असे 11 इशारे ज्यामुळे समजतं की, जोडीदाराला करायचं आहे सेक्स

असे 11 इशारे ज्यामुळे समजतं की, जोडीदाराला करायचं आहे सेक्स

कोणत्याही नात्यामध्ये विश्वास जितका महत्त्वाचा असतो तितकंच महत्त्व सेक्सलाही असतं. शारीरिक संबंध कोणत्याही नात्यात चांगले आणि सुदृढ असायला हवेत. पण बऱ्याचदा एकमेकांना सांगायला कदाचित नीट जमत नाही. पण एकदा तुमचं नातं भक्कम झालं की, तुम्ही केलेल्या इशाऱ्यांवरूनही तुमच्या जोडीदाराला आता सेक्स करण्याची इच्छा आहे हे तुम्हाला सहज समजतं. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दोघांमध्ये अतिशय चांगला बाँड असायला हवा. त्यानंतरच तुम्ही हे पुढचं पाऊल योग्य प्रकारे उचलू शकता. कधी कधी आपल्याला बोलूनही गोष्टी कळत नाही. मग इशाऱ्यांनी या भावना कशा कळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तो चूक आहे. कारण सेक्स ही अशी भावना आहे की, तुमच्या जोडीदाराशी जोडते. त्यामुळे त्याच्या नुसत्या डोळ्यांच्या हालचाली अथवा त्याच्या हावभावावरूनही तुम्हाला त्याला नक्की आता काय म्हणायचं आहे हे लगेच कळतं. तो एकच इशारा तुमच्यासाठी सर्व काही सांगून जाणारा असतो. जाणून घेऊया काय असतात हे इशारे -

1. तुमच्या लुकची प्रशंसा करणं

GIPHY

तुम्ही जशा दिसत असाल त्या प्रत्येक लुकची प्रशंसा तुमचा जोडीदार करतो. तुमच्या लुकवर कॉम्प्लिमेंट देणं अथवा तुम्ही जो ड्रेस घातला आहे त्याबद्दल बोलताना केवळ तुम्हाला कळेल अशा विशिष्ट शब्दांमध्ये बोलणं. तुमच्या अशा लुकमध्ये सतत तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करणं हा एक इशारा आहे. तुमच्या अशा लुकमुळे त्याच्यामध्ये सेक्सची भावना जागृत झालेली असते आणि त्यामुळेच तो तुम्हाला इशारा देत असतो. तो तुम्हाला जास्तीत जास्त आनंदी करायचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुम्ही त्याचा इशारा समजून घ्याल.

2. हादेखील आहे एक इशारा

प्रत्येक गोष्टीमध्ये फ्लर्ट करणं आणि सेक्ससंबंधित बोलणं हादेखील एक इशाराच आहे. अगदी लहानसहान गोष्टीतही तुमचा जोडीदार तुम्हाला इशारा करत राहतो. प्रत्येक गोष्टीत तो सेक्सचा संबंध जोडतो आणि तुम्हाला इशारा देण्याचा प्रयत्न करत राहातो.

उदाहरणार्थ - तुम्ही बोलत असाल आणि तुम्ही म्हणालात की, मी आता आंघोळ करून येते, तर तुमचा जोडीदार क्षणाचाही विलंब न करता म्हणतो, मी पण येऊ का तुझ्यासोबत आंघोळ करायला?

3. रात्री घरी डेट प्लॅन करणं

GIPHY

बरेच दिवस धावपळ होत असेल आणि तुम्ही एकमेकांना भेटू शकत नसाल तर अचानक रात्री घरी डेट प्लॅन करणं हादेखील एक इशाराच आहे. अचानक घरी मुव्ही बघण्याचा अथवा पिझ्झा पार्टी करण्याचा प्लॅन त्याने ठरवला तर तुम्हाला नक्कीच समजायला हवं की, त्याला तुमच्याबरोबर काही रोमँटिक क्षण घालवायचे आहेत. तुम्ही एकमेकांबरोबर जेवत असतानाच असे क्षण एकांतात येऊ शकतात ज्याची तुम्ही दोघंही आतुरतेने वाट पाहात आहात.

उदाहरणार्थ - दोघंही एकत्र मस्त घरी डेट प्लॅन केली असताना खाता खाताच एकमेकांना भरवत तुम्ही पुढचे सेक्स प्लॅन आखू शकता अथवा अगदी खाता खाता एकमेकांना भरवून तुम्ही सेक्स करू शकता.

4. घरी आल्यावर अचानक बेड आवरलेला दिसणं

रोज तुम्ही तुमच्या जोडीदाराला ज्या गोष्टीवरून ओरडत असता तो बेड अचानक तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर आवरलेला दिसला तर समजून जा आज तुमच्या जोडीदाराचा सेक्सचा मूड आहे. त्यासाठीच हा इशारा आहे. रूममधील बाकी सामानदेखील व्यवस्थित लावून ठेवण्यात आलेलं असतं.  त्याशिवाय रूममध्ये परफ्यूम अथवा एअर प्रेशनरचा सुगंधित वास दरवळत असतो. शिवाय मेणबत्त्यादेखील लावलेल्या असतात. फक्त तुमचा जोडीदार वाट पाहात असतो तो तुमच्या येण्याची. तुम्ही आल्यानंतर तुमचा मूड चांगला राहावा हाच यामागचा हेतू असून तुम्हीदेखील तितक्यात आतुरतेने त्याच्याबरोबर हे क्षण घालवावेत ही त्यामागची भावना असते. हा इशारा सर्वात महत्त्वाचा असतो आणि इतक्या दिवसांच्या सहवासात तुम्हाला हा इशारा नक्कीच माहीत झालेला असायला हवा.

5. घरी कोणीच नसताना एकत्र राहायचं प्लॅनिंग

GIPHY

घरी कोणीच नसताना एकटं राहायंचं प्लॅनिंग करणं हा याच गोष्टीचा इशारा आहे. तुम्हाला बरेचदा कामात एकत्र घालवायला वेळ मिळत नाही. घरी कोणीही नसताना एकत्र राहण्याची आणि कोणतीही अडचण नसण्याची एक नामी संधी चालून आलेली असते. अशावेळी अचानक फोन करून तुम्हाला बोलावून घेणं हा एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि सेक्ससाठीचाच इशारा आहे हे न समजण्याइतके तुम्ही नक्कीच बालिश नाही. त्यामुळे असा फोन जेव्हा येईल तेव्हा संधीचा फायदा नक्कीच घ्या.

6. केवळ आपल्या शरीराबद्दल बोलत राहतो

GIPHY

तो हल्ली जर रोज त्याच्या जिममध्ये जाण्याबद्दल बोलत असेल आणि त्याची बॉडी कशी सुपरबॉडीपेक्षा कमी नाही असं तो सतत जाणवून देत असेल. तर समजून जावं की, तुम्हाला त्याच्या अधिक जवळ आणण्याचा हा इशारा आहे. तो जे शरीर कमावत आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असून लवकरात लवकर तुम्ही त्याच्याबरोबर हे शारीरिक सुख घ्यावं असं त्याला वाटत असतं. त्यामुळे तो सतत तुम्हाला हे इशारा देऊन सांगत राहातो.

7. लाँजरीबद्दल बोलणं

तुम्ही कधी त्याच्याबरोबर फिरताना लाँजरी स्टोअरवरून नक्कीच गेला असाल. अचानक जर तो तुम्हाला म्हणाला की, ही ब्रा तुझ्यावर खूपच छान दिसेल. तर नक्कीच तुम्हाला समजायला हवं की, त्याचा इशारा काय आहे. तो तुम्हाला अशा कपड्यांमध्ये अर्थात लाँजरीमध्ये बघण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे आता तुम्ही त्याचा इशारा समजून घ्यायला तयार राहा. तुमचाही तसाच मूड असेल तर वाट कसली पाहताय. जर तुम्हाला हा इशारा कळला असेल तर तुम्हीही या गोष्टीचा आनंद घेऊ शकता.

8. खूप जास्त परफ्यूम

तुम्हाला त्याला भेटल्याक्षणी जाणवलं की, त्याने खूप जास्त परफ्यूम तुम्हाला आकर्षित करण्यासाठी मारलं आहे, तर हा तुम्हाला त्याचा इशारा नक्कीच समजेल. खरं तर तुम्हाला नक्कीच माहीत असतं की, तुमच्या जोडीदाराचा आवडता परफ्युम कोणता आहे. पण जर त्याने अचानक तुमच्या आवडीचा परफ्युम मारला तर त्याला तुम्ही जवळ येण्याची इच्छा प्रबळ झाली आहे असं नक्कीच समजा.

 

9. एकटक तुमच्याकडे पाहात राहणं

GIPHY

तुम्ही काहीही करत असताना तो तुमच्याकडे सतत एकटक पाहात राहतो. त्याचं असं तुमच्याकडे पाहणं हे तुम्हाला जाणवतं आणि तुमच्याकडे पाहण्याची त्याची पद्धत तुम्हाला लगेच कळते. कारण त्याच्या नजरेत तुमच्याबद्दल असणारं प्रेम हे दिसून येतं. तुम्ही त्याच्याजवळ येण्यासाठी तुम्हाला तो नजरेतूनच इशारे करत असतो काहीही न सांगता.

10. अचानक जवळ घेणं

तुमच्या जवळ येण्याचा बहाणाच त्याला हवा असतो. तुम्ही कोणतंही काम करत असताना अचानक तुमच्याजवळ येऊन तुम्हाला हलकेच स्पर्श करणं किंंवा अचानक तुमच्या कानाजवळ हळूवार फुंकर मारणं हादेखील त्याला तुमच्याजवळ यायचं असण्याचा इशारा आहे. त्याशिवाय तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुमच्या मागून तो फिरत राहातो. त्यातून तो तुम्हाला सुचवत राहातो की, त्याला तुमच्याबरोबर राहण्याची इच्छा आहे.

11. कानाजवळ येऊन लहान आवाजात बोलायला लागल्यावर

GIPHY

आवाजामध्ये भारदस्तपणा असणारे पुरूष महिलांना आवडतात. पण असे पुरूष जेव्हा कानाजवळ येऊन हळूच बोलतात आणि तुमच्याबद्दल प्रशंसेचे पूल बांधतात तेव्हा तुम्हाला त्यांचा हा इशारा समजायला हवा. तुमचा जोडीदार अशापैकीच एक असेल तर ही त्याची एक खासियत आहे. तुम्हाला जवळ आणण्यासाठी उचललेलं हे पाऊल असतं. त्याला तुम्हाला जवळ आणायचं असतं आणि हाच त्याचा महत्त्वाचा इशारा असतो.