तुमचा 'सेक्स मूड' तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!

तुमचा 'सेक्स मूड' तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!

लग्न असो वा लिव्ह इन रिलेशनशिप...कोणत्याही नात्यामध्ये नेहमीच हनीमून फेज राहात नाही. कधी कधी कंटाळवाणी फेजदेखील प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. तुम्हाला जेव्हा तुमचं नातं खूपच कंटाळवाणं वाटायला लागेल तेव्हाच तुम्हाला तुमचं नातं जपण्याची वेळ आली आहे हे जाणून घ्यायला हवं. तुमच्या जोडीदाराकडे आता खास लक्ष देण्याची वेळ आली आहे हे समजून जावं. यासाठी तुम्हाला नक्कीच खूप जास्त अथवा काही वेगळं करण्याची गरज नाही. काही लहान सहान गोष्टी करूनही तुम्ही तुमच्या जोडीदाराचा ‘सेक्स मूड’ नक्कीच ऑन करू शकता. यासाठी काही वेगळ्या पण सोप्या स्टाईल्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा नक्कीच मूड ऑन होईल आणि तुम्ही पुन्हा एकदा तुमची हनीमून फेज अनुभवू शकता. 

1. म्युझिक आता नाही तर मग कधी !!!

GIPHY

म्युझिक शब्द ऐकल्यावरच चेहऱ्यावर एक छानसं हसू येतं ना ओठांवर. हेच तर हवंय. खरंतर आपल्या आयुष्यात संगीताला खूपच महत्त्व आहे. म्युझिक अर्थात संगीत आपल्या मूडवर खूपच चांगला परिणाम करत असतं. त्यामुळे तुम्हाला जेव्हा असा मूड तयार करायचा असेल तेव्हा तुम्ही म्युझिकची मदत घ्या. तुमच्या जोडीदाराबरोबर असताना काहीतरी मस्त रोमँटिक अथवा सेक्सी गाणी लावा आणि मग बघा नक्की काय परिणाम होतोय. 

उदाहरणार्थ - तुमच्या जोडीदाराचा मूड नसल्यास, त्याच्या आवडती रोमँटिक गाणी लावावीत अथवा एखादं असं सेक्सी गाणं जे तुम्हाला दोघांनाही आवडतं आणि अगदी सुरुवातीच्या काळात या गाण्यावर तुमचा रोमान्स सुरू झाला होता. 

2. काही नियम तोडणं आवश्यक आहे

GIPHY

नेहमीचं तेच तेच रूटीन करून जसा कंटाळा येतो त्याचप्रमाणे सेक्सचंदेखील आहे. नेहमी त्याच त्याच पोझिशन्स करून कंटाळा येत असतो. त्यामुळे तेच तेच नियम तोडणं गरेजचं आहे. काही वर्षांनंतर तुम्ही मूड फ्रेश करण्यासाठी काही फ्रेश आणि वेगळ्या स्टेप्स करायला हव्यात. 

उदाहरणार्थ - नेहमी तुमच्या जोडीदारानेच पुढाकार का घ्याव्या. एखाद्या दिवशी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन त्याला सेक्सबद्दल विचारा आणि त्याला ज्या आवडतात त्या गोष्टी करून बघा. ही सर्वात चांगली ट्रीक आहे तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा स्पाईस आणण्यासाठी. 

3. आवडणारा सुगंध

GIPHY

तुमच्या जोडीदाराला आवडणारा सुगंध, गुलाबाच्या पाकळ्या आणि काही सुगंधित मेणबत्त्या. काही कळत नाहीये का? न कळण्यासारखं काहीच नाही. हे सर्व सुगंध तुमचा मूड अधिक चांगला करतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्कीच ट्राय करून पाहायला हव्यात. रात्रीच्या मंद प्रकाशात तुमच्या जोडीदाराला आवडणारा सुगंध दरवळला की, त्याला आणि तुम्हालाही हवा तो मूड नक्कीच यायला लागेल. 

उदाहरणार्थ - तुमच्या जोडीदाराला आवडत असणाऱ्या सुगंधित मेणबत्ती आणि दरवळणारा सुगंध असला की, वातावरणात नक्कीच बदल जाणवेल आणि जोडीदाराचा मूडही बदलेल. 

4. झलक दिखलाजा...

काही तरी एक्सायटिंग करा ज्यामध्ये सर्व झाकलेलं असूनही सर्व काही दिसत असेल. काही कळलं का? तसं तर हे कळणं सोपं आहे. अर्थात अशा काही सेक्सी आणि पारदर्शक लाँजरी तुम्ही अशा वेळी घालू शकता, जेणेकरून तुमच्या जोडीदाराचा मूड तुम्हाला बघितल्यानंतर लगेच बदलेल. खरं तर लाँजरी ही अशी वस्तू आहे जी तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा दोघांचाही मूड बदलून टाकते. अशी तुमचे स्तन सुडौल दिसणारी ब्रा नक्कीच तुमच्या जोडीदाराचे लक्ष वेधून घेते. 

