निर्णय उशीरा घेतला असेल आणि पस्तिशी अथवा चाळीशीनंतर तुम्हाला जुळी गर्भधारणा झाली असेल तर डॉक्टर तुम्हाला दुसऱ्या तिमाहीनंतर बेड रेस्ट अथवा बाहेर न फिरण्याचा सल्ला देऊ शकतात.

ADVERTISEMENT

प्रसूतीकाळावर लक्ष ठेवा –

साधारणपणे बाळाची वाढ पूर्ण झाल्यावर 39 आठवड्यांनी प्रसूतीकाळ येतो. वाढ पूर्ण झाल्यावर बाळ नैसर्गिक पद्धतीने बाहेर येते. काही अडचणी असल्यास सी-सेक्शनची मदत घ्यावी लागते. मात्र जुळ्या मुलांचा जन्म या कालावधी आधीच होण्याची शक्यता अधिक असते. कारण जितके गर्भ अधिक तितका हा काळ कमी होत जातो. जुळी मुलं बऱ्याचदा 37 आठवड्यानंतर कधीही जन्माला येऊ शकतात. खरंतर बाळाची वाढ 34 आठवड्यांनी पूर्ण होते. मात्र त्यानंतरही त्यांच्या फुफ्फुस आणि ह्रदयाचा आणि विकास होणे गरजेचे असते. आजकाल प्रिमॅच्युअर मुलांच्या पुढील विकासासाठी औषधे आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज नाही.

सी-सेक्शनसाठी तयार रहा –

आधीच सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तरूणपणी जुळ्या मुलांना जन्म देत असाल तर तुमची नैसर्गिक प्रसूती होऊ शकते. मात्र उशीरा गरोदर राहणाऱ्या जुळी गर्भधारणा झालेल्या महिलांना सी-सेक्शनला सामोरं जाण्याची शक्यता अधिक असते. प्रसूती दरम्यान बाळांची स्थिती कशी आहे यावर सारं काही अवलंबून आहे. जर प्रसूतीकाळ जवळ आल्यावर तुमच्या बाळांचे डोकं खालच्या दिशेने असेल तर तुमची प्रसूती नैसर्गिक पद्धतीने होऊ शकते. मात्र जर पोटात बाळाच्या अंगाभोवती अथवा गळ्याभोवती जन्मनाळ अडकली असेल अथवा बाळाची हालचाल प्रसूतीसाठी योग्य दिशेने न झाल्यास तुम्हाला सी-सेक्शनचा निर्णय घ्यावा लागतो. काही वेळा एक बाळ नैसर्गिक प्रसूतीने आणि एक बाळ सी-सेक्शनच्या मदतीने जन्माला आल्याचीही अनेक उदाहरणे  आहेत. आजकाल जुळी गर्भधारणा असलेल्या पालकांना डॉक्टर बाळांची वाढ पूर्ण झाल्यावर आणि कोणता धोका नाही याची खात्री केल्यावर सी-सेक्शनचा सल्ला देतात.

रक्तदाब वाढणार नाही याची काळजी घ्या-

गरोदरपण आणि प्रसूतीकाळातील धोका वाढू नये यासाठी तुमचा रक्तदाब अती प्रमाणात कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्या. यासाठी गरोदरपणात चिंता, काळजी , कामाचा अती ताण या गोष्टींपासून दूर रहा. मेडीटेशन आणि प्रार्थना यामुळे तुमचे मन प्रसन्न आणि शरीर स्वस्थ राहण्यास मदत होईल. यासाठी गर्भसंस्कारांचे कोर्सेसदेखील फायदेशीर ठरतील.

जुळ्यांबाबत असलेले प्रश्न FAQs

जुळी गर्भधारणा झाली आहे हे कसे समजते ?

गरोदरपणानंतर केल्या जाणाऱ्या इतर चाचण्या आणि अल्ट्रासाऊंट सोनोग्राफीमुळे जुळी गर्भधारणा झाली आहे हे समजू शकते. डॉक्टरकडे चेकअप केल्यावरच तुम्हाला जुळी गर्भधारणा होणार आहे हे कन्फर्म करता येतं.

ADVERTISEMENT

जुळी मुलं नेहमी सारखीच दिसतात का ?

सर्वच मुलं सारखी दिसतात असं नाही. जी मुलं आयडेंटीकल अथवा Monozygotic twins या प्रकारच्या ग्भधारणेमुळे झालेली असतात ती एकसमान दिसू शकतात. कारण यामध्ये एकच स्त्रीबीज आणि एकच शूक्राणूच्या मिलनातून दोन गर्भाची निर्मिती झालेली असते. यांच्यातील जेनेटीक कम्पोझिशन्स समान असल्यामुळे ही मुलं सारखी वाटतात. मात्र फ्रॅटर्नल अथवा Dizygotic twins या प्रकारे झालेल्या गर्भधारणेतून झालेली जुळी मुलं एकसारखी दिसत नाहीत. त्यांचा जन्म जरी एकाच वेळी झालेला असला तरी ते दोन वेगळ्या स्त्रीबीज आणि दोन वेगवेगळ्या शूक्राणूंच्या मिलनातून निर्माण झालेले असतात. त्यांच्यामधील जेनेटीक कम्पोझिशन्स वेगवेगळे असतात. ज्यामुळे ती एकसारखी दिसत नाहीत.

चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एक बाळ रडू लागल्यावर दुसरं बाळ देखील रडतं का ?

चित्रपटात नाटकीय वातावरण निर्माण करण्यासाठी असं दाखवलं जातं. मात्र जुळ्या मुलांमध्ये असं आढळत नाही. जुळी मुलं लहान असताना संगतीमुळे एका मागोमाग रडू शकतात.  मात्र मोठी झाल्यावर त्यांच्यामध्ये अशी समानता दिसेलच असं नाही.

जुळी मुलांना त्यांचे आईवडील कसे ओळखतात ?

जरी दोन जुळी मुलं एकसारखी दिसणारी असली तरी त्यांच्यामध्ये काहीना काहीतरी नैसर्गिक फरक हा असतोच. जुळ्या मुलांच्या आई-वडीलांना हा बदल त्यांच्या जन्मापासून माहीत असतो. इतर लोकांना  तो लक्षात येईलच असे नाही. शिवाय जुळ्या मुलांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्याची बुबुळ्ळं वेगळी असतात. ज्यामुळे त्यांच्यात एक नैसर्गिक फरक निर्माण होतो. जन्मदात्यांना हा फरक आपोआप समजतो. इतरांना तो निरिक्षण केल्यास जाणवू शकतो. 

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

ADVERTISEMENT

डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना या ‘25’ गोष्टी तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये अवश्य ठेवा

गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या (Post Pregnancy Care Tips In Marathi)

सी-सेक्शन प्रसूतीनंतर पूर्ववत होण्यासाठी उपाय

Pregnency Week By Week In Marathi

ADVERTISEMENT

How To Deal With Morning Sickness During Pregnancy In Marathi

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

17 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT