प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 10 Bra Rules!

प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 10 Bra Rules!

प्रत्येक मुलीसाठी ब्रा (Bra) हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा आपण ब्रा निवडतो तेव्हा ब्रा ची कशी काळजी घ्यायची इथपासून ते ब्रा कशी वापरायची नाही पर्यंत सगळ्या प्रकारच्या गोष्टी बऱ्याच जणींकडून आपल्याला ऐकायला मिळत असतात. वास्तविक जेव्हा आपण ब्रा विकत घेतो तेव्हा त्याबरोबर आलेल्या मिनी गाईड (mini  guide) मध्ये या गोष्टी सांगितलेल्या असतात. असं असलं तरीही बऱ्याच मुली आणि महिला ब्रा निवडण्यात नेहमी गोंधळून जातात. पण असे काही नियम आहेत जे तुम्ही ब्रा च्या बाबतीत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यानुसार तुम्ही तुमची ब्रा व्यवस्थित निवडू शकता आणि योग्य प्रकारे हाताळू शकता आणि घालू शकता.

1. परफेक्ट फिट असल्याचं कसं जाणून घ्यायचं

Shutterstock

तुम्हाला तुमच्या ब्रा चा आकार निवडण्यास गोंधळ होत असेल अथवा तुम्हाला नक्की कळत नसेल की, तुमच्यासाठी ब्रा चा परफेक्ट आकार नक्की कोणता आहे? तर अजिबात गोंधळून जाऊ नका. यावर सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील मेजरमेंट टेप घ्या अथवा दुकानात असल्यास, तुम्ही स्टाफची मदत घ्या. तुमच्या Boobs चा आकार 32 असेल आणि या आकाराची ब्रा घेतल्यानंतरही तुम्हाला श्वास घ्यायला अडचण येत असेल तर नीट आपल्या छातीचं माप मोजून घ्या आणि त्यानंतर ब्रा निवडताना 32A, 32B,32C या आकाराची ब्रा निवडून ट्रायल रूममध्ये जाऊन तपासून घ्या. यामधील कोणत्या आकाराची ब्रा तुम्हाला योग्य फिट होत हे जाणून घ्या.

ब्रा घालण्याचे फायदे देखील वाचा

2. यामुळे होऊ शकतो Discomfort

ब्रा सह तुमच्या Discomfort चं कारण तुमच्या ब्रा च्या कपाचा आकार जास्त अथवा राऊंड वेस्ट कमी असणं हे असू शकतं. त्यामुळे तुमच्या मनानुसार तुम्ही जेव्हा ब्रा चा आकार निवडता तेव्हा तो तुम्हाला हवा तसा फिट मिळतोच असं नाही. या आकारांमध्ये तुम्हाला A/B/C मधील तफावत जाणून घ्यायला हवी. असे ब्रा तुम्हाला तुमचा कम्फर्ट मिळवून देतात. फक्त तुम्हाला ट्राय करून योग्य आकार निवडायचा आहे.

3. स्तन आणि आरोग्यासाठी योग्य

Shutterstock

रात्री ब्रा घालून झोपू नये. तुमच्या आरोग्य आणि स्तनांसाठी रात्री ब्रा न घालता झोपणं जास्त चांगलं आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींनी हा नियम नक्कीच पाळायला हवे. यामुळे तुमच्या त्वचेवर ब्रा स्ट्रेप्स रूतून बसत नाहीत आणि तुमची त्वचा व्यवस्थित श्वास घेऊ शकते.

4. योग्य फिट आणि योग्य आकार

तुम्ही ज्या ब्रा मध्ये कम्फर्टेबल आहात आणि तुम्हाला योग्य लुक देत असतील तर ब्रा ट्राय करताना तुम्ही हवं तर ती ब्रा तुमच्याबरोबर न्या किंवा तुमच्याबरोबर अशा व्यक्तीला न्या ज्याला तुम्ही ब्रा घालून त्याचं योग्य फिटिंग आणि आकार दाखवू शकता. कारण कधीकधी असं होऊ शकतं की, एखाद्या ब्रा चा लुक चांगला असेल पण फील नाही आणि एखाद्या ब्रा चा फील चांगला असेल पण फिटिंग नाही. तसंच तुम्ही ब्रा न घालता झोपू शकत नसल्यास, non wired अथवा non padded ब्रा चा पर्याय निवडू शकता.