5. त्याच्या कल्पनाशक्तीचे पलीकडचे

GIPHY

फोरप्ले करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक ही ट्रिक सांगत आहोत. त्याला कल्पनाही येणार नाही असं काहीतरी करा. बेडरूममध्ये तो येण्यापूर्वी तुम्ही सेक्ससाठी तयार राहा आणि वर केवळ पारदर्शक गाऊन घाला. आतामध्ये कोणत्याही प्रकारचे कपडे घालू नका. तो आत आल्यानंतर त्याला कळेल अशाप्रकारे हिंट द्या. त्याच्या मनातही नसताना तुम्ही अशा तऱ्हेने त्याच्या समोर येणं हा संपूर्ण त्याचा मूड बदलून टाकेल. असं केल्यानंतर तुमची ती रात्र नक्कीच अप्रतिम असेल. 

6. त्याची फँटसी त्याच्या नकळत करणं

प्रत्येक कपल आपल्याला नक्की कशा प्रकारे सेक्स करायला आवडेल हे कधी ना कधीतरी नक्कीच एकमेकांशी चर्चा करतं. त्यामुळे आपल्या जोडीदाराची सेक्स करतानाची नक्की काय फँटसी आहे हे आपल्याला माहीत असतंच. त्यामुळे अचानक त्याचा मूड बदलण्यासाठी तुम्ही त्याची ती फँटसी नक्कीच ट्राय करू शकता. अशावेळी तुम्हाला फोरप्लेची जास्त गरज भासते. पण तुमच्या जोडीदाराला नक्की काय आवडतं हे तुम्हालाच जास्त माहीत असल्यामुळे मूड तयार होण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागणार. 

7. सेक्सटिंगबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?

GIPHY

एखाद्या दिवशी तो खूप कामात असताना आणि थकलेला आहे हे माहीत असताना तुमचा एखादा सुंदर आणि सेक्सी फोटो त्याला मध्येच पाठवा आणि त्याचा मूड तयार व्हायला नक्कीच वेळ लागणार नाही. तसंच त्याला प्रेमाचे काही मेसेज करा जेणेकरून तो लवकर काम संपवून तुमच्याकडे येऊ शकेल. त्याचा मूड चांगला करण्यासाठी आणि सेक्ससाठी त्याला तयार करण्यासाठी हा पर्याय अप्रतिम आहे. 

8. स्वतःवर प्रेम करा

GIPHY

रात्री झोपण्यापूर्वी जशी आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो. स्वतःची काळजी घेतो त्याचप्रमाणे असा मूड तयार होण्यासाठी मुळात स्वतःवर प्रेम करण्याची गरज आहे. दमून आल्यानंतर सर्वात पहिले मस्तपैकी वॉश घेऊन त्यानंतर मस्तपैकी परफ्युम लावा आणि स्वतःसाठी तयार व्हा तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराचाही मूड बनवू शकता. 

9. एरोटिक चित्रपट पाहा

तुम्ही जेव्हा एकत्र असता तेव्हा आपल्या जोडीदाराचा मूड तयार करण्यासाठी त्याच्याबरोबर सेक्सी आणि एरोटिक चित्रपट नक्की पाहा. ज्या गोष्टी तुम्ही चित्रपटात पाहात आहात, त्या पाहता पाहता आपल्या जोडीदाराबरोबरदेखील तुम्ही त्या प्रत्येक गोष्टी करून पाहू शकता. हा चित्रपट पाहताना नक्कीच तुमच्या दोघांचाही मूड बदलेल यात शंका नाही. असं केल्यास तुम्ही रिलॅक्सही होता आणि तुमच्यातील हॉटनेस आणि स्पाईसदेखील तसाच राहातो. 

10. सेक्सी गेम खेळा

GIPHY

तुम्हाला रोजच्या जगण्याचा आणि तेच तेच करण्याचा खूपच कंटाळा आला असेल तर तुम्ही सेक्सी गेम्सही खेळू शकता. यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा जोडीदाराचा मूड पहिल्याप्रमाणे करू शकता. शिवाय तुम्हाला नेहमीच्या कंटाळवाण्या गोष्टीतूनही सुटका मिळेल. तर तुमच्या दोघांमधील स्पाईस, प्रेम आणि सेक्स पुन्हा एकदा नव्याने जागृत होईल यात शंका नाही. तुम्हाला गेम्स माहीत नसतील तर तुम्ही स्वतः विचार करूनदेखील तुमच्या मनातील फँटसीप्रमाणे गेम बनवून एकमेकांशी खेळू शकता.