डाएट न करताही कमी करता येऊ शकते वजन, वाचा टीप्स

डाएट न करताही कमी करता येऊ शकते वजन, वाचा टीप्स

वजन कमी करण्यासाठी अनेक जण फार प्रयत्न करतात. पण त्यांना त्यांचे वजन आटोक्यात आणता येत नाही. तुम्हाला माहीत आहे का कोणतेही कठीण डाएट न करता तुम्हाला अगदी महिन्याभरात वजन कमी करता येऊ शकते. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत ती तुमच्या डाएटची पूर्वतयारी आहे असे म्हणायला हवे. कारण या गोष्टी अगदी साध्या आहेत. त्या तुम्ही अगदी सहज फॉलो करु शकता. अगदी महिन्याभरात तुम्हाला तुमच्यातील झालेला हा बदल नक्कीच हवाहवासा वाटेल. 


वजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी


 फायबर (Fiber):


fiber


फायबर कशात असते असा तुम्हाला प्रश्न पडणे साहजिक आहे. सगळ्याच फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही अशी फळे खायला हवीत. केळी, संत्री, सफरचंद, आंबा यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला काही खायचे असेल तर तुम्ही फळे खाऊ शकता. दिवसातून एकदा तरी फळं खा. तुम्हाला एनर्जी तर मिळेल. शिवाय फळातील पाण्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील. शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिनदेखील तुम्हाला या फळातून मिळतात. त्यामुळे दिवसातून एकदा तरी फळ खा.


*रात्री आहारात फळं खाणे कटाक्षाने टाळा. कारण ती लवकर पचत नाही. 


वजन कमी करण्यासाठी करा घरच्या घरी हे डिटॉक्स ड्रिंक्स


प्रोटीन (Proetin): 


proetin


आहारात जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश करणे आवश्यक असते. प्रोटीनमुळे तुमच्या शरीराला आवश्यक असलेली उर्जा तर मिळतेच. शिवाय तुम्हाला शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करायला मदत करते. प्रोटिनयुक्त खा असे म्हटल्यावर अनेकांना कळत नाही. ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रोटीन असते ते पदार्थ म्हणजे दूध, अंडी, चिकन ब्रेस्ट,मासे,ओट्स,चीझ,डाळी, ड्रायफ्रुट्स (बदाम) यामध्ये प्रोटीन जास्त असते. यांच्या नित्यसेवनामुळे तुमचे पोट अधिक काळ भरलेले राहील तुम्हाला इतर काहीही अरबट चरबट खाण्याची इच्छा होणार नाही. ज्यावेळी तुम्हाला काहीतरी नकोसे खायची इच्छा होईल त्यावेळी तुम्ही प्रोटीनचा आहारात समावेश करा.


पाण्याचे सेवन (Drink water):


अनेकदा काहीही खाण्याची सवय तुम्हाला लागलेली असते. ही सवय तुम्हाला मोडायची असेल तर तुम्ही पाण्याचे सतत सेवन करायला हवे. पाणी प्यायल्यामुळे तुमचे पोट भरते. त्यामुळे तुम्हाला नको ते खाण्याची फार इच्छा होत नाही. साधारण तासाभरातनंतर एक ग्लास तरी पाणी पिण्याची सवय लावून घ्या.


वजन कमी करण्यापासून ते ... पर्यंत आहेत गरम पाणी पिण्याचे फायदे


साखर टाळा(Avoid sugar):


तुमचे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत असणारा महत्वाचा घटक म्हणजे साखर... तुम्हाला शक्य असेल तितकी आहारातून साखर बाजूला करायची आहे. तुम्हाला गोड खायची इच्छा असेल तर तुम्ही गूळ खाऊ शकता. गूळ तुम्हाला ताकद देईलच. शिवाय तुमच्या गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण करेल. त्यामुळे आहारात गूळ असू द्या.


 रोज अर्धा तास चाला (Walk daily):


walking


रोज चालण्याची सवय तुमचे वजन कमी करण्यास मदत करु शकत. तुम्ही डाएट जरी करत नसाल तरी तुम्हाला थोडा व्यायाम करणे आवश्यक असते. तुम्हाला जीमला जाऊन वर्कआऊट करणे जमत नसेल तर तुम्ही रोज किमान 30 मिनिटे चालायला हवे. शक्य असेल तर तुम्ही सायकलिंग, स्ट्रेचिंग असे घरच्या घरी काही व्यायाम करा त्यामुळे तुम्हाला हलके वाटेल.


(सौजन्य-shutterstock)


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


वजन कमी करण्यासाठी योग