5. वेळ काढून जाणं

Shutterstock

Lingerie शॉपिंग करताना नेहमी खास वेळ काढून जा. तुम्ही ब्रा ची खरेदी करत असताना डोकं तुमचं शांत असून डोक्यात इतर विचार असू नयेत. ब्रा ट्राय करत असताना हाताच्या वेगवेगळ्या मुव्हमेंट तुम्ही ट्राय करून पाहा. असं करून पाहताना जर तुमची ब्रा शिफ्ट होत असेल अथवा तुम्हाला कम्फर्टेबली हालचाल करता येत नसेल. तर तुम्ही योग्य आकाराची ब्रा घेतली नाहीत हे समजा.

6. वर्षातून केवळ दोन वेळा

तुम्ही तुमचं वजन वाढवलं असेल अथवा कमी केलं असेल तरी तुम्ही वर्षातून केवळ दोन वेळा आपल्या ब्रा ची साईज नक्की तपासून घ्या. कारण वजन वाढल्यानंतर अथवा कमी झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये बदल होतात, जे तुमच्या स्तनांच्या आकारावरही परिणाम करत असतात. त्यामुळे कोणत्याही तऱ्हेच्या back slips आणि side-boob spills पासून वाचण्यासाठी ब्रा चा आकार नक्की तपासून घ्या.

7. Delicate ब्रा च्या long life करिता

Shutterstock

तुम्हाला तुमच्या Delicate ब्रा ला जर long life द्यायचं असेल तर तुम्हाला नेहमच्या ब्रा पेक्षा वेगळी आणि रॅपिंग बॅगमध्ये ब्रा ठेवावी लागते. ज्यामुळे त्याची डेलिकटे एम्ब्रॉयडरी फॅब्रिक खराब होणार नाही. तसंच तुम्ही या ब्रा व्यवस्थित रॅप करून आणि फोल्डिंगशिवाय ठेवा नका. कारण असं केल्यास या ब्रा खराब होतात. तसंच सैलही होतात. स्वेटर्स आणि शर्टप्रमाणे ब्रा हँगरवर लटकवू नका. Gravity effect मुळे इलास्टिक सैल होण्याची शक्यता असते.

8. पूर्ण दुनियेला दाखवू नका ( जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही)

ब्रा खरेदी करताना याचा आकार आणि फिनिशिंग योग्य आहे की नाही हे नीट पाहून घ्या. जर एखाद्या ब्रा चं टोक जास्त असेल तर त्याचा शेप तुम्ही घातलेल्या टॉपमधून बाहेर दिसेल आणि तुम्हाला जे लोक बघतात त्यांना तुमच्या ब्रा चा शेप लगेल कळेल. त्यामुळे ब्रा जेव्हा तुम्ही ट्राय करत असाल तेव्हा त्यावर तुम्ही तुमचा टॉपदेखील घालून बघा. म्हणजे कोणत्या ड्रेसमध्ये कोणती ब्रा योग्य आहे हेदेखील तुम्हाला कळेल.

9. हातानेच धुवा

Shutterstock

ब्रा ची काळजी घेण्यासाठी ती धुण्याची पद्धत योग्य असायला हवी आणि त्यासाठी तुम्ही केवळ हातांचाच उपयोग करता. वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही ब्रा धुऊ नका. जर धुवायचीच असेल तर त्यासाठी तुम्ही lingerie बॅगचा वापर करा. तसंच वॉशिंग मशीन डेलिकेट मोडवर आहे की नाही हे बघून घ्या. ब्रा धुण्यासाठी gentle detergent चा वापर करा. ड्रायरमध्ये सुकवू नका. तसंच अगदी उन्हाखाली सुकवू नका. सावलीमध्येच तुम्ही ब्रा सुकवा, जिथे व्यवस्थित हवा येत असेल.

10. ब्रा ला म्हणा Bye

तुमची ब्रा महाग असेल आणि त्याचं खास कलेक्शन तुमच्याकडे असेल तर कदाचित याचा वापर आपण जास्तवेळपर्यंत करत असतो. पण जेव्हा तुमच्या ब्रा चं इलास्टिक सैल होतं तेव्हा ती ब्रा आपल्या वॉर्डरोबमध्ये न ठेवणंच योग्य. तसचं साधारणतः सहा महिन्यानंतर तुम्ही तुमची ब्रा बदलत राहायला हवं